(संदर्भ - उत्तर अमेरिकेतील हिवाळा आणि त्यानंतरचा वसंत ऋतू. हा केवळ उदाहरणादाखल !)
मनाला उदासीन करणारा हिवाळा तोच आहे. आयुष्यातील चैतन्याच्या क्षणभंगुरतेची जाणीव करुन देणारे बर्फाचे ढिगारे तितकेच आहेत. पण आजकाल ते ही मनाला फारसे खिन्न करीत नाहीत. सहा मासांच्या त्या पांढऱ्या रंगाच्या सदैव प्रदर्शनानं मन कोशात जाऊन हरवत नाही.
नेहमीप्रमाणं तो निर्दयी हिवाळाही एका क्षणी थकुन जातो. केवळ ह्या क्षणाच्या आगमनासाठी सर्व दुःख सहन केलेले पुष्पांकुर, तृणांकूर आनंदाच्या भरात फोफावून निघाले तरीही त्यांची जीवनावरील ही अतुट श्रद्धा आजकाल मनाला मोहवीत नाही!

का कोणास ठाऊक आजकाल (मनातला) वसंत बहरत नाही! हे असे का होते हे उमजत नाही पण खंत हीच की न बहरलेला वसंत मनाला खटकतसुद्धा नाही!
हया ब्लॉग मधील वर्णन भारतीय लोकांच्या कल्पनेपालिकडील आहे कारण त्यांना असा ऋतू अनुभवायलाच मिळत नाही.
उत्तर द्याहटवा