Sunday, October 8, 2017

मेंदुचे संरक्षण !


इथं दुचाकीवरुन प्रवास करत असताना हेल्मेट घालावं असा अर्थ अभिप्रेत नाहीय. हल्लीच्या काळातील बुद्धिजीवांची वाढती संख्या ध्यानात घेता त्यांनी आपला मेंदु सर्वोत्तम स्थितीत कसा कार्यरत राहील ह्याकडं लक्ष द्यावं ह्या अनुषंगानं हे काही शब्द! 

सकाळी आपण जेव्हा जागे होतो त्यावेळी आपला मेंदु सर्वोत्तम स्थितीत असायला हवा. जर तुम्ही सहाच्या आसपास उठत असाल तर तो अधिकच चांगल्या स्थितीत असतो असं माझं निरीक्षण ! अर्थात माझ्या मेंदुबाबत ! Make no mistake; पण आपल्या मेंदुची किमान ८५% आपल्या नोकरीधंद्याच्या / अर्थार्जनाच्या कामासाठी किंवा विधायक कामासाठी वापरण्यात यायला हवा. 

दिवस जसजसा पुढे सरकत जातो तसतसं जर तुम्ही सोशल मीडियावर गोंधळ घालण्यात वेळ घालवत असाल तर तुमच्या मुख्य कामासाठी तुम्ही आपल्या मेंदुची उपलब्ध क्षमता कमी करत असता. स्थानिक, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय कोणतीही समस्या वा घटना असो, जर त्यावर तुम्ही करणार असणारं भाष्य जर इतर शेकडो लोक करणार असतील तर तुमच्या भाष्यानं काही फरक पडणार नाही किंवा तुमच्या बौद्धिक क्षमतेविषयी असणाऱ्या इतरांच्या समजात काही फरक पडत नाही. 

जसं सोशल मीडिया तसंच हल्लीची येणारी जाडीजुडी वर्तमानपत्रे! बऱ्याच जणांना ही वर्तमानपत्रे इत्यंभूत वाचण्याची आणि त्यावर भलीमोठी चर्चा करण्याची सवय असते. मेंदुची क्षमता घरी येणाऱ्या वर्तमानपत्राचा कानाकोपरा वाचुन काढण्यासाठी एका मर्यादेपेक्षा जास्त वापरण्यात अर्थ नाही असं माझं मत ! आता मी ब्लॉग लिहिण्यात माझ्या मेंदुची काही क्षमता वापरतो आणि ती कामात वापरली तर असा तुमच्यापैकी काहीजण प्रश्न करतील तर त्याच्याशी काही प्रमाणात मी सहमत आहे. 

मेंदुला थोपटावं, त्याला विश्रांती द्यावी. आणि असा ताजातवाना मेंदु घेऊन सोमवारी सकाळी, दररोज सकाळी कार्यालयात लवकर जावं. बाकीची जनता येऊन मिटींग्स सुरु होण्याआधी अशा ताजातवान्या मेंदुने कार्यालयातील धोरणात्मक कामाचा फडशा पाडवा असे संत आदित्य म्हणतात.  

3 comments:

 1. Prashna ha aahe, kay kharach artharjnachya kamat mendu vaparala jato? Aplya kamat kalpktecha kti pramanat asate. Stratergychya nava khali adhikari mandali budhi vapadlyacha aav anatat, pan tyacha duranvaye ground relality shi sambandha asato. Budhi vachnat kiva navin shiknyat, navin challanges ghenyat nakkich vaparli jate. Ani tyachyane kharach mendut dopomin tayar hote.

  ReplyDelete
  Replies
  1. अर्थार्जनाच्या काही कामात मेंदुचा वापर होतो तर काहींत नाही. मी माझ्या मर्यादित स्वानुभवनावरुन लिहिलं.

   एक विनंती - अनामिक म्हणुन प्रतिक्रिया देण्याऐवजी नावानं दिल्यास उत्तम होईल !

   Delete
  2. अर्थार्जनाच्या काही कामात मेंदुचा वापर होतो तर काहींत नाही. मी माझ्या मर्यादित स्वानुभवनावरुन लिहिलं.

   एक विनंती - अनामिक म्हणुन प्रतिक्रिया देण्याऐवजी नावानं दिल्यास उत्तम होईल !

   Delete

वसईचा पाऊस आणि व्यावसायिक वर्ग !

गेल्या आठवड्यातील   वसई परिसरातील मुसळधार पावसामुळे तिथं पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे वसईतील दैनंदिन जीवनात आणि वसई...