मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, ५ जुलै, २०१७

GST



हल्ली GST च्या भयानं काहीजण चिंताग्रस्त दिसत आहेत, तर काही ज्ञानी माणसं लोकांच्या भल्यासाठी GST (गोंधळात सर्वांना टाकलं) वर सखोल अभ्यास करुन आपण मिळवलेली माहिती सर्वांना वाटण्याचं सत्कार्य करत आहेत.  वाटण्याचं हा शब्द लिहिताना वाढलेला वाटाण्याचा भाव माझं हृदय भरुन आणतो. मला आर्थिक बाबतीत फारसं काही कळत नाही. हल्ली बरेचजण  सर्व क्षेत्रात  सखोल अभ्यास करत असताना त्यातील काही समस्यांचं उत्तर मानवी भावनांच्या / व्यवहाराच्या संतुलनातून  मिळतं का हे शोधण्याचा माझा  प्रयत्न असतो. वाढत्या वयाचा हा परिणाम आहे हे बायकोचे म्हणणं मी सोयीस्कररित्या नजरेआड करतो. माझ्या दृष्टीकोनातुन GST वर मात करण्याचा हे उपाय . काही वास्तवातील तर काही मानसिक समाधान मिळवुन देणारे.


  1.  जर तुम्ही उपहारगृहाच्या एका भेटीत  (VISIT) GST मुळे तुमच्या गेलेल्या अधिकच्या १०० - २०० रुपयाने दुःखी होत असाल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. तुमची बचत योग्य ठिकाणी गुंतवली न गेल्यानं इतकेच किंबहुना ह्याच्या अनेक पटीने अधिक पैसे तुम्ही तुमच्या न कळत गमावत असाल ज्याची तुम्हांला जाणीव सुद्धा नसेल.  त्यामुळं असे अधिक १०० - २०० रुपये गमावले ह्याचं दुःख बाळगु नका. 
  2. वरील उदाहरणानं तुमचं दुःख कमी होत नसेल तर तुमची उपहारगृहाची एक फेरी कमी करा. दोन तीन महिन्यातील वाढीव GST रकमेची वसुली ह्या एका वाचवलेल्या फेरीतुन होईल. आणि घरचं सात्विक अन्न ग्रहण केल्यानं तुमच्या तब्येतीत सकारात्मक फरक पडेल. 
  3. गेल्या महिन्याभरात तुम्ही GST वरील मेसेज वाचण्यात, त्या अर्धवट ज्ञानाच्या आधारे चर्चा करण्यात जितका वेळ घालवला तोच वेळ तुम्ही ऑफिसच्या कामात किंवा कुटुंबातील सदस्यांबरोबर चर्चा करण्यात घालवला असता तर तुमची कार्यालयीन कामगिरी उंचावण्याची अथवा तुमच्या कुटुंबातील वातावरण अधिक सुधारण्याची शक्यता वाढीस लागली असती. ह्यामुळं तुमचं आर्थिक उत्पन्न वाढीस लागण्याच्या  (उदाहरण १) किंवा आर्थिक खर्च कमी होण्याच्या  (उदाहरण २) शक्यतेनं चांगलाच जोम धरला असता. 
  4. आता वळुयात ज्यांना खरोखर GST समजलं आहे. सर्वाधिक शक्यता अशी आहे की ही मंडळी अशा आर्थिक स्थितीत आहेत की GST मुळे होणाऱ्या कमी अधिकच्या मासिक १००० - २००० रुपयांच्या खर्चानं त्यांना काडीचा फरक पडत नाही. आपल्या महत्त्वाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून मग फावल्या वेळात ते जनकल्याणाचे काम करीत असतील. त्यांनी दिलेल्या उपदेशाची विविध अंग असतात जी विविध आर्थिक स्थरातील लोकांना वेगवेगळ्या प्रकारे लागु होत असतात. त्यातील आपल्याला लागू होणारं अंग ओळखता येणं आवश्यक आहे. 
सारांश - नवा काळ आपल्याला अध्यात्माचं महत्व वेगळ्या प्रकारे समजून सांगत आहे. आपलं कर्म करीत राहावं, ते आटपून आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून फावल्या वेळात मग demonetization, GST असल्या विषयांकडे लक्ष द्यावं. जर तुम्ही ही पोस्ट वाचत असाल किंवा demonetization, GST वरील व्हाट्सअँप वरील चर्चेत भाग घेत असाल तर संख्याशास्त्राच्या दृष्टीनं पाहता ह्या दोन किंवा त्या सारख्या प्रश्नांनी खरोखर प्रभावित होणाऱ्या लोकांमध्ये तुम्ही शेवटच्या १५ - २०% टक्के लोकांत असाल ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...