मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१८

द्विचल रेषीय समीकरणे - भाग १

गेल्या ऑगस्टमध्ये आपण एकचल रेषीय समीकरणांचा आढावा घेतला 


होता. आज आपण द्विचल रेषीय समीकरणांकडे वळूयात. द्विचल रेषीय 


समीकरणांचा आजचा हा पहिला भाग !



द्विचल रेषीय समीकरणांची व्याख्या 


जी समीकरणे ax+by+c = 0  ह्या स्वरुपात मांडता येतात त्यांना 

द्विचल रेषीय समीकरणे असे म्हणता येईल.  ह्यात a, b आणि c हे 

constants आणि x, y हे चल अर्थात variable आहेत. 

भुमितीच्या दृष्टिकोनातून पाहिलं असता द्विचल रेषीय समीकरणे 

एका रेषेचे प्रतिनिधित्व करतात. ह्यामध्ये विविध शक्यता उद्भवतात 

१> ax+by+c = 0; Both a and b are non-zero



ह्या उदाहरणात ह्या समीकरणाचे प्रतिनिधित्व करणारी रेषा वरील 

प्रतिमेप्रमाणे दिसते. 


२> ax+by+c = 0; a = zero and b is non-zero

थोडक्यात by+c = 0. म्हणजेच हे समीकरण एकचल समीकरण 

बनतं आणि ही रेषा क्ष (x) अक्षाला समांतर असते.  ह्या रेषेवरील 

प्रत्येक बिंदु क्ष (x) अक्षापासुन -c/b इतक्या अंतरावर असतो. 


३> ax+by+c = 0; b = zero and a is non-zero

थोडक्यात ax+c = 0. म्हणजेच हे समीकरण एकचल समीकरण 

बनतं आणि ही रेषा य  (y ) अक्षाला समांतर असते.  ह्या रेषेवरील 

प्रत्येक बिंदु य (y ) अक्षापासुन -c/a  इतक्या अंतरावर असतो. 


द्विचल रेषीय समीकरणांची गणिते देतांना तुम्हांला ह्या प्रकारातील 

समीकरणाच्या दोन जोड्या दिल्या जातात. आणि ह्या दोन्ही 

समीकरणांचे समाधान करु शकणाऱ्या x आणि y च्या किंमती 

काढण्यास सांगितलं जातं. 


द्विचल रेषीय समीकरणांच्या दोन जोड्या सोडविण्याच्या विविध 

पद्धती आहेत.


१) आलेख पद्धती 

ह्या मध्ये दोन्ही समीकरणांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रेषा आलेखावर 

काढुन त्या एकमेकांना ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूचे क्ष आणि 

य co-ordinate हे ह्या दोन समीकरणांचे उत्तर बनतं. 


२) बीजगणितीय पद्धती 

अ ) Substitution Method

ह्या पद्धतीत पहिल्या समीकरणात क्ष ला य च्या स्वरूपात मांडलं 

जातं. क्ष ची मिळालेली ही किंमत दुसऱ्या समीकरणात 

वापरली जाते. त्यामुळं दुसरे समीकरण केवळ य च्या स्वरुपात 

राहिल्यानं ते सोडवणं शक्य होतं. 


ब ) Elimination Method

ह्या दोन्ही समीकरणातील क्ष किंवा य चा लसावि काढुन त्यांचे 

coefficients समान केले जातात. त्यानंतर ह्या दोन्ही 

समीकरणाच्या मिळालेल्या नवीन रुपांची वजाबाकी करुन 

समीकरणांची उकल केली जाते. 


क) Cross Multiplication Method

a1x+b1y+c1 = 0

a2x+b2y+c2 = 0

ह्या स्वरूपात लिहलेली दोन समीकरणे ज्यावेळी Elimination 

Method ने सोडवली जातात त्यावेळी x आणि y ह्यांची उत्तरे 

खालील स्वरुपात मिळतात 






ह्याहुन अधिक क्लिष्ट प्रकारची गणिते आहेत ज्यांना सोप्या 

स्वरुपात आणुन वरीलपैकी एका पद्धतीनं सोडवावं लागतं. 

पुढील भागात आपण वरील चार पद्धतींची काही उदाहरणं 

पाहुयात. 

(क्रमशः )

गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१८

Link Road Outage



मुंबईतील वाहतुकीने सध्या अत्यंत भयावह स्वरुप धारण केलं आहे.  सायंकाळी साधारणतः तुम्ही सात वाजता मुंबई विमानतळावर उतरलात तर बोरिवलीसारख्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला पश्चिम द्रुतगती महामार्गावरुन साधारणतः अडीच ते तीन तास इतका वेळ लागतो.  सध्या सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील दीर्घ पल्ल्याचे धावपटू हेच अंतर कापण्यासाठी किती वेळ घेतात हे पाहणे मनोरंजक ठरेल. 

आता वळुयात ते मला भेडसावणाऱ्या कार्यालय ते घर या प्रवासाविषयी! याच विषयावर आधीच दोन पोस्ट लिहुन झाल्या आहेत. परंतु आजचा विषय काहीसा वेगळा आहे. मुंबईमध्ये वेगवेगळ्या मेट्रोचे काम चालू असल्यामुळे त्या कामानिमित्त बऱ्याच ठिकाणी लिंकरोड सारखे महत्त्वाचे रस्ते अरुंद झाले आहेत. विशेषतः जिथं जिथं मेट्रोचे भलेमोठे खांब (Columns) उभारण्यात येत आहेत, तिथं त्या खांबाभोवतीचे barricades उभारण्यात आल्यामुळे तिथं रस्ता अत्यंत अरुंद होतो आणि बॉटलनेकसारखी परिस्थिती निर्माण होते. आता अशा घटकांच्या बाबतीत आपण काहीच करु शकत नाही.  पण वाहतुक कोंडीला कारणीभुत ठरणारा अजुन एक घटक म्हणजे या लिंक रोडवर पडलेले खड्डे!  हे खड्डे जिथं जिथे आहेत तिथे वाहन चालक आपल्या गाडीचा वेग मंदावतात आणि त्यामुळे प्रत्येक खड्ड्याच्या ठिकाणी वाहनांची भलीमोठी रांग लागलेली दिसून येते आणि ह्यामुळं वाहतुकीचा एकंदरीतच पुर्ण खोळंबा होतो. 

सध्याच इतकी भयावह परिस्थिती आहे तर येणाऱ्या गणेशोत्सवाच्या वेळी नक्की काय होईल याची कल्पना सुद्धा करवत नाही. आपल्या प्रिय गणपतीबाप्पाचा प्रवास सुखरुप होणं आवश्यक आहे.मुंबईत दीड दिवसाचे,  पाच दिवसांचे, गौरीसोबत जाणारे, दहा दिवसांचे अशा प्रत्येक गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठाल्या मिरवणुका काढल्या जातात. ह्यावेळी 
वाहतुकीची प्रचंड कोंडी होण्याची शक्यता आहे. 

आता नेहमीप्रमाणे मी इथं माझ्या व्यावसायिक जीवनातील एका उदाहरणाचा आधार घेणार आहे.  आमच्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात छोटे मोठे बदल आपल्या सिस्टीम मध्ये टाकण्याचे असतील तर त्यावेळी तुमची सिस्टीम तुमच्या End User ना उपलब्ध ठेवून हे बदल घडवून आणता येतात. परंतु ज्यावेळी एखादा मोठा बदल घडवून  असतो त्यावेळी मात्र काही वेळ सिस्टीम तुमच्या End User  अनुपलब्ध करुन तुमच्या सिस्टीम मध्ये बदल घडवून आणणे आवश्यक असते. याला outage असे म्हटले जाते. यामध्ये दोन हेतू साध्य होतात तुमच्या बदल घडून आणणाऱ्या टीमला संपूर्ण सिस्टीमचा पूर्ण ताबा मिळतो आणि त्यावेळी End User याचा अनुभव कसा असेल याविषयी चिंता करण्याची गरज उरत नाही. 

आता मी जे काही सुचवणार आहे तेसुद्धा याच धर्तीवर आहे. आपल्या मुंबईतील महत्त्वांच्या रस्त्यांचे गणेशोत्सवाच्या आधी एखाद्या रविवारी outage घ्यावे आणि त्या रस्त्यावरील खड्डे आणि उंच-सखलपणा या सर्व गोष्टींचा कायमचा बंदोबस्त करावा. जिथं एखादा महत्त्वाचा रस्ता अचानक अरुंद होत आहे तिथं पाहणी करुन तज्ञांद्वारे परिस्थितीत काही सुधारणा करता येईल का ह्याचा विचार करावा! दोन समांतर रस्ते जसे की पश्चिम द्रुतगती मार्ग आणि लिंक रोड ह्यांचं एकाच वेळी outage घेऊ नये. ह्यावेळी फक्त वैद्यकीय आणीबाणीची वेळ असेल तरच ह्या रस्त्यांवर प्रवेश द्यावा.  हा उपाय जर  ५०% सुद्धा यशस्वी ठरला तर असंख्य मुंबईकरांचा वेळ आणि देशाचं इंधन वाचेल !!

आता तुम्ही म्हणाल की रविवारच्या दृष्टीने दिवशी कोणी बाहेर पडत नाही काय?  मला मान्य आहे की यातील काही रस्ते रविवारी बंद ठेवल्याने लोकांची गैरसोय होईल, परंतु आठवड्यातील बाकीच्या दिवसातील आपल्या सोयीसाठी ही गैरसोय सहन करावी असे माझे म्हणणे आहे.  आणि आपल्या देशातील काही परिस्थिती सुधारायची असेल तसे काही अन्य टोकाचे उपाय सुद्धा भविष्यात योजावे लागतील.  

आपले माननीय मुख्यमंत्री ही पोस्ट वाचतील आणि हा उपाय गणेशोत्सवाच्या आधी अमलात आणतील ही आशा!

शनिवार, २५ ऑगस्ट, २०१८

आदिम वसाहत!



पृथ्वीवरील काही ठराविक मानवांना बाह्य जगतातील घटनांपासून आणि विकासापासून पुर्णपणे विभक्त केलं तर त्यांच्या आयुष्यातील घटनांचा क्रम कसा आहे असेल हा विचार माझ्या मनात सध्या घोळत आहे. हा विचार येण्याचे कारण काय तर तंत्रज्ञान मनुष्याला आपल्या मुळ स्वरुपापासून खुप दूर नेत आहे. त्यामुळे आपल्या मुळ स्वरुपात असलेली आपली काही विशिष्ट वैशिष्टयं आपण गमावुन बसत आहोत. समजा मनुष्यजातीवर बाह्य शक्तीने आक्रमण केलं तर अशा गुणधर्मांची आपल्याला कमतरता भासू शकते. अशा वेळी जर आपणाकडे काही माणसं अशी असतील ज्यांनी आपले मनुष्यजातीचे मूळ गुणधर्म कायम ठेवले आहेत तर अशी माणसे आपल्याला परशक्तींच्या आक्रमणाच्या वेळी वापरता येऊ शकतील.  आता हे कसे शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल! त्याचे उत्तर सुद्धा माझ्याकडे आहे. हे संपुर्ण काल्पनिक प्रकरण असुन ह्यात मानवी हक्काचं उल्लंघन होत आहे. परंतु काल्पनिक प्रकरणामुळं माझ्यावर त्याची जबाबदारी नाही. 

एक असा असा विस्तृत निर्मनुष्य प्रदेश ज्याचं क्षेत्रफळ लाखो चौरस मैल असेल तो या प्रकल्पासाठी ताब्यात घ्यायचा. ह्या प्रदेशाभोवती अजुन काही भाग बफर म्हणुन घोषित करायचा. अशाप्रकारे ह्या भागाभोवती दुपदरी कुंपण असणार आणि त्याची सुरक्षितता मानवाला शक्य असेल तितकी कडेकोट असणार. ह्या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी जगभरातुन अंदाजे दीडहजार माणसे निवडली जाणार. आयुष्यभरात परत बाकीच्या माणसांशी संपर्क न साधण्याची अट त्यांच्याकडुन मान्य करुन घेतली जाणार. ह्या माणसांची निवड करताना त्यांचं मनोबल अत्यंत कणखर असणार ह्याची खात्री करुन घेतली जाणार. ह्या समुहात जगातील बहुतांशी देशांना, सर्व पेशांच्या लोकांना प्रतिनिधित्व दिलं जाणार.  ह्या  लोकांनी आपले धर्म बाजूला ठेवावेत ही अट घातली जाणार. उर्वरित पृथ्वीवरील लोक ह्या लोकांशी संपर्क साधण्याचा अजिबात प्रयत्न करणार नाहीत आणि ह्यातील कोणाही मानवानं बाह्यजगताशी संपर्क साधु नये ह्याचं कडेकोट पालन केलं जाईल. ह्या प्रदेशात ना दूरचित्रवाणीचे, मोबाईलचे  सिग्नल पोहोचू दिले जाणार ना ही वसाहत मानवी उपग्रहांच्या नजरेखाली असणार !

ह्या प्रदेशात जागोजागी पाण्याची तळी बनवुन दिलेली असणार. वन्य प्राण्यांना एका केंद्रीय जागी सुरुवातीला बंदिस्त केलं असणार. ज्यावेळी तुम्ही सज्ज व्हाल त्यावेळी ह्या प्राण्यांना मुक्त करा असा आदेश ह्या मानवांना वसाहतीत प्रवेश करतेवेळी दिला जाणार! ह्या लोकांसोबत विविध अन्नधान्यांची, फळझाडाची बियाणी दिली जाणार. त्यांच्यासोबत दुधासाठी गाई सुद्धा द्यायच्या. सुरुवातीच्या वीस वर्षात आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करणार नाही हे कायद्यानं ह्या वसाहतीमध्ये शिरणाऱ्या प्रत्येकाला मान्य करावं लागणार!

ह्या दीड हजार लोकांचा ह्या आदिम वसाहतीत प्रवेश करण्याचा दिवस फारच भावनाविवश करणारा असणार. त्यांना निरोप देण्यासाठी त्यांचे सर्व नातेवाईक ह्या आदिम वसाहतीच्या प्रवेशद्वाराशी गर्दी करणार. प्रवेश करताना फक्त कपड्यांच्या दोन जोड्यांसहित ह्या सर्वांना आत शिरावं लागणार. बाकीचे सर्व भावबंध सोडुन द्यावे लागणार. काही जण आपल्यासोबत आपल्या चिमुरड्या लेकरांना सुद्धा घेऊन येणार! त्या लेकरांचे आजी आजोबा आपल्या आसवांनी भुमातेला ओलेचिंब करणार !

मानसिकदृष्ट्या कितीही कणखर असले तरी सुरुवातीचा काही काळ हे लोक गोंधळून जातील. त्यांना बाह्य जगताची खुप खुप आठवण येईल इंटरनेटच्या माध्यमातून सर्व जगाशी संपर्क साधण्याची साधने तुटल्यामुळे ते एकदम उदासीनसुद्धा होऊ शकतात.  पण आपल्या कणखर मानसिकतेच्या आधारे ही लोकं फार काळ उदास राहणार नाहीत हे मी गृहीत धरीत आहे. हा सुरुवातीचा संभ्रमाचा काळ संपला की मग हे लोक आपला एक नवीन विश्व बसवायला सुरुवात करतील. तळ्याभोवती हळूहळू हिरव्या वृक्षांची झाडी निर्माण होण्यास सुरुवात होईल. या गटांमधील असणारे अभियंते उपलब्ध नैसर्गिक पद्धतीच्या साधनाने आपली घरकुलं बनवण्याचा प्रयत्न सुरु करतील. हा संपुर्ण प्रभाग हा मानवी उपग्रहांच्या कक्षेपासून वेगळा तोडला गेला असल्यानं इथं काय होत आहे हे कोणालाही बाहेरुन पाहता येणार नाही. जसजसा हिरवागार प्रदेश वाढत जाईल तसतसे तिथे वनस्पतींची विविधता वाढत जाईल. आणि एका क्षणी वन्य प्राणी मुक्त केले जातील. 

साधारणतः पन्नास-साठ वर्षे अशीच निघुन जातील. ह्या गटातील कोण ह्या समुहाचा ताबा घेईल ह्यावर शक्य असलेल्या अनेक शक्यतांपैकी कोणती निवडली जाते हे अवलंबुन राहील. तिथं जन्मलेल्या नवीन पिढीला बाह्य जगताशी काहीच माहिती नसेल. एखादा प्रसंग मग असाही येईल, घनदाट जंगलातून सूर्याची किरणे कसाबसा आपला मार्ग काढत जमिनीपर्यंत पोहोचली असतील. तिथं खडकाळ प्रदेशातून वाहणाऱ्या पाण्यावर एखादा हिंस्त्र पशु आपली तहान भागवण्यासाठी आला असेल आणि त्याच्या आसपास असलेल्या घरातून एखादा विशी - तिशीतला युवक त्याच्याकडे कुतूहलाने पाहत असेल. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे एकदा का अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा मानवाच्या या समूहाने भागवल्या की मग त्यांचा मेंदू कार्यरत होईल. मानवजातीने जो उत्क्रांतीचा टप्पा गेल्या सहस्त्र वर्षात पार पडला तो वेगाने पार पाडण्याचा प्रयत्न हे सर्व सुरू करतील. परंतु त्यांना बाह्य जगतापासून पूर्णपणे तोडल्यामुळे त्यांच्या प्रगतीवर अनेक बंधने येतील. 

मग ते उपलब्ध एका शक्यतेनुसार हे सर्वजण निसर्गाच्या सानिध्यात आनंदाचा परमोच्च क्षण अनुभवण्याचा प्रयत्न करतील. हवेचे शुद्धतेचे प्रमाण कमाल असेल. रात्रीच्या आकाशातील चांदण्यांचे सौंदर्य त्या लोकांना अगदी मनसोक्त लुटता येईल. 

मी माझी कल्पनाशक्ती इथंच आवरती घेतोय! जाता जाता एक प्रश्न तुम्हांला! खरोखरच अशी वसाहत उभारायचं ठरवलं आणि त्यात तुमची तुमच्या कुटुंबियांसोबत निवड झाली तर व्हाल तयार आत जायला?

मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८

संवादशैली



संवादाचे मूळ स्त्रोत व्यक्तीच्या मनात येणाऱ्या विचारांमध्ये असतं. कोणत्याही संवादांमध्ये एखादी व्यक्ती दोन प्रकारच्या भूमिका निभावत असते. पहिल्या प्रकारात ही व्यक्ती संवाद पुढे चालवण्यासाठी काही विशिष्ट विधान करत असते आणि दुस-या प्रकारांमध्ये ही व्यक्ती समोरील व्यक्तीने केलेल्या विधानाला उत्तर देते. 

आपल्या मनात येणारा विचार आणि त्याला आपण दिलेले शब्दरुप यामधील रुपांतरणाची प्रक्रिया कशी होत असावी हे पाहणे काहीसं मनोरंजक असावं. प्रत्येक व्यक्तीची कालावधीनुसार स्वतःची अशी संवाद कला विकसित झालेली असते. यामध्ये त्या व्यक्तीच्या मनात येणारे विचार एका विशिष्ट प्रकारे शब्दात परिवर्तित होत असतात. या परिवर्तित होण्याच्या पद्धतीनुसार आपण त्या व्यक्तीचे वर्गीकरण करीत असतो. जसे की ती व्यक्ती फटकळ आहे, ती व्यक्ती एकदम शब्दाला मध लावून बोलते वगैरे वगैरे!!

काही व्यक्तींना कालानुरूप विकसित झालेली आपली संवाद शैली बदलता येणं शक्य होत नाही. परंतु काही व्यक्तींना ते वावरत असलेल्या सामाजिक स्थितीनुसार हा बदल घडवून आणणे आवश्यक असते. संवादशैली मध्ये तुम्ही बोलत असणारे शब्द हा केवळ एकमेव घटक नसून तुमची शब्दफेक, तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि शब्दांचा तुम्ही लावलेला क्रम हे महत्त्वाचे घटक असतात. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपण आपल्या नैसर्गिक संवादशैलीशी ज्यावेळी फारकत घेत असतो त्यावेळी काही वेळा आपल्या मनामध्ये एक विशिष्ट हेतू साध्य करणे हा एक विचार असतो परंतु काही वेळा एखाद्या प्रसंगाच्या भरात आपणही फारकत घेत असतो. 

जाणूनबुजून घेतलेली फारकत आणि अजाणतेपणी झालेली फारकत यांमध्ये महत्त्वाचा फरक असतो. या दोन्ही प्रकारात समोरच्या व्यक्तीला तुमच्याकडून जे शब्द अपेक्षित असतात त्याला तुम्ही तडा देत असता आणि त्या व्यक्तीला त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसत असतो. ज्यावेळी तुम्ही ही फारकत जाणूनबुजून घेत असता त्यावेळी तुम्ही समोरील व्यक्तीला एक विशिष्ट संदेश देऊ इच्छित असता. 
परंतु ज्या वेळी ही फारकत अजाणतेपणे होत असते त्यावेळी समोरील व्यक्ती होणारी प्रतिक्रिया हे काही प्रमाणात तुम्हाला अनपेक्षित असू शकते
दैनंदिन जीवनात लाखो व्यक्ती एकमेकांशी संवाद साधत असतात. वरील मुद्द्यांमध्ये अजून एक घटक आपण समाविष्ट करू शकतो. संवादातील शब्द, शब्दफेक, शब्दक्रम आणि चेहऱ्यावरील हावभाव हे सर्व कायम असताना तुम्ही किती आणि कोणत्या लोकांसमोर हा संवाद साधत आहात त्यानुसार तुमच्यासमोरच्या  व्यक्तीची प्रतिक्रिया बदलु शकते. 

सारांश म्हणजे काय जेव्हा केव्हा तुम्हाला शांत वेळ मिळेल त्यावेळी आपल्या स्वतःच्या संवाद शैलीचा अभ्यास करुन पहा आणि खालील मुद्दे विचारात घ्या !

१) जर तुम्ही फटकळ म्हणुन ओळखले जात असाल तर त्याचा तुम्हांला मिळणाऱ्या संधीवर, तुमच्या नातेसंबंधांवर कुठंतरी परिणाम होत असतो. तुमच्या एकंदरीत परिस्थितीवरुन तुम्हांला कदाचित हे परवडू सुद्धा शकते. 

२) तुम्ही जर सोशिक / समजंस असाल तर तुम्हांला तडजोड करावी लागत असते. ही तडजोड करणं कितपत योग्य (worth) आहे ह्याची जाणीव तुम्हांला असली तर बरं !

रविवार, १९ ऑगस्ट, २०१८

धोरणात्मक दिशा


व्यावसायिक जीवनात एका विशिष्ट पदानंतर आपल्याला धोरणात्मक दिशा ठरवणे आणि दैनंदिन कामात लक्ष देणे या दोन्ही गोष्टींमध्ये समन्वय साधावा लागतो. बऱ्याच वेळा दैनंदिन काम कौशल्यानं हाताळण्याची तुमची खुबी तुम्हांला उच्चस्थ पदापर्यंत घेऊन आलेली असते. त्यामुळं दैनंदिन काम चोखपणे पार पाडण्याची सवय तुमच्यामध्ये भिनलेली असते. खरंतर दैनंदिन कामाकडुन लक्ष हळुवारपणे काढुन घेऊन धोरणात्मक दिशा ठरविण्याचा क्षण एकमेव नसतो. हे स्थित्यंतर काही काळ सुरु असतं. परंतु तुम्हांला हे स्वतःला उमजुन घ्यावं लागतं. आणि तुमची कंपनी तुम्हांला हे स्थित्यंतर यशस्वी व्हावं म्हणुन अनेक मदतीची साधनं सुद्धा उपलब्ध करुन देत असते.  

दैनंदिन कामात लक्ष घातले नाही तर त्याचे परिणाम तात्काळ दिसून येतात त्यामुळे आपली नैसर्गिक वृत्तीसुद्धा दैनंदिन कामांकडे लक्ष देण्याची असते. दैनंदिन कामे बऱ्याच वेळा छोट्या छोट्या स्वरुपाची असतात. त्यामुळं ती पुर्ण करुन मिळणाऱ्या instant accomplishment च्या भावनेचा मोह तुम्हांला पडु शकतो. परंतु त्यामुळे होतं काय की तुमचं धोरणात्मक बाबींकडे दुर्लक्ष होतं. धोरणात्मक निर्णयांचा अजुन एक गुणधर्म म्हणजे त्याचे परिणाम दूरगामी असतात आणि त्यांची अचुकता समजायला बराच वेळ द्यावा लागतो. 

कुशलतेने धोरणात्मक निर्णय घेणारे व्यवस्थापक मोठ्या संख्येनं निर्माण करण्यात आपल्याला म्हणावं तसं यश अजुनही आलं नाही. आणि यामागं बहुदा ह्यामागं आपली पारंपरिक मानसिकता आड येत असावी. नवीन शिक्षणपद्धती नक्कीच ही उणीव दुर करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु शालेय पातळीवरील कुशल शिक्षकांचा अभाव हा मुलभूत संकल्पना दृढ असलेली पिढी निर्माण करण्याच्या आड येत असावा. त्यामुळं पुढील काळातील भारतीय व्यवस्थापकांची धोरणात्मक निर्णय घेण्याची क्षमता भारतीय औद्योगिक क्षेत्राच्या पुढील वाटचालीत महत्वाचा घटक ठरु शकते. 

यात अजून समाविष्ट करण्यासारखा मुद्दा म्हणजे कोणत्याही संघटनेमध्ये मध्ये दोन प्रकारचे व्यवस्थापक असतात. पहिला प्रकार म्हणजे संघटनेच्या कनिष्ठ पदावरून उन्नती करत व्यवस्थापक बनलेले आणि दुसरा प्रकार म्हणजे कंपनीने व्यवस्थापकीय पदासाठी बाहेरून नेमणूक केलेले. ह्या पोस्टमध्ये पहिल्या प्रकारचे वर्णन अधिक प्रमाणात आढळते. त्यामुळे हा वर्ग धोरणात्मक निर्णय घेण्याच्या बाबतीत काहीसा बचावात्मक पवित्रा घेताना दिसून येतो. याउलट बाहेरून आलेला आणि थेट व्यवस्थापक बनलेला वर्ग हा धोरणात्मक निर्णय घेण्यावर आपली शक्ती आणि लक्ष केंद्रित करीत असतो. संघटनेच्या दृष्टीने पाहिलं असता त्यांना या दोन्ही प्रकारच्या व्यवस्थापकांचे योग्य मिश्रण आवश्यक असतं.

बऱ्याच वेळा असं आढळुन येतं की दुसऱ्या प्रकारातील व्यवस्थापक मंडळी ही एका कंपनीत दीर्घकाळ राहताना आढळत नाहीत. त्यांना पदोन्नतीच्या शिड्या झटपट चढायच्या असतात. त्यामुळे एखाद्या कंपनीतील धोरणात्मक निर्णय घेऊन जाण्याची संधी संपली की मग ते दुसऱ्या संघटनेच्या दिशेने किंवा त्याच संघटनेतील दुसऱ्या विभागात आपला मोर्चा वळवतात.

बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८

भविष्यवेध


आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग याविषयी सध्या बरंच काही बोललं लिहिलं जातं. यामध्ये खरोखर खोलवर संशोधन करणारी मंडळी थोडी आहेत आणि त्यांना या विषयात बरंच काही माहित आहे. इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ह्या दोन गोष्टींचा मानवी जीवनावर नक्की कसा परिणाम होईल याविषयी छातीठोकपणे कोणीही  सांगू शकणार नाही. परंतु ज्या काही उपलब्ध शक्यता आहेत त्याविषयी मात्र आपण अंदाज वर्तवु शकतो. 

गेल्या रविवारी माझ्या अभियांत्रिकी विद्यालयातील मित्रांचा एक छोटा गट पार्ल्यात भेटला. त्यावेळी अभियांत्रिकीला जाऊ इच्छिणाऱ्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यानं IT शाखा निवडावी की पारंपरिक अभियांत्रिकी शाखांचा स्वीकार करावा इथुन सुरु झालेली चर्चा भविष्यातील नोकरीचं बदलतं आणि काहीसं अशाश्वत स्वरुप ह्या विषयापाशी येऊन थांबली. दुसऱ्याच दिवशी नारायणने यासंबंधीचा एक माहितीजालावरील लेख आमच्या सर्वांसोबत शेअर केला. 


एकंदरीत लेखाचा रोख विकसित तंत्रज्ञानामुळे मानवी स्वभावाचं आणि वर्तवणुकीचे मोठ्या खोलवर विश्लेषण करण्याची क्षमता उपलब्ध होणार आहे.  त्यामुळे काही महत्वाचे बदल आपणास दिसुन येतील. पहिला म्हणजे नोकरींचं पारंपरिक स्वरुप आमुलाग्र बदलुन जाणार आणि  एखादी विशिष्ट व्यक्ती एका विशिष्ट प्रसंगात कोणत्या प्रकारे वागू शकते याचा अचूक आराखडा हे तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणार आहे.  हे तंत्रज्ञान ज्यांच्याकडे उपलब्ध आहे ते कशा प्रकारे ह्या तंत्रज्ञानाचा वापर करतील ह्यावर भविष्यातील नैतिक - अनैतिकतेच्या कल्पना अवलंबुन राहतील.  

हल्ली उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीचा वापर हा बऱ्याच वेळा अयोग्य कारणांसाठी केला जातो असे आढळुन येतं. त्याचप्रमाणे जर माणसाच्या संभाव्य वागण्याचा अंदाज बांधू शकणारी प्रणाली चुकीच्या शक्तीच्या हाती सापडली तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यताच जास्त आहे. आणि त्याहून अधिक गंभीर बाब म्हणजे माणसाच्या मनात निर्माण होणाऱ्या विचारांना त्यांच्या उगमापाशी (म्हणजेच मेंदुपाशी) रोखुन ते तपासुन पाहण्याची क्षमता यंत्रांकडे येऊ शकते असाही तर्क बांधण्यात येऊ लागला आहे.  त्याहुन पुढील बाब म्हणजे मनुष्याच्या मनात उगम पावणारा विचार त्यावर नियंत्रण करणाऱ्या शक्तीला पसंत पडला नाही तर ही शक्ती तो विचार मनापर्यंत पोहोचु देणार नाही. आणि त्याऐवजी आपल्याला सोयीस्कर विचार मनुष्याच्या यंत्रणेत घुसवून टाकणार! म्हणजे असा विचार करा की आपल्या मनात आलेला विचार हा आपला स्वतःचा आहे की आपल्यावर कोणीतरी तो लादलेला आहे अशी शंकासुद्धा निर्माण होण्यासाठी सारखी परिस्थिती भविष्यात आपल्यासमोर उद्भवू शकते. ही शंका निर्माण करण्याची क्षमता आपण बाळगुन असलो तरी मोठं स्वातंत्र्य आपणापाशी आहे असं आपण समजु शकतो. 

लेखाच्या आरंभी म्हटल्याप्रमाणे ही केवळ एक शक्यता झाली आहे आणि हे असंच होईल असं कोणीसुद्धा  छातीठोकपणे सांगु शकणार नाही. परंतु समजा ही शक्यता खरोखर प्रत्यक्षात अवतरली तर मग मात्र यंत्र / यंत्रावर नियंत्रण असणारी शक्ती आणि माणुस यांच्यात एका वेगळ्या पातळीवर संघर्ष उद्भवणार आहे. यंत्र माणसाला नियंत्रित करणार की माणूस यंत्राला नियंत्रित करणार हा संघर्ष सुरू होईल. 

पुढं एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होऊ शकते ज्यावेळी यंत्र वेगळ्या प्रकारे विचार करू शकणाऱ्या माणसांना आपलं लक्ष्य बनवतील.  म्हणजे बहुतांशी माणसे आणि त्यांचे विचार आपल्या नियंत्रणात आणणे यंत्रांना सहजशक्य होईल. परंतु काही माणसे आणि त्यांचे मेंदु आटोक्यात आणणे मात्र यंत्रांना सहजासहजी शक्य होणार नाही. अशावेळी मग सुरू होईल तो एक प्रचंड भयावह शक्यतांचा खेळ!! यात अशा नियंत्रणाबाहेरील मानवांना  विविध कठीण परिस्थितीतून जाण्यास भाग पाडणे किंवा त्यांच्यावर जीवावर बेतणारी परिस्थिती निर्माण करणे असेही प्रसंग उद्भवू शकतात.  अशावेळी यंत्रांपासून बचाव करण्यासाठी परग्रहावर पळ काढण्याची सुद्धा वेळ ह्या मानवांवर येऊ शकते. परग्रहावर पळ काढलेली माणसं आपल्याशी मैत्री बाळगणाऱ्या बुद्धिमान यंत्रांची निर्मिती करतील आणि परत पृथ्वीवर येऊन लढा सुरु करतील!

ह्या प्रकारच्या सर्व लेखांतील एक उणीव म्हणजे हे सर्व लेख सद्यपरिस्थितीचा विचार करता अतिरंजित आणि कल्पनेचे मनोरे वाटतात. ही पोस्टसुद्धा तुम्हांला बहुदा अशीच वाटणार! तसं असलं तरी तुमच्या इंटरनेट सर्फिंगचे थोडं विश्लेषण करा आणि तुम्ही काय शोधण्यासाठी / करण्यासाठी इंटरनेटवर शिरला होतात आणि सुचविल्या गेलेल्या पर्यायांमुळे तुम्ही कुठं जाऊन पोहोचलात ह्याचा आढावा घ्या! लक्षात ठेवा ही केवळ सुरुवात आहे!

भविष्यातील स्वातंत्र्यलढा असाच काहीसा असु शकतो ! स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा !

मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

MTG - विहंग विहार





आपण भारतीय आपल्या परंपरा विसरु लागलो आहोत आणि नको त्या परंपरा निर्माण करण्याच्या मागे लागलो आहोत. जसे की पावसाळी सहल म्हटली की टी-शर्ट, जीन्स, फ्लोटर्स असा पेहराव परिधान केला पाहिजे.  परंतु या रुढ होत असलेल्या पद्धतीला छेद देण्यासाठी अखिल भारतवर्षात काही महान व्यक्तिमत्व अस्तित्वात आहेत. परवाच्या पावसाळी सहलीत चक्क साडी नेसून सुगंधाताईंनी भारतीय संस्कृतीप्रति आपलं कर्तव्य पार पडलं. त्यांनी आपल्या दबावामुळे मंगलताई गाडगीळ-मांजरेकर  यांनासुद्धा साडी नेसण्याची सक्ती केली होती. अशाप्रकारे आमच्या सहलीची सुरुवात अत्यंत अनपेक्षित वातावरणात झाली. 

सहलीसाठी बोरिवली येथुन पाचजण येणं अपेक्षित होते. ज्यांच्या येण्याजाण्याच्या वेळेवरून लोकांनी घड्याळे लावावेत असे संदेश भाऊ यांनी रात्री आपण सकाळची सहा वाजून 40 मिनिटांनी सुटणारी लोकल पकडणार असल्याचे घोषित केले. संदेशभाऊ यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ! त्यामुळे संदेशभाऊंच्या शब्दांच्या धाकाचा परिणाम म्हणून पाटील कुटुंबीय अत्यंत धावपळ करीत सहा वाजून चाळीस मिनिटांनी सुटणारी लोकल पकडते झाले. त्यावेळी त्यांच्या पूर्ण डब्यामध्ये ते दोघेच होते. त्यामुळे फोटोसेशन करण्यास त्यांना सुवर्ण संधी मिळाली. 

वसई गावातून येणाऱ्या सर्व सहभागी लोकांमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण होते. बस पेट्रोलपंपावरून, तामतलाव आणि त्यानंतर पापडी तलाव मार्गे स्टेशनला येणार अशी स्पष्ट सूचना असूनदेखील काही खट्याळ / आळशी मंडळी रमेदी येथे बस किती वाजता येणार याची चर्चा करत होते.  भारतातील लोकांना जबाबदारीचे भान कधी येणार देव जाणे!! अशा प्रकारच्या प्रचंड गोंधळाला तोंड देत बस एकदाची निघाली. तोपर्यंत अंबाडी रोड येथे वर्तक आणि पाटील कुटुंबीय हजर झाले होते. आता बस प्रचंड वेगाने दातिवरे  गावाच्या दिशेने  पळू लागली.   MTG  ग्रुपमधील सदस्यांनी  हल्लीच्या काळात  कोकण, लोणावळा,   तेलंगणा अशा विविध ठिकाणी प्रवास केला असल्यामुळे त्यांनी  त्या त्या ठिकाणाहून  खाऊचे पदार्थ आणले होते.  पाटील कुटुंबीयांना आपण आणलेल्या खाऊचे आकर्षक फोटो ग्रुपवर टाकून वातावरण निर्मिती करण्याची  सवय आहे. प्रत्यक्षात त्यातील सरासरी कमाल बारा टक्के खाऊ या ग्रुपमधील सदस्यांपर्यंत पोहोचतो असे इतिहास सांगतो. परंतु त्या फोटोंच्या प्रभावाखाली येऊन बाकीची भोळी मंडळी मात्र आपण  भेट दिलेल्या ठिकाणाहून  शिस्तीत  खाऊचे अनेक पुडे आणतात . त्यामुळे उज्वलदादा यांनी आणलेली कराची बिस्किटे, हेमंतसर यांनी आणलेली लोणावळ्याहून चिक्की, राजेश मोदगेकर यांनी आणलेले वैविध्यपुर्ण लाडू ह्या खाऊवर मंडळींनी हात मारला. या सर्व प्रकारांमध्ये ज्या खाऊची मोठ्या प्रमाणात जाहिरात झाली होती ती पाटील कुटुंबीयांनी आणलेली बिस्किटे मात्र त्यांच्या बॅगमध्ये राहिली होती!!

संदेशभाऊ यांच्या पत्नी आणि पुत्र यांची  MTG सोबत ही पहिलीच भेट असल्यामुळे ओळखीचा कार्यक्रम झाला! संदेशभाऊ ह्यांच्या चेहऱ्यावर ह्यावेळी प्रचंड तणाव दिसत होता. राजेश यांचा आज वाढदिवस होता आणि बालक याने आठवड्यात आधी आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यामुळे थोड्यावेळातच  केक कुठे कापावा याविषयी चर्चेला उधाण आले होते. मावशीने साडी नेसल्यामुळे दिसेल देऊळ तिथे गाडी थांबवा  अशी ती घोषणा देत होती. परंतु ड्रायव्हरला राजेश आणि वर्षा यांनी तिकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले होते. जाणकार प्रशांत पाटील हे आपल्या या भागातील करामतीच्या कहाण्या सर्वांना ऐकवत होते.  त्यानंतर ढेकाळे गाव कुठे, वांद्री  प्रकल्प कोठे हे प्रश्न विचारून बालक त्यांना सतावत होते.  या दरम्यान मावशी आणि तिच्या असंख्य मैत्रिणी यावर तिची मुलाखत घेण्यात आली. आपल्या विविध मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी तिने विविध मैत्रिणींशी मैत्री जोडली आहे. त्यामुळे संध्याकाळी तेलकट पदार्थ खाण्यासाठी एक,  दत्तानी मॉलमधील टुकार चित्रपट पाहण्यासाठी दुसरी अशा तिच्या मैत्रिणींची यादी न संपणारी आहे. परंतु यातील एकाही मैत्रिणीने आपल्या जीवावर उदार होऊन तिला पोहायला शिकवले नाही हा खरतर मैत्रीधर्माचा घोर अपमान आहे!! 

बसने वरई फाट्यावर वळण घेतलं आणि निसर्गरम्य हिरवागार परिसर सुरु झाला. तेथील नदीवरील पुलावर बस थांबवुन नास्ता आणि फोटोसेशन करण्यात आले! सुगंधाताई ह्यांनी प्रायोजित केलेल्या स्वादिष्ट बटाटवडे आणि जिलब्या ह्यांचा मंडळींनी आस्वाद घेतला. पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं विचार करुन बस एका बाजुला आणि मौशीसकट मंडळी दुसऱ्या बाजुला असे फोटो काढण्यात आले. बिस्किटे अजूनही पाटलांच्या बॅगेत होती. 

त्यानंतर बस दातिवऱ्याच्या दिशेने प्रस्थान करती झाली.  मध्ये एक छोटासा घाट लागला आणि बसच्या बॅलन्सचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. एव्हाना मंडळी गाती झाली होती. बर्थ डे बॉय राजू यांनी किशोर कुमारची यादगार गाणी गायली. त्यांनतर सुरु झालेले उखाणे आणि गाणी ह्यांची पातळी खट्याळ, अतिखट्याळ आणि अतिअतिखट्याळ या वर्गात मोडणारी होती. वाटेत दिसलेल्या ओम टी या हॉटेलात मिळणाऱ्या लज्जतदार  चहाच्या आठवणी प्रियाताई पाटील ह्यांनी सर्वांना सांगितल्या. घाट संपला होता. आजूबाजूला दिसणाऱ्या तलाव, तळी आणि दलदल या सर्वांना पाहून मौशीला पोहण्याची येणारी खुमखुमी आणि तिचा तो उत्साह पाहून भयभीत होणारे सर अशा सर्व घटनांमधून प्रवास करीत आम्ही डोंगरे गावी पोहोचले. ज्या महान पुरुषावरून आपल्या गावाचे नाव पडले तो पुरुष आपल्या गावाच्या जवळून प्रवास करतोय हे समजताच ते गाव आणि गावकरी कृतकृत्य झाले.  

आमचं रिसॉर्टला आगमन झालं. रिसॉर्टला जावयांचे लाल गालिचा अंथरून, सुवासिनीद्वारे आरतीच्या ओवाळणीने स्वागत होईल अशी जी काही चित्रे सरांनी मनात रंगवली होती. त्याला अनुसरून काहीच घडले नाही.  त्यामुळे निमूटपणे दिलेली कुपनं घेऊन सर्व मंडळी नाश्त्याच्या दिशेने कूच करू लागली.  नाश्त्यामध्ये पोहे, मिसळपाव आणि अंडाभुर्जी होती. परंतु कांद्याच्या वाढीव प्रमाणामुळं त्याला कांदाभुर्जी म्हणावं ह्यावर सर्वांचं एकमत झालं. 

नाश्त्याचा मनसोक्त आस्वाद घेऊन मंडळी रिसॉर्ट्सचा परिसर धुंडाळण्यासाठी निघाली. सर्वप्रथम बोटिंगचा आनंद घेण्यात आला. मौशी आणि मंडळी एका बोटीत बसले आणि त्यांनी मनसोक्त बोटिंग केलं.  त्यांची बोट मध्येच दलदलीमध्ये सापडल्याने काही वेळ संकटाची परिस्थिती निर्माण झाली होती. राजू आणि वर्षा मोदगेकर यांना केवळ दोघांची बोट मिळाल्यामुळे ते झपाट्याने संपूर्ण परिसर बोटिंग करत होते.  हा इथं कालवा असून तिथं समुद्राच्या भरतीच्या पाण्याला आत घेण्यात आले आहे. त्यामुळे सुरूच्या झाडांच्या परिसरात नौकानयनाचा एक चांगला अनुभव मिळतो. बोटिंग केल्यानंतर मंडळींची दृष्टी आगगाडीच्या दिशेने वळली. मावशीने या गाडीचे फोटो आधीच इंटरनेटवरून शोधून काढले होतेआणि त्यात बसण्याचा अट्टाहास धरला होता.  जवळपास सतरा-अठरा मंडळी त्या गाडीत बसली आणि आगगाडीने प्रस्थान केलं.  परंतु इतक्या मंडळींचे वजन बहुदा त्या गाडीला पेलवलं नाही आणि गाडी रुळावरुन घसरली.  आगगाडीचा मोटरमन तात्काळ खाली उतरला आणि त्याच्यासोबत पाच-सहाजण सुद्धा खाली उतरले. खरेतर फक्त एकाला उतरण्याची गरज होती परंतु काही कारणास्तव पाच-सहा जण उतरले. रुळावर आणल्यानंतर काही वेळ आगगाडी विरुद्ध दिशेने खाली गेली. ह्यामध्ये काही वजनदार व्यक्तींचा हात होता. परंतु मोटरमनने परिस्थिती नियंत्रणात आणून आगगाडीला पुढच्या दिशेने कूच करण्यात यश मिळवले. बाकीचे का उतरले ते मला अजूनही समजलं नाही परंतु विनू मात्र आपल्या मनातील दिलवाले दुल्हनिया मधील पळत्या गाडीमधून  नायिकेला हाताने आत घेण्याच्या प्रसंगाची रंगीत तालीम करत होता. गाडी प्रतिताशी पाच किलोमीटर वेगाने धावतआहे  आणि विनु सात किलोमीटर वेगाने धावतो हे चित्र पाहण्यासारखे होते. विनू डब्याजवळ पोहोचला असता डब्यांमध्ये मावशी असल्याचे त्याला दिसले. त्यामुळे त्याने डब्यात जाण्यास नकार दिला. परंतु वसईचा सलमान खान म्हणून ओळखला जाणाऱ्या विनुने शाहरुखच्या गाण्यावर परफॉर्मन्स करावा ते मात्र मला अजिबात आवडलं  नाही. 

त्यानंतर मंडळींची पावले स्विमिंगपूलकडे वळली. स्विमिंगपूलमध्ये सूर मारू नये अशी स्पष्ट सूचना असतानादेखील वसईतील प्रसिद्ध सुरवीर सर आणि त्यांच्या मागोमाग बाकीची मंडळी यांनी स्विमिंग पूलमध्ये सूर मारून पोहण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. एव्हाना ड्रामेबाज मौशी पंजाबी ड्रेस मध्ये आली होती. तिनेसुद्धा स्विमिंग पूलमध्ये उतरण्याचा आपला अट्टाहास पूर्ण केला. त्याप्रसंगी तलावातील पाण्याची पातळी ३० - ४० % कमी झाली . पुढील एक-दोन तास ती तरणतलावामध्येच होती. या अनुभवानंतर तिची पाण्याची भीती काहीशी कमी झाली असावी. त्यानंतर पोहण्याची शर्यत सुद्धा घेण्यात आली आणि एका अटीतटीच्या लढतीमध्ये बालक यांनी सरांवर मात केली. त्या दोघांच्या वयातील फरक लक्षात घेता सरांचा हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे.  या शर्यती दरम्यान शेवटच्या पाच मीटर अंतरा मध्ये एक अनाहूत स्पर्धक पोहू लागला परंतु  राहुलने त्याला सुद्धा मागे टाकले. राहुलला भरघोस इनाम देण्यात आलं. 

त्या नंतर सर्व मंडळींनी आपल्या नृत्यकलेचे प्रदर्शन केले. भाऊंनी जे काही नृत्यकलेचे प्रदर्शन केले ते पुढील काही दशके तरी आमच्या लक्षात राहील. 





उज्वल दादा यांना तहान लागल्यामुळे त्यांनी स्विमिंग पूलच्या भोवताली असलेल्या नारळाच्या शहाळ्याचा आस्वाद घेण्याचे ठरवले. स्विमिंग पूलचे कर्मचारी त्यांच्या हातातील शहाळे पाहून काही काळ अचंबित झाले होते.  स्विमिंग पूल  मध्ये बाकीची मंडळी व्यस्त असताना जिज्ञासु मंडळींनी मात्र उज्वलदादा यांच्या ज्ञानदान कार्यक्रमात सहभागी होणे पसंत केले.  त्यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांना जीवनातील विविधांगी सत्याविषयी उज्ज्वल यांनी मार्गदर्शन केले. उज्ज्वल ह्यांना सायंकाळचे विमान पकडायचे असल्याने त्यांच्यासाठी लवकर भोजनाची व्यवस्था करावी हे मला सांगण्यात आले. 

रिसॉर्ट एकदम भरगच्च झालं होतं. जवळजवळ साडे बारा वाजले तरीदेखील मुंबईहून मंडळी येत होती. आणि त्यामुळे साधारणतः पाऊण वाजेपर्यंत लोकांचा नाश्ता चालू होता. जगदीश आणि हेमंत या दोन भावांचे (रिसॉर्टच्या मालकांचे) नियोजन कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. या सर्व मंडळींना पाऊण वाजेपर्यंत नाश्ता देऊन सुद्धा त्यांनी आमची एक वाजता दुपारचं जेवण देण्याची विनंती मान्य केली. दोन लायन (राजेश आणि जगदीश) एकत्र बसुन गप्पा मारत असल्यानं उज्जु डिअर काहीसा चिंताग्रस्त झाला होता. 

जेवणाचा मेनू नेहमीप्रमाणेच अप्रतिम होता. नॉनव्हेजमध्ये चिकनचे दोन प्रकार आणि मटनाचा प्रकार होता. ग्रामीण भागातील मटणाला आणि चिकन स्वतःची एक विशिष्ट लज्जतदार चव असते. ती यात पुरेपूर उतरली होती. तिथं खास गावाकडे मिळणाऱ्या भाकऱ्यासुद्धा होत्या. त्या सर्व जेवणाचा आस्वाद घेऊन पोट तुडुंब भरलं आहे असं वाटत असतानाच जाणकार प्रिया पाटील यांनी वाल वांग्याची भाजी अप्रतिम असण्याची आणि ती आम्ही ट्राय करावी असा आग्रह धरला. खरोखरच त्या नॉनव्हेज पदार्थाच्या जेवणानंतरसुद्धा या वाल वांग्याची भाजीची चव आमच्या जिभेवर  बराच काळ रेंगाळत  राहिली. जेवताना उज्ज्वल दादा ह्यांच्या सोबत बसलेले संदेशपुत्र संचित हे गेम खेळत आहेत हे पाहुन उज्ज्वलदादा ह्यांनी त्यांना मौल्यवान उपदेश केला. 

पोहून, नाचून आणि तट्ट जेवून दमलेली मंडळी काही काळ विश्रांतीसाठी रूममध्ये आली. बाकी सर्व आले तरी संदेश भाऊ मात्र अजूनही जेवत असावेत असा सर्वांचा कयास होता. परंतु एखादा माणूस इतका वेळ कसा काय जेऊ शकतो याविषयी लोकांनी शंका व्यक्त केली आणि त्यामुळे ते कोणत्या दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतला नसावेत ना असा संशयही व्यक्त करण्यात आला. परंतु लोकांचा संशय चिंतेत परिवर्तन होण्याच्या आधीच संदेश भाऊ परतले. 

सरांच्या चिरतारुण्याचे रहस्य असणारी वामकुक्षी घेण्याचा निर्धार मंडळींनी हाणुन पाडला. मग मात्र सरांनी मला, विनुला आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्यावरील लिहिलेल्या लेखाप्रति धन्यवादाची भावना म्हणुन आम्हांला भेटवस्तु देण्यात आल्या. मी धन्य धन्य झालो तर आपल्याबाबतीत असं काही खरोखर घडु शकतं ह्यावर विश्वास न बसल्यानं विनु बराच वेळ स्वतःला चिमटे काढून घेत होता. 

त्यानंतर पुढील काही काळ संदेश भाऊ यांनी आपल्या विजेच्या कमी बिलाची आणि आपल्या गॅस गिझरच्या बिलाची कहाणी विषद केली. महिन्याचं विजेचं बिल पाचशे रुपयाच्या आत आणि  दोन महिन्याचे महानगर गॅस बिल केवळ 116 रुपये येऊ शकते हे ऐकुन सर्व मंडळी आश्चर्यचकित आणि त्यासोबत दुःखीसुद्धा झाली. आजपासुन मी घरी स्वयंपाक करणार नाही अशा धमक्या सुद्धा देण्यात आल्या. 

बाकी इतका मोठा श्रोतावर्ग समोर उपलब्ध असल्याचं पाहुन ब्लॉगर मोकाट सुटले होते आणि त्यांनी बरीच गडबड केली. परंतु एक कजाग ह्या विशेषणाचा त्यांनी समोर बसलेल्या मातांसाठी केलेला वापर सोडुन बाकी काही दुर्धर प्रसंग ओढवला नाही. त्यांची नजर मग संचितकडे वळाली आणि नवी पिढी -जुनी पिढी ही चर्चा रंगली. ह्यानंतर मंडळी समुद्रकिनारी गेली. इथून विरार आणि अर्नाळा किल्ला ह्यांचं दर्शन होतं. 

चहापानानंतर परतीचा प्रवास सुरु झाला. परतीच्या प्रवासात पाटील कुटुंबियांनी आणलेल्या बिस्किटांचा बसमध्ये सर्वांनी आस्वाद घेतला. 
राजेशला दादरहुन दुर पल्ल्याची गाडी पकडायची असल्यानं त्यानं सफाळे इथं उतरणं पसंत केलं. राजु उतरल्यावर वर्षा विरहात असताना मौशीने मंगलला राजुच्या सीटवर बोलावलं. पुढील तास दीडतास वर्षाकडं लक्ष न देता त्या दोघी हसतखेळत गप्पा मारत होत्या. ह्या चर्चेत विस्मय, हर्ष , दुःख ह्या सर्व भावनांचं मिश्रण दिसुन येत होतं. परंतु वर्षाला त्यांनी दिलेली वागणुक काहीशी असंवेदनशील होती ह्याची राजुने एव्हाना नोंद घेतली असावी. 
वाटेत वास्ता (बांबूचं कोवळं खोड)आणि ताज्या भाज्या पाहुन मंडळी बस थांबवून खाली उतरली आणि गृहकृत्यदक्ष नवऱ्यांनी भाजी घेतली. 

संध्याकाळच्या त्या रम्य वेळी MT ग्रुपच्या एका दीर्घकाळ लक्षात राहण्याजोग्या सहलीची सांगता झाली होती. आयोजनात मोलाचा पुढाकार घेणारी सर्व मंडळी आणि दूर पल्ल्यावर जायचं असुनसुद्धा इथं आलेले उज्ज्वल आणि राजेश ह्यांचं खास आभार !!

(तळटीप - पोस्टच्या आरंभीचे चित्र जागतिक दर्जाचे छायाचित्रकार राहुल ठोसर ह्यांनी घेतलं आहे. )

शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८

ब्लॉगपोस्टचे वर्गीकरण !!



गेल्या आठ वर्षातील ब्लॉगपोस्टचे वर्गीकरण !! ह्यातील कोणत्याही पोस्टवर क्लिक करुन थेट त्या पोस्टवर आपण जाऊ शकता. 


Post Title  Categoty
CBSE, ICSE वगैरे वगैरे! अभ्यास
अभ्यास पद्धती अभ्यास
अभ्यास पद्धती भाग २ अभ्यास
परीक्षामय - भाग १! अभ्यास
परीक्षामय - भाग २! अभ्यास
परीक्षेचे दिवस ! अभ्यास
बारावी परीक्षा, जास्तीचा अर्धा तास, १० मिनिटे ! अभ्यास
माझ्या मुलाचा अभ्यास! अभ्यास
मोकळा वेळ आणि अभियांत्रिकी अभ्यास
वाढता वाढता वाढे! अभ्यास
Asian Heart Institute - एक अनुभव अवती भोवती
Happy New Book Reading अवती भोवती
Starters ते Meddlers!! अवती भोवती
WhatsApp वर्गीकरण अवती भोवती
अगम्य , अज्ञात ... अवती भोवती
अनुल्लेख! अवती भोवती
अभिमन्यु सारे अवती भोवती
अमिताभ आणि रेखाचा एकत्र हवाईप्रवास - एक कल्पनाविलास! अवती भोवती
आँखों में हमने आप के सपने सजाये हैं! अवती भोवती
आत्मक्लेश अवती भोवती
आम्ही शिफ्ट होतोय ! अवती भोवती
उदंड समीक्षक ! अवती भोवती
एका शहराची अदृश्य बाजू !! अवती भोवती
कलम ३७७ अवती भोवती
कलियुग म्हणजे काय हो भाऊ? अवती भोवती
कांदा, पेट्रोल, चेन्नई एक्स्प्रेस आणि टक्केवारी! अवती भोवती
कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या देवेंद्रा ? अवती भोवती
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार / फेररचना अवती भोवती
खंत ५०१ ची! अवती भोवती
चलनगाथा अवती भोवती
जिया खान आणि बालवयातील प्रसिद्धी / यश अवती भोवती
दडलेले प्राणी पक्षी ! अवती भोवती
देशमुखांचं पोर! अवती भोवती
नंदन नीलकेनीच्या ऐकीव राजकीय प्रवेशानिमित्त! अवती भोवती
नवं - जुनं अवती भोवती
नामवंत, सचिन आणि राज्यसभा अवती भोवती
निःशब्द ! अवती भोवती
फेसबुक, Whatsapp आणि एकाग्रता अवती भोवती
बयेचा कारनामा ! अवती भोवती
बोलघेवड्या मोटारगाड्या ! अवती भोवती
भाग्यपरिवर्तन अवती भोवती
भावनाकल्लोळ! अवती भोवती
मी whatsapp वर नाही! तुमचं काय? अवती भोवती
मी किती Predictable !! अवती भोवती
मीठचौकीचा तारणहार ?? अवती भोवती
मुंबईचा पाऊस ! अवती भोवती
मेंदुचे संरक्षण ! अवती भोवती
रिसेप्शनला उशिरानं येणारी वधु ! अवती भोवती
सचिनच्या निवृत्तीसोहळ्याचे इतर परिणाम (Side Effects)! अवती भोवती
सरमिसळ - २०१५ !! अवती भोवती
सरोगसी - एकल पालकत्व अवती भोवती
साप्ताहिक सुट्टी आणि नोकरदार वर्ग! अवती भोवती
साहेब ऊवाच! अवती भोवती
सूर्याच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांचे परस्पर रूपांतरण! अवती भोवती
हँडवॉश अवती भोवती
सलाम राहुल ! अवती भोवती, क्रिकेट
मत्स्यबाजार अवती भोवती, जीवनज्ञान
एक खंत! अवती भोवती, जुना काळ - नवा काळ
गेले ते दिन गेले! अवती भोवती, जुना काळ - नवा काळ
दुरावलेली दिवाळी ! अवती भोवती, जुना काळ - नवा काळ
४x वा वाढदिवस! आत्मचरित्र
IT मधल्या रात्रपाळ्या - भाग १ आत्मचरित्र
IT मधल्या रात्रपाळ्या - भाग २ आत्मचरित्र
गाणी - सोहमची, आईवडिलांची आणि आमच्या तिघांची ! आत्मचरित्र
दहावीची शिकवणी ! आत्मचरित्र
दिवाळीचे दिवस! आत्मचरित्र
न्यू इंग्लिश स्कूल वसई- शालेय जीवनातील आठवणी आत्मचरित्र
ब्रायटन वास्तव्य - भाग १ आत्मचरित्र
ब्रायटन वास्तव्य - भाग २ आत्मचरित्र
ब्रायटन वास्तव्य - भाग ३ आत्मचरित्र
ब्रायटन वास्तव्य - भाग ४ आत्मचरित्र
ब्रायटन वास्तव्य - भाग ५ आत्मचरित्र
ब्रायटन वास्तव्य - भाग ६ आत्मचरित्र
ब्रायटन वास्तव्य - भाग ७ आत्मचरित्र
ब्रायटन वास्तव्य - भाग ८ आत्मचरित्र
भेटीगाठी!! आत्मचरित्र
मन वढाय वढाय! - भाग १ आत्मचरित्र
मन वढाय वढाय! - भाग २ आत्मचरित्र
मन वढाय वढाय! - भाग ३ आत्मचरित्र
रम्य ते बालपण - १ आत्मचरित्र
रम्य ते बालपण - २ आत्मचरित्र
रम्य ते बालपण - ३ आत्मचरित्र
रम्य ते बालपण - ४ आत्मचरित्र
Manu's Farm House Wedding!! कुटुंब नाती
गवाक्ष कुटुंब नाती
एकोणतीस सक !! कुटुंब नाती, सामाजिक
Cricket ऊहापोह - Men Vs Boys क्रिकेट
IPL च्या मोहमयी विश्वात! क्रिकेट
कार्तिक महिमा क्रिकेट
क्रिकेट आणि निराशा क्रिकेट
क्रिकेट आणि मी (भाग १) क्रिकेट
क्रिकेट आणि मी (भाग २) क्रिकेट
क्रिकेट आणि मी (भाग ३) - सरदार पटेल कॉलेज क्रिकेट
खट्याळ वासरू ! क्रिकेट
१ ते १०० ह्या सर्व संख्यांनी पूर्ण भाग जाणारी सर्वात छोटी (?) संख्या! गणित
आगगाडीच्या गणिताचे काही प्रकार ! गणित
एकचल रेषीय समीकरणे गणित
गणित - काळ आणि काम (श्रम) गणित
गणित - काही प्रश्नोत्तरे गणित
गणित - काही भागाकार तत्वे गणित
गणिती पाढे गणित
ल. सा. वि. - म. सा. वि. - भाग १ गणित
ल. सा. वि. - म. सा. वि. - भाग २ गणित
हा खेळ आकड्यांचा!! गणित
Offline चिंतन
Bigg Boss चित्रपट मालिका गीत
Ventilator चित्रपट मालिका गीत
WELCOME जिंदगी!! चित्रपट मालिका गीत
आप यूँ फासलों से ... चित्रपट मालिका गीत
आपला मानूस चित्रपट मालिका गीत
और क्या अहद- ए-वफा होते हैं! चित्रपट मालिका गीत
कट्यार काळजात घुसली!! चित्रपट मालिका गीत
'काहे दिया परदेस' च्या निमित्तानं ! चित्रपट मालिका गीत
केळीचे सुकले बाग चित्रपट मालिका गीत
गुलजार आंधी चित्रपट चित्रपट मालिका गीत
गुलजार भाग १ चित्रपट मालिका गीत
गुलजार भाग २ - घर चित्रपट चित्रपट मालिका गीत
गुलजार भाग ३ - 'मेंरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा हैं' चित्रपट मालिका गीत
गुलाबजाम !! चित्रपट मालिका गीत
चेन्नई एक्स्प्रेस - एक सुंदर रंगरंगोटी! चित्रपट मालिका गीत
ज्युरासिक वर्ल्ड !! चित्रपट मालिका गीत
तन्नू आणि मन्नू - विवाहोत्तर प्रवास चित्रपट मालिका गीत
दो नैना और एक कहानी! चित्रपट मालिका गीत
नटसम्राट - एक सामाजिक शिकवण!! चित्रपट मालिका गीत
फक्त ....शिवाय चित्रपट मालिका गीत
लिंक रोड - दीडेक तास किशोरजींच्या सोबत चित्रपट मालिका गीत
लिंबलोण उतरू कशी - सुमन कल्याणपूर चित्रपट मालिका गीत
वो शाम कुछ अजीब थी - भाग १ चित्रपट मालिका गीत
वो शाम कुछ अजीब थी - भाग २ चित्रपट मालिका गीत
वो शाम कुछ अजीब थी - भाग ३ विद्या सिन्हा चित्रपट मालिका गीत
श्रीदेवी चित्रपट मालिका गीत
सैराट - एक विश्लेषण चित्रपट मालिका गीत
होणार जावई मी त्या घरचा! वकाव! चित्रपट मालिका गीत
एकवार पंखावरून फिरो तुझा हात! - चित्रपट वरदक्षिणा चित्रपट मालिका गीत, जीवनज्ञान
या बकुळीच्या झाडाखाली ! चित्रपट मालिका गीत, जीवनज्ञान
"मेसी" क्षण ! जीवनज्ञान
२०१७ मनन जीवनज्ञान
Avalanche जीवनज्ञान
Bariwali जीवनज्ञान
Critique जीवनज्ञान
Empathy जीवनज्ञान
Etiquette ची ऐशी की तैशी जीवनज्ञान
Fast Tracking जीवनज्ञान
Finished But Not Perfect जीवनज्ञान
GST जीवनज्ञान
HeatMap जीवनज्ञान
Multitasking जीवनज्ञान
Return of मन वढाय वढाय !! जीवनज्ञान
Valentine दिवस ! जीवनज्ञान
अंतर्मुख जीवनज्ञान
अदृश्य कॅमेरा! जीवनज्ञान
अलिप्ततावाद!! जीवनज्ञान
आकर्षक वेष्टन! जीवनज्ञान
आकाशी झेप घे रे पाखरा!! जीवनज्ञान
आतले आणि बाहेरचे जीवनज्ञान
आपले विश्व आणि आयुष्यातील टप्पे! जीवनज्ञान
आयुष्यावर बोलू काही! जीवनज्ञान
उपवास जीवनज्ञान
एक धागा ... जीवनज्ञान
एका नोटेचे महाभारत ! जीवनज्ञान
कालबाह्य !!! जीवनज्ञान
किंवा Versus आणि ! जीवनज्ञान
क्षणभंगुर ते शाश्वत जीवनज्ञान
गॅलरी! जीवनज्ञान
घोंघावणाऱ्या शक्यतांचं भेंडोळं ! जीवनज्ञान
जन पळभर म्हणतील हाय हाय! जीवनज्ञान
जागतिक महिला दिन! जीवनज्ञान
जीवनगाणे! जीवनज्ञान
ज्ञानग्रहण आणि अभिव्यक्ती जीवनज्ञान
टोमणे जीवनज्ञान
तमसो मा ज्योतिर्गमय! जीवनज्ञान
तु अशी जवळी .. जीवनज्ञान
थोरत्व - कालपरत्वे जीवनज्ञान
दडलेले सुखक्षण ! जीवनज्ञान
दीर्घ पल्ल्यांची उद्दिष्टे!! जीवनज्ञान
नववर्षचिंतन ! जीवनज्ञान
निश्चितता की अनिश्चितता ! जीवनज्ञान
पालकत्व - जुनं आणि नवं! जीवनज्ञान
मी आणि मी - एक संवाद जीवनज्ञान
यश, समाधान वगैरे वगैरे! जीवनज्ञान
यशस्वी भव! जीवनज्ञान
योग्य - अयोग्य संभ्रम !! जीवनज्ञान
योग्य करियरच्या शोधात ! जीवनज्ञान
लग्नसमारंभ आणि पेहेराव! जीवनज्ञान
लवचिकता जीवनज्ञान
वाट - हरवलेली , गवसलेली जीवनज्ञान
विक्रम आणि वेताळ जीवनज्ञान
वेगवान मार्गिका !! जीवनज्ञान
वेळेचा सदुपयोग करण्याचे काही मार्ग! जीवनज्ञान
व्यक्ती ते वैचारिक संस्था!!!! जीवनज्ञान
व्यापक दृष्टीकोन! जीवनज्ञान
व्यावसायिक मनाचा वेध! जीवनज्ञान
व्यावसायिक संज्ञा !!! जीवनज्ञान
शोध स्वः त्वाचा !! जीवनज्ञान
श्रीमंतवर्गाच्या भुमिकेतून ! जीवनज्ञान
श्रोता जीवनज्ञान
संख्यारेषा आणि मनः स्पंदने! जीवनज्ञान
संयम - आधुनिक चालीरिती जीवनज्ञान
समय तू धीरे धीरे चल ! जीवनज्ञान
सुखाचे पुनर्रव्याख्यीकरण जीवनज्ञान
सुज्ञता !! जीवनज्ञान
स्थिर विरुद्ध डायनॅमिक!! जीवनज्ञान
स्नेहसंमेलन गाथा !! जीवनज्ञान
स्व - अनुभव - फक्त दुसऱ्यांच्या नजरेतून!! जीवनज्ञान
स्वभावपैलु जीवनज्ञान
यंत्रांचे शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ! जीवनज्ञान, माहिती आणि तंत्रज्ञान
इस्त्री जुना काळ - नवा काळ
The Remains of the Day - भाग १ पुस्तक परीक्षण
अश्रू - वि. स. खांडेकर पुस्तक परीक्षण
मुसाफिर - अच्युत गोडबोले पुस्तक परीक्षण
वन नाईट @ द कॉल सेंटर - चेतन भगत पुस्तक परीक्षण
शाळा - मिलिंद बोकील पुस्तक परीक्षण
साथ सोबत! पुस्तक परीक्षण
हूल - भालचंद्र नेमाडे पुस्तक परीक्षण
२०११ मार्च केरळ सहल पुनर्लेखन प्रवास
एकवीरा देवी, महड गणपती दर्शन प्रवास
कोकण २०१८ - भाग १ प्रवास
कोकण २०१८ - भाग २ प्रवास
कोकण २०१८ - भाग ३ प्रवास
कोकण २०१८ - भाग ४ प्रवास
कोकण २०१८ - भाग ५ प्रवास
फ्लोरिडा ते मुंबई ५३ तास - प्रवासवर्ण​न भाग २ प्रवास
फ्लोरिडा ते मुंबई ५३ तास - प्रवासवर्णन भाग १ प्रवास
बर्फाळ दिवस प्रवास
वायथिरी रिसॉर्ट - वायनाड प्रवास
विमानप्रवास - मुलभूत माहिती - भाग १ प्रवास
विमानप्रवास - मुलभूत माहिती - भाग २ प्रवास
विमानप्रवास - मुलभूत माहिती - भाग ३ प्रवास
विमानप्रवास - मुलभूत माहिती - भाग ४ प्रवास
वीणा वर्ल्ड - सिंगापुर हॉंगकॉंग मकाव - भाग १ प्रवास
वीणा वर्ल्ड - सिंगापुर हॉंगकॉंग मकाव - भाग २ प्रवास
वीणा वर्ल्ड - सिंगापुर हॉंगकॉंग मकाव - भाग ३ प्रवास
वीणा वर्ल्ड - सिंगापुर हॉंगकॉंग मकाव - भाग ४ प्रवास
वीणा वर्ल्ड - सिंगापुर हॉंगकॉंग मकाव - भाग ५ प्रवास
वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस १ प्रवास
वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस २ प्रवास
वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ३ प्रवास
वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ४ प्रवास
वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ५ प्रवास
वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ६ प्रवास
वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ७ प्रवास
वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ८ - ९ प्रवास
सापुतारा प्रवास भाग १ प्रवास
सापुतारा प्रवास भाग २ प्रवास
सिमला कुलू मनाली वीणा वर्ल्ड प्रवास
अंक १, २, ३… भन्नाट
अव्यक्त भावनांचं कोंदण! भन्नाट
चंद्रवसाहत - भाग १! भन्नाट
थिजलेल्या एका क्षणी! भन्नाट
सरस्वती विद्या मंदिर १९xx बॅच मन स्पंदन
सांग सांग भोलानाथ!! मन स्पंदन
Trapped - अंतिम भाग मराठी कथा
Trapped - भाग १ मराठी कथा
Trapped - भाग २ मराठी कथा
Trapped - भाग ३ मराठी कथा
Trapped - भाग ४ मराठी कथा
Trapped - भाग ५ मराठी कथा
Trapped - भाग ६ मराठी कथा
Trapped - भाग ७ मराठी कथा
Trapped - भाग ८ मराठी कथा
अनोखी रात्र - भाग १ मराठी कथा
अनोखी रात्र - भाग २ मराठी कथा
अनोखी रात्र - भाग ३ मराठी कथा
अनोखी रात्र - भाग ४ मराठी कथा
अनोखी रात्र - भाग ५ मराठी कथा
अनोखी रात्र - भाग ६ मराठी कथा
आभास - एक काल्पनिक जग!! मराठी कथा
जाणता अजाणता - एक मनोद्वंद मराठी कथा
दुरावा - १ मराठी कथा
दुरावा - १० मराठी कथा
दुरावा - ११ मराठी कथा
दुरावा - १२ मराठी कथा
दुरावा - १३ मराठी कथा
दुरावा - २ मराठी कथा
दुरावा - ३ मराठी कथा
दुरावा - ४ मराठी कथा
दुरावा - ५ मराठी कथा
दुरावा - ६ मराठी कथा
दुरावा - ७ मराठी कथा
दुरावा - ८ मराठी कथा
दुरावा - ९ मराठी कथा
दुरावा - अंतिम भाग मराठी कथा
वारसदार - अंतिम भाग मराठी कथा
वारसदार - भाग १ मराठी कथा
वारसदार - भाग २ मराठी कथा
वारसदार - भाग ३ मराठी कथा
वारसदार - भाग ४ मराठी कथा
वारसदार - भाग ५ मराठी कथा
वारसदार - भाग ६ मराठी कथा
वारसदार - भाग ७ मराठी कथा
वारसदार - भाग ८ मराठी कथा
साद - भाग १ मराठी कथा
डेट भेट ललित
वसंत बहरत नाही! ललित
सकाळचा चहा आणि शब्दांच्या पलीकडलं ! ललित
समुद्रकिनारा ललित
१९८५ बॅच - सातत्याचे कौटुंबिक आणि सामाजिक भान !! वसई
I MISS YOU पांगारा! वसई
NPL गाथा - भाग १ वसई
आकाश पांघरुनी !! वसई
आनंदठेवा! वसई
आमच्या बँचचे स्नेहसंमेलन वसई
न्यू इंग्लिश स्कूल प्रिमियर लीग - २०१४ वसई
बावखल वसई
मस्त्यगाथा !! वसई
वर्षा वसई वसई
वसई ते मुंबई - शिक्षण , नोकरीसाठी प्रवास! वसई
वसईचा ख्रिसमस आणि बौद्धिक वसई
वसईची पिशवी वसई
वसईतील शेतीउद्योगाचे भवितव्य! वसई
होळी, वसईचे केशकर्तनालय वसई
होळीबाजार - आनंदठेवा भाग २ वसई
RT व्यक्ती आणि वल्ली !
VNU व्यक्ती आणि वल्ली !
अजातशत्रू, अष्टपैलू व्यक्तिमत्व - उज्ज्वल ! व्यक्ती आणि वल्ली !
निष्काम समाजयोगी ! व्यक्ती आणि वल्ली !
शिक्षणमहर्षी डोंगरेसर!! व्यक्ती आणि वल्ली !
Invest, Divest की Decommission व्यावसायिक जीवन
Substance Vs Style व्यावसायिक जीवन
गुंतागुंत व्यावसायिक जीवन
महाविद्यालयीन आवार मुलाखत (कॅम्पस इंटरव्यू) व्यावसायिक जीवन
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र - एका बदलत्या चित्राच्या निमित्ताने व्यावसायिक जीवन
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र - एका बदलत्या चित्राच्या निमित्ताने - अंतिम भाग व्यावसायिक जीवन
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र - एका बदलत्या चित्राच्या निमित्ताने - भाग २ व्यावसायिक जीवन
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र - एका बदलत्या चित्राच्या निमित्ताने - भाग ३ व्यावसायिक जीवन
वसईचा पाऊस आणि व्यावसायिक वर्ग ! व्यावसायिक जीवन
वसईची लाईट! व्यावसायिक जीवन
वार्षिक कामगिरीचा आढावा - Appraisal व्यावसायिक जीवन
विचारमंथन ! व्यावसायिक जीवन
व्यवसायगाथा! व्यावसायिक जीवन
शिखरमार्ग ! व्यावसायिक जीवन
शिखरापल्याड! व्यावसायिक जीवन
स्थलांतर! व्यावसायिक जीवन
‘नवे कुटुंब, नवा तोल; नवे उपाय, नवे बोल।’ सामाजिक
२०३५ - सक्रिय @ ६५ सामाजिक
Cool… अनुकूल की प्रतिकूल ! सामाजिक
Generic Medicine - चर्चासत्र सामाजिक
My Space- जागतिक महिला दिवस ! सामाजिक
PICTURE PERFECT - भाग २ सामाजिक
PICTURE PERFECT अर्थात परिपूर्ण चित्र सामाजिक
To Do List सामाजिक
आधुनिक नाती! सामाजिक
आयुष्याच्या ह्या टप्प्यावर सामाजिक
इंटरनेट ऑफ द .. - भाग १ सामाजिक
इंटरनेट ऑफ द .. - भाग २ सामाजिक
कबुतरांना दाणे देणारे अविचारी जन ! सामाजिक
कहानी घर घर की! सामाजिक
क्षणभंगुर आनंदाच्या शोधात!! सामाजिक
गाव तसा स्वभाव ?? सामाजिक
गोंधळलेला बुद्धिमान वर्ग - भाग दुसरा सामाजिक
गोंधळलेला बुद्धिमान वर्ग!! सामाजिक
ग्यान, गलका, शिराळा, कसाब सामाजिक
चौथी पास सामाजिक
जगी सर्व सुखी असा कोण आहे? सामाजिक
दोन समारंभांची एक गोष्ट! सामाजिक
दोष ना कुणाचा! सामाजिक
निरंजन - एक मन उधाण वाऱ्याचे! सामाजिक
निरंजना - घार उडे गगनी पण लक्ष तिचे घरट्याशी!! सामाजिक
पृथ्वीचा आयुष्यकाल सामाजिक
फ्लोरिडातील आक्रमक पक्षी ते बोरिवलीतील चिमणी घरटे सामाजिक
बायकोचे बोल! सामाजिक
बावखल सामाजिक
भावनिक सक्षमता - तुझं आहे तुझपाशी सामाजिक
मदिराप्राशनास समाजमान्यता सामाजिक
मनःशांती सामाजिक
मनाचा तो हळवा कप्पा!! सामाजिक
मराठी पाऊल पडते… सामाजिक
मुंबई पुणे एक्सप्रेस वे अपघात सामाजिक
मुंबईचा संभ्रम सामाजिक
मेड (Maid) इन अमेरिका ते मेड (Maid) इन बोरीवली! सामाजिक
मॉल, पिझ्झा, IPL आणि उंचावलेली जीवनशैली सामाजिक
या सुखांनो या! सामाजिक
लेक लाडकी ह्या घरची… सामाजिक
लोकसभेसाठी आम्हीच का? - राजकीय पक्षांचा एक परिसंवाद - भाग १ सामाजिक
लोकसभेसाठी आम्हीच का? - राजकीय पक्षांचा एक परिसंवाद - भाग २ सामाजिक
वटवृक्ष सामाजिक
वसंतास पत्र! सामाजिक
वाङनिश्चय (Engagement) सोहळा - एक वाढतं प्रस्थ सामाजिक
विवाह संस्था ! सामाजिक
व्यक्तिवादी दृष्टिकोन जिंकला, राज्य हरलं, रयत हरली! सामाजिक
सत्यनारायणाच्या पूजेचे आधुनिक व्रत! सामाजिक
सर्वांगीण विकासाची ऐसी की तैसी ! सामाजिक
सामाजिक जीवनातील मध्यमवर्गीयांचा सहभाग! सामाजिक
सुख शोधितो मी! सामाजिक
पर्ण, दवबिंदु . . .

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...