प्रस्तावना - हा लेख मी २०१६ साली लिहिला. त्यावेळी सोहम सातव्या इयत्तेत होता. त्यामुळं बरेचसे संदर्भ त्याच्या सातवी इयत्तेतील अभ्यासक्रमाशी आणि परीक्षा पद्धतीशी निगडित आहेत.
सद्यकाळात ज्यांची चलती आहे अशा CBSE, ICSE वगैरे बोर्डात बरेचजण आपल्या मुलांना प्रवेश घेतात. ह्या पोस्टचा हेतु पुर्णपणे ह्या बोर्डांच्या विरोधात नाही. ह्या बोर्डात जाणाऱ्या मुलांना अगदी लहान वयापासून ताणतणावाला तोंड द्यावं लागतं, हा ह्या बोर्डांविषयी घेतला जाणारा मुख्य आक्षेप! जर सकारात्मक बाजु पहायला गेलं तर केवळ अभ्यासाव्यतिरिक्त बाकीच्या क्षेत्रात आवश्यक असणारे गुण (वक्तृत्व, नृत्य इत्यादी) विकसित करण्यात ही बोर्ड हातभार लावतात.
जर आपण आपल्या पाल्यास ह्या बोर्डांच्या शाळेत घातलं असेल तर त्यांना शालेय जीवनात सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या ताणतणावास तोंड देण्यास मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे. उगाचच नकारात्मक शेरे मारुन त्यांचा आत्मविश्वास कमी करु नये. बरीच शक्यता अशी आहे की आपण आपल्या लहानपणी इतक्या प्रमाणात अभ्यास केला नसणार त्यामुळे उगाचच आपल्या मुलांसमोर गमजा मारु नये!
ह्या बोर्डांच्या दोन घटक चाचण्या आणि मग सहामाही परीक्षा; पुन्हा दोन घटक चाचण्या आणि मग वार्षिक परीक्षा अशी आखणी असते. अभ्यास चालू असताना मुलांना आणि पालकांना तीन पातळ्यांवर प्रयत्नशील राहावं लागतं.
१> शालेय अभ्यास
२> वह्या पूर्ण करणे
३> प्रोजेक्ट्स
हे सर्व काही आलेखाच्या माध्यमातून दर्शविण्यासाठी मी काही गृहीतक करत आहे. एक शैक्षणिक वर्ष वर्षभरातील सुट्ट्या आणि शाळेचे उद्योग वगळता साधारणतः ९ महिने (३४ आठवडे) चालतं. त्यात एकंदरीत ६ परीक्षा येतात. दीड ते दोन आठवडे चालणारी एक परीक्षा असं लक्षात घेता १०-१२ आठवडे परीक्षेत जातात. मग प्रत्यक्ष शिकविण्यासाठी फक्त २० -२२ आठवडे उरतात. पुर्ण वर्ष ५२ आठवड्याचं आणि प्रत्यक्ष शिकविण्यासाठी फक्त २२ आठवडे हे काहीसं पटायला कठीण असलं तरी पण फार तर फार २-३ आठवड्याचा फरक असण्याची शक्यता आहे!
आता आपण प्रथम घटक चाचणी कडे वळूयात. ह्याला ही बोर्डे उगाचच काहीतरी मोठे नाव देतात. पण मराठी माध्यमात शिकलेल्या माझ्यासारख्या माणसासाठी ही प्रथम घटक चाचणीच!
प्रथम घटक चाचणी
१> शालेय अभ्यास - हा घटक आठवड्याला १० एकक ह्या वेगानं पाच आठवड्यात पन्नास एककांपर्यंत पोहोचतो. शाळेत फक्त नमनापुरतं धड्याची तोंडओळख करुन दिली जाते. बाकी सर्व मग आपल्याला घरी किंवा शिकवणीमध्ये पाहावं लागतं. पाच आठवड्यानंतर ज्यावेळी घटक चाचणी येते त्यावेळी मुलांना ही ५० एकक लक्षात असणं आवश्यक असतं.
२> वह्या पूर्ण करणे - हा घटक आठवड्याला १० एकक ह्या वेगानं पुढं जात राहतो.
३> प्रोजेक्ट्स - हा घटक आठवड्याला १० एकक ह्या वेगानं पुढं जात राहतो.
खालील आलेख हा केवळ शालेय अभ्यास लक्षात घेऊन काढला गेला आहे. त्यात बाकीचे दोन घटक समाविष्ट केल्यास तो महिना २० एककने उंचावला जाईल.
द्वितीय घटक चाचणी
१> शालेय अभ्यास - आता आपण पन्नासपासुन आरंभ करतो आणि हा घटक आठवड्याला १० एकक ह्या वेगानं पाच आठवड्यात शंभरपर्यंत पोहोचतो. पाच आठवड्यानंतर ज्यावेळी घटक चाचणी येते त्यावेळी मुलांना ही ५१- १०० ही पन्नास एकक लक्षात असणं आवश्यक असतं.
२> वह्या पूर्ण करणे - हा घटक आठवड्याला १० एकक ह्या वेगानं पुढं जात राहतो.
३> प्रोजेक्ट्स - हा घटक आठवड्याला १० एकक ह्या वेगानं पुढं जात राहतो.
खालील
आलेख हा केवळ शालेय अभ्यास लक्षात घेऊन काढला गेला आहे. त्यात बाकीचे दोन
घटक समाविष्ट केल्यास तो महिना २० एककने उंचावला जाईल.
शालेय अभ्यास सहामाही
द्वितीय घटक चाचणी संपली की साधारणतः एक दोन आठवड्यात सहामाही परीक्षा येते आणि ज्यात मुलांना १ -१०० एककांची उजळणी करता येणं आवश्यक असतं. आणि हा सर्वात तणावाचा काळ बनतो.
मी आधी ह्या बोर्डांचा मोठा टीकाकार होतो. आणि आदर्शवादी एस. एस. सी. बोर्डच कसं चांगलं ह्या बाजुने मोठ्या हिरीरीने वादविवादात भाग घ्यायचो. पण जसजशी व्यावसायिक जगातील अनिश्चिततेला अधिकाधिक तोंड द्यावं लागलं तसतसं मी माझं मत हळुहळू बदललं. पुढील आयुष्यात येणाऱ्या कठीण काळास अधिक चांगल्या प्रकारे तोंड देण्यासाठी ह्या बोर्डांत आपल्या पाल्यास टाकण्यास हरकत नाही अशा मताचा मी बनलो आहे. पण ह्या बोर्डांत आपल्या पाल्यास टाकल्यास आपल्या एस. एस. सी. बोर्डाच्या आदर्शवादी मुल्यांची सतत आपल्या मुलांस आठवण करुन देऊ नये हे लक्षात असु द्यावं.
ह्या बोर्डांच्या कार्यपद्धतीत सुधारणा आणण्यासाठी काही सुचना आहेत. इतकी लठ्ठ पुस्तके तीन तीन मजले मुलांना चढवुन न्यावी लागतात. त्याऐवजी इतक्या फी घेणाऱ्या ह्या शाळांनी मुलांना पुस्तकांच्या दोन प्रति द्याव्यात आणि एक प्रत शाळेत ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा उपलब्ध करुन द्यायलाच हवी.
सर्वागीण विकासासाठी प्रोजेक्ट वगैरे झूट आहे. ह्यात पालकांचाच आणि त्यातही आयांचाच जीव मेटाकुटीला येतो. कहर म्हणजे परीक्षेच्या दिवशी प्रोजेक्टचे सबमिशन ठेवण्याचा अविचारसुद्धा हे लोक करू शकतात.
बाकी हा सारा प्रकार पाहता ऑफिसामध्ये आपल्याकडुन असणाऱ्या अपेक्षा कधीकधी रास्त वाटू लागतात!

nice one aadu, quick one, if you get into the genesis of these boards then lot of things are clear, e.g. CBSE was essentially formed (rather reconstituted) to take care of transferable jobs of government servants, army personnel etc. and hence demanded common and uniform syllabus. ICSE was formed on the lines of Cambridge to take care of those students who want to study abroad, (there were no IB and IGCSE in India at that time) and state boards were supposed to give local flavour especially for languages and history and are relatively easy in terms of syllabus because it is suppose to address the lowermost denominator of the society. This is unique for India because of its multicultural and multilingual nature. This was primarily done to take care of literacy when we got independence. Once you know the historical perspective behind formation of these boards then things are relatively more clear.- Rajesh Save
उत्तर द्याहटवाThanks Rajesh for the insight. Yes, things do become more clear when we look into the genesis of these boards. With the changed scenario, SSC Board is no longer choice of the masses. We are still in transitional phase for this change. This new section of society (or their kids - to be more specific) are going to take more time to adopt to this demanding nature of these boards. Hence they need more morale support from their parents.
उत्तर द्याहटवाAs we see in corporate world, we always keep on chasing moving targets in not so friendly environment. And hence going through these hectic courses will definitely help the kids.
Another lesson to be remembered - we will always get a chance to fight a new battle every day, so don't get dishearten by a loss!
Thanks again for commenting
माझी मुलगी ह्या वर्षी icse दहावी झाली. स्वानुभवा वरुन सांगू शकतो काही फरक.
उत्तर द्याहटवा1)Icse, cbse अभ्यासक्रम मुलांना स्वतः विचार करून उत्तर लिहायला भाग पाडतो. घोकंपट्टी, पाठांतर, गाईड, २१ अपेक्षित प्रश्नसंच अशांचा काहीही उपयोग नाही.
२) परिक्षेत कुठलाही प्रश्न जसाच्या तसा repeat होत नाही. त्यामुळे रटटेबाजीचा काही उपयोग नाही
3) पुस्तकातील सर्व गोष्टींवरच पेपर काढलेला असतो. तरीही डोके लावून उत्तर लिहायला लागते.
4)गणितात संकल्पना समजली असेल तरच तुम्ही स्कोअर करू शकता. HOTS म्हणजे काही कठीण प्रश्न जे ssc च्या पुस्तकात सोडवून दिलेले असतात आणि परिक्षेत त्यातीलच काही येतात. असा काही प्रकार इथे नसतो. इथे कुठलेही गणित वा प्रमेय पुस्तकातील सोडवलेले नसते. हया वर्षी ssc च्या गणित पेपरात काही HOTS प्रश्न पुस्तकात न सोडवलेले आले तर केवढी बोंबाबोंब झाली.
४) मग जर एवढे जर कठीण आहे तर मग ही मुलं एवढे गुण कसे मिळवतात? कारण गुणदान पध्दत खूपच सौम्य आहे.
ह्या मुळे ही पध्दत मुलांना पुढील आयुष्यासाठी, iit, ias, साठी उपयोगी पडते
आदित्य, blog छान, ह्या विषयाबाबत बोलावयाचे झाले तर मी माझा अनुभव सांगू इच्छिते मी गेले 20 वर्ष s.s.c.school Eng.Med.ला शिकविते आहे. School Administration करत असताना विविध क्षेत्रातील लोकांशी भेटी, चर्चा होत असते. त्यातून पुढे आलेले मत,
उत्तर द्याहटवाआज सुस्थितीत असलेल्या पालकांचा कल आपल्या मुलांना I.B. , I.G.C.S.E. , I.C.S.E. , C.B.S.E. ह्या सारख्या शाळेत प्रवेश घेण्याकडे दिसून येतो. आज या सर्व शाळांचे पेव वाढलेले दिसून येते. आज मराठी मिडिअममधील पट कमी होत आहे. जबाबदार कोण? शासन व शिक्षण व्यवस्था? ह्या वर मोठी चर्चा होऊ शकेल.
Unit Test ( 2 ), 2 terms, Weekly Tests, Projects हे तर सगळीकडे आहेच. वर्षभर विद्यार्थी हया परीक्षांचे ओझे घेऊन दबलेला, विद्यार्थीदशा हरवलेला, शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबर शासनाच्या रोज नवनवीन सूचना आणि online माहिती पाठविणे हयात हरवलेला, पालक शाळा व शिक्षक यांना दोष देत मुलांना अभ्यास, Tuition, Projects, Persentage, Ranks यामागे घोड्यावर स्वार होऊन न थांबता पळायला लावतात. ( शिक्षित पालक मुलांना स्वतः शिकवतात, project करायला मदतही करतात. तर अशिक्षित पालक शाळेतील शिक्षकांपेक्षा tuition tr.वर अवलंबून असलेले ) हया सर्वांचा परीणाम मुले आपले बालपण तसेच विद्यार्थीदशा हरवून बसतात.शिक्षक अध्ययनातील मुक्तपणा हरवून सतत शासनाच्या / शिक्षण विभागातून येणाऱ्या आदेशांचे पालन करण्यात दबून गेलेला, पालक आपले पालकपण विसरून आपली मुले मागे तर राहणार नाहीत ह्याची चिंता करत ,त्यांना सतत दटावत ,प्रेमापेक्षा धाक जास्त, परिणामी मुलांपासून दूर गेलेला पालक.हे वास्तव आहे. त्याचे परिणाम हा एक मोठा प्रश्न आहे.
माझ्या मुली I.G.C.S E.(Rustomji school Dahisar ) शाळेत असून project स्वतः करतात. self study करतात. 9std.ला असल्याने math&science Tuition आहे.पण आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्नशील असतात. लागेल तेव्हा माझे मार्गदर्शन असतेच .वसईला 3 री पर्यंत C.B.S.E.ला शिक्षण घI.G.C.S.E.ला घालण्याचा माझा अट्टाहास तया मुळे
बोरिवली येथील सथलांतर.पण मागे वळून पाहताना मला आज समाधान वाटतय की माझा निर्णय योग्य होता.
विज्ञान हा विषय घेतला तर इ.6,7,8 धडे तेच आहेत पण level नुसार knowledge असल्याने मुलांचे concept clear होतात.P.C.B.होतात.P.C.B . असल्याने ,Eng.,Maths higher असल्याने S.s.c.पेक्षा ही मुले 12 ला तसेच इतर entrance exam.ला पुढे जातात. तर s.s.c.schoolला इ.10 वी मधे 95% मिळवलेला
आदित्य, blog छान, ह्या विषयाबाबत बोलावयाचे झाले तर मी माझा अनुभव सांगू इच्छिते मी गेले 20 वर्ष s.s.c.school Eng.Med.ला शिकविते आहे. School Administration करत असताना विविध क्षेत्रातील लोकांशी भेट, चर्चा होत असते. त्यातून पुढे आलेले मत, आज सुस्थितीत असलेल्या पालकांचा कल आपल्या मुलांना I.B. , I.G.C.S.E. , I.C.S.E. , C.B.S.E. ह्या सारख्या शाळेत प्रवेश घेण्याकडे दिसून येतो. आज या सर्व शाळांचे पेव वाढलेले दिसून येते. आज मराठी मिडिअममधील पट कमी होत आहे.S.S.C.Eng.Med.ची ही अवस्था बिकट होऊ पाहत आहे. जबाबदार कोण? शासन की शिक्षण व्यवस्था? ह्या वर मोठी चर्चा होऊ शकेल. Unit Test ( 2 ), 2 terms, Weekly Tests, Projects हे तर सगळीकडे आहेच. वर्षभर विद्यार्थी हया परीक्षांचे ओझे घेऊन दबलेला, विद्यार्थीदशा हरवलेला, शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबर शासनाच्या रोज नवनवीन सूचना आणि online माहिती पाठविणे हयात हरवलेला, पालक शाळा व शिक्षक यांना दोष देत मुलांना अभ्यास, Tuition, Projects, Persentage, Ranks यामागे घोड्यावर स्वार होऊन न थांबता पळायला लावतात. ( शिक्षित पालक मुलांना स्वतः शिकवतात, project करायला मदतही करतात. तर अशिक्षित पालक शाळेतील शिक्षकांपेक्षा tuition tr.वर अवलंबून असलेले ) हया सर्वांचा परीणाम मुले आपले बालपण तसेच विद्यार्थीदशा हरवून बसतात.शिक्षक अध्ययनातील मुक्तपणा हरवून सतत शासनाच्या / शिक्षण विभागातून येणाऱ्या आदेशांचे पालन करण्यात दबून गेलेला, पालक आपले पालकपण विसरून आपली मुले मागे तर राहणार नाहीत ह्याची चिंता करत, त्यांना सतत दटावत, प्रेमापेक्षा धाक जास्त, परिणामी मुलांपासून दूर गेलेला पालक.हे वास्तव आहे. त्याचे परिणाम हा एक मोठा प्रश्न आहे. माझ्या मुली I.G.C.S E. ( Rustomji school Dahisar ) शाळेत असून project स्वतः करतात. self study करतात. 9std.ला असल्याने math&science Tuition आहे.पण आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्नशील असतात. लागेल तेव्हामाझे मार्गदर्शन असतेच. वसईला 3 री पर्यंत C.B.S.E.ला शिक्षण घेतलेल्या मुलींना I.G.C.S.E.ला घालण्याचा माझा अट्टाहास. त्यासाठीच बोरिवली येथील Shifting . माझी शाळा आगाशी, Business and Office वसईला, तरीही बोरीवली हा पर्याय निवडला . मागे वळून पाहताना मला आज समाधान वाटतय की माझा निर्णय योग्य होता. S.S.C.Board व इतर board यामधील काही बाबतीत असलेला फरक- 1 -विज्ञान हा विषय घेतला तर इ.6,7,8 धडे तेच आहेत पण level नुसार knowledge असल्याने मुलांचे concept cleaहोतात.P.C.B.असल्याने, Eng. & Maths higher level असल्याने हया मुलांना त्याचा पुढे फायदा होतो . 12 std & other entrance exam.ही मुले पुढे जातात S.S.C.Board मधील मुले पाठी राहतात.
उत्तर द्याहटवा2)- इतर board मधील मुले फक्त पाठांतर न करता तो पाठ समजून आपल्या शब्दात उत्तरे लिहितात .परिक्षेत विचारलेला प्रश्न वहीत किंवा worksheet मध्ये नसतो.याउलट परिस्थिती S.S.C. board मुलांची. पाठ समजून न घेता फक्त पाठांतर करण्यावर भर देतात. पाठाखालील प्रश्न पाठ करण्यावर भर.जर परीक्षेत पाठाखालील प्रश्न न विचारता जर पाठामधील आशयावर विचारला तर ही मुले पेपर कठीण होता पाठाबाहेरील प्रश्न विचारले अशी ओरड करतात. मुलांना पाठ वाचनाची सवय नसते. -3)गुणदानाबाबतीत सांगावयाचे झाले तर मी स्वतःs.s.c.board ची माॅडरेटर असून board गुणदान सौम्य पणे केले जाते. आणखीही बरेच मुद्दे आह
S.S.C.board ने ही तशा दृष्टिने पावले उचलली आहेत.
या सर्व बाबतीत पालकांची भूमिका महत्वपूर्ण. आपली आर्थिक, शैक्षणिक, शारीरिक ,सामाजिक व मानसिक स्थिति पाहून आपल्या मुलांच्या भवितव्याचा दूरदृष्टिने विचार करून योग्य ती शाळा निवडावी.
Any Indian education system are not creating enterprenures, Conceptual thinkers. Creating only skill labours for mutinationals. Projects are namesake not real one gives children any life lessons.
उत्तर द्याहटवाWe indians by default better in maths and naturally manipulative to survive in fittest envoirnment. There are many examples even people studying in muncipalties and marathi ssc medium.
Parents paying hefty amount only for apple polishing. Actually they dont know their child is already best fruit in the world.
My experience working in multinationals indians have best of brains but wasted for yes sir and self centric attitude they cant think out of box.
Result of this education system we are 105 th out of 130 nations in human capital. We have all the resources still behind of the world.
उत्तर द्याहटवाIf we can not to do make in india, atleast should provide best of educations to create best of human capital for the world.
Just giving some task and stringent time lines we are craeting donkeys not horses.