दहिसर ते वांद्रा ह्या दोन उपनगरांना जोडणाऱ्या नवीन लिंक रोडवर सध्या मेट्रोचं काम जोरात चालु आहे. ह्या कामामुळं ह्या लिंक रोडवर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. माझा बोरिवली ते मालाड हा खरंतर २५ ते ३० मिनिटांचा प्रवास! हल्ली ह्याच प्रवासासाठी किमान एक तास वेळ लागत आहे. भविष्यातील सुखद प्रवासासाठी त्रास सहन करण्याची आमची नक्कीच तयारी आहे पण ह्या अंतरिम कालावधीत आखल्या जाऊ शकणाऱ्या योजना आणि काही प्रश्न मी नोंदवू इच्छित आहे.
१> एकाच वेळी पश्चिम द्रुतगती मार्ग आणि नवीन लिंक रोड ह्यावर काम सुरु करण्याच्या निर्णयामागची विचारधारा कोणी अधिकृत व्यक्ती स्पष्ट करेल का?
२> ह्या मेट्रोचं काम पुर्ण होण्याच प्रस्तावित वेळापत्रक आणि त्या वेळापत्रकानुसारची प्रगती जनतेस वेळोवेळी उपलब्ध केली जावी
३> ह्या मार्गावरील वाहतुकीचा होत असलेला खोळंबा पाहता ह्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांसाठी अधिक कालावधीसाठी हिरवा सिग्नल करणे अपेक्षित आहे.
४> एकाच वेळी पश्चिम द्रुतगती मार्ग आणि नवीन लिंक रोड ह्यावर काम सुरु झाल्यावर बऱ्याच लोकांनी पर्यायी मार्ग म्हणुन स्वामी विवेकानंद मार्गाची निवड करुन पाहिली. पण ह्या मार्गावर सुद्धा प्रचंड बॉटलनेक्स आहेत. आणि त्यामुळं तिथंही वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊ लागली आहे. स्वामी विवेकानंद मार्ग खड्डाविरहित करणं आणि बॉटलनेक्स हटवणं ह्यावर शासकीय यंत्रणेने प्राधान्यक्रमानं लक्ष पुरवायला हवं.
५> विविध कारणास्तव रस्ते खोदून ठेवणं, नाकाबंदी करणं हे प्रकार अजुनही नवीन लिंक रोडवर नेहमीप्रमाणं सुरु आहेत. मेट्रोचे काम पाहता ह्या दोन प्रकारांपासून ह्या मार्गाला मुक्तता देण्याची मी विनंती करतो.
६> सध्याच्या नियोजनानुसार रस्त्याच्या काही भागात एक मार्गिका मेट्रोच्या कामासाठी आरक्षित केली आहे. मग थोडा भाग मोकळा आणि पुन्हा आरक्षण असला प्रकार आहे. होतं काय की रिक्षावाले आणि काही कारवाले ह्या मधल्या मोकळ्या भागात वेगानं पुढे जाऊन पुन्हा मधल्या मार्गिकेत यायचा प्रयत्न करतात आणि मग समजुतीच्या अभावी शंख निनाद करताना बराच वेळ वाया जातो.
पावसाळा ३ महिन्यावर आलेला आहे. वेळीच योग्य उपाययोजना न केल्यास येत्या पावसाळ्यात ह्या मार्गावर अभूतपूर्व वाहतुककोंडी होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो ह्याची प्रशासनाने जाणीव ठेवावी हीच पूर्वसुचना ह्या पोस्टद्वारे लेखक देऊ इच्छितो

उच्चविद्याविभुषित भारतीय लोकांनी अमेरिकेत जाऊ नये असं आपणा सर्वांना वाटतं. पण सुखानं ऑफिसात जायला मिळणं हा मुलभूत हक्क आपल्याला मिळायला हवा ह्याची सरकारला थोडी तरी पर्वा असावी असं ह्या सर्वाना वाटणं स्वाभाविक आहे.
खालील छायाचित्रे मीठ चौकी सिग्नलच्या आधीची आहेत. नेहमी प्रवासास २ ते ३ मिनिटे लागतात. काल प्रवासानं ३० मिनिटं घेतली.
पावसाळा ३ महिन्यावर आलेला आहे. वेळीच योग्य उपाययोजना न केल्यास येत्या पावसाळ्यात ह्या मार्गावर अभूतपूर्व वाहतुककोंडी होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो ह्याची प्रशासनाने जाणीव ठेवावी हीच पूर्वसुचना ह्या पोस्टद्वारे लेखक देऊ इच्छितो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा