सद्ययुगात परिचित व्यक्तीला तुझे कोणते छंद आहेत अशी विचारण्याची पद्धत रुढ झाली आहे. बरेचजण आपल्या उमेदवारी अर्जातसुद्धा ह्याचा उल्लेख करतात. ह्या प्रश्नाचे उत्तर एका ठराविक धाटणीचे असतं. भारतातील ८० ते ८५ टक्के लोक वाचन, गायन ( यात बहुतांशी प्रतिकिशोरकुमार), क्रिकेट पाहणं आणि खेळणे हे छंद बाळगून असतात. आता २०१८ च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनंतर यात फुटबॉल हा सुद्धा एक छंद म्हणून समाविष्ट होत जाईल यात तिळमात्र शंका नाही.
आज आपण अशा एका व्यक्तिमत्त्वाची ओळख करुन घेणार आहोत ज्या व्यक्तिमत्त्वाला छंदाचे काही बंधनच नाही. जणु काही मुक्तछंदच! या माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलु पाहिले असता प्रत्येक ऋतुमानानुसार ती व्यक्ती वेगवेगळ्या उपक्रमात गढुन गेलेली आपल्याला आढळून येते. Ladies and Gentleman! Let me take the privilege of introducing Professor Hemant Dongre!!
माझी आणि सरांची ओळख तशी आधीपासुन होतीच. परंतु ही ओळख दृढ होण्यास कारण म्हणजे १९८५ बॅचने त्यांचं जे पहिलं स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं त्यात त्यांनी मलासुद्धा बोलावलं. त्यांनी मला नक्की का बोलावलं हे मला अजून समजलेलं नाही. प्रस्तावनेच्या भाषणात सरांनी त्यांच्या शालेय जीवनातील काही आठवणी सांगितल्या. त्यात अनघाला शाळेच्या प्रत्येक वर्षी पहिल्या बाकावर का बसवलं गेलं याविषयी त्यांच्या मनात असलेल्या खंत /असुया वगैरे भावनांचं मिश्रण त्यांनी प्रत्यक्ष बोलून दाखवलं. त्यानंतर मीसुद्धा स्टेजवर जाऊन काहीतरी बोललो. काय बोललो ते नक्की आठवत नाही. परंतु त्यानंतर मात्र मला 1985 बॅचच्या एकाही कार्यक्रमास पुन्हा कधी बोलवण्यात आले नाही!असो !!
माझ्या नात्यामध्ये सरांचे काही विद्यार्थी पसरलेले आहेत. सर भौतिकशास्त्र चांगलं शिकवितात हे मत त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सातत्यानं दिसुन येतं. बाकी काही विद्यार्थी त्यांना अनिल कुंबळे या नावाने सुद्धा ओळखत असत हे ऐकिवात आहे.
हेमंतच्या चिरतरुण प्रतिमेमागे त्याच्या धर्मपत्नीचा खूप मोठा वाटा आहे. ते जेव्हा वसईत असतात त्यावेळी त्यांना दोन्ही वेळी घरगुती जेवण ते जिथे असतात तिथं पोचवण्यात येतं. ते घर सोडून कितीही वेळ बाहेर भटकत असले तरी त्यांना घरी फारसा ओरडा मिळत नसावा असे मानण्यास एकंदरीत परिस्थितीजन्य पुराव्यानुसार वाव आहे. त्याच्या ८५ बॅचमधील सहाध्यायी मुलींचे (???) सौ.डोंगरे अत्यंत आपुलकीने आदरातिथ्य करत असल्याचं ऐकिवात आहे.
माझ्या नात्यामध्ये सरांचे काही विद्यार्थी पसरलेले आहेत. सर भौतिकशास्त्र चांगलं शिकवितात हे मत त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सातत्यानं दिसुन येतं. बाकी काही विद्यार्थी त्यांना अनिल कुंबळे या नावाने सुद्धा ओळखत असत हे ऐकिवात आहे.
हेमंतच्या चिरतरुण प्रतिमेमागे त्याच्या धर्मपत्नीचा खूप मोठा वाटा आहे. ते जेव्हा वसईत असतात त्यावेळी त्यांना दोन्ही वेळी घरगुती जेवण ते जिथे असतात तिथं पोचवण्यात येतं. ते घर सोडून कितीही वेळ बाहेर भटकत असले तरी त्यांना घरी फारसा ओरडा मिळत नसावा असे मानण्यास एकंदरीत परिस्थितीजन्य पुराव्यानुसार वाव आहे. त्याच्या ८५ बॅचमधील सहाध्यायी मुलींचे (???) सौ.डोंगरे अत्यंत आपुलकीने आदरातिथ्य करत असल्याचं ऐकिवात आहे.
पट्टीचे पोहणारे !!
पावसाळ्याच्या मोसमात वसईतील काही मंडळी पाण्यानं तुडुंब भरलेल्या विहिरीमध्ये आपल्या पोहण्याच्या कलेचे प्रदर्शन विनाशुल्क करत असतात. ह्यात केवळ पोहणे समाविष्ट नसुन विहिरीच्या काठावरुन मारलेल्या विविध डायविंग प्रकारांचा समावेश होतो. हेमंत ह्यांनी मारलेली ही "निरागस सूर". हे बहुदा २०१६ सालातील चित्र आहे. त्यावेळी हा सर्व ग्रुप २०२० ऑलिम्पिकमध्ये synchronized swimming ह्या क्रीडाप्रकारात भाग घेण्याचा विचार करत होता. ह्या प्रतिमेतील डाव्या बाजुचे सुरमारे डोंगरे सर आहेत.
त्यांच्या ह्या प्रसिद्धीमुळे वसईतील काही वजनदार व्यक्ती त्याच्याकडे पोहण्याची शिकवणी लावण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु वजनदार व्यक्ती आणि भौतिकशास्त्राचे नियम ह्यांची पाण्यात कशी सांगड बसेल ह्याविषयी खात्री नसल्यानं हेमंत ह्या बाबतीत चालढकल करताना आपल्याला आढळुन येतोय !
त्यांच्या ह्या प्रसिद्धीमुळे वसईतील काही वजनदार व्यक्ती त्याच्याकडे पोहण्याची शिकवणी लावण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु वजनदार व्यक्ती आणि भौतिकशास्त्राचे नियम ह्यांची पाण्यात कशी सांगड बसेल ह्याविषयी खात्री नसल्यानं हेमंत ह्या बाबतीत चालढकल करताना आपल्याला आढळुन येतोय !
पंडितांच्या शब्दात सांगायचं झालं तर ...
"सूर निरागस हो" हे गाणे तर गळ्यातील सूर नाही तर सरांची विहिरीतील सूर पाहूनच लिहिले असणार अशी मला नक्की खात्री आहे. पट्टीचे पोहणारे सर अवघ्या महाराष्ट्राचे ते सुर सम्राट आहेत. इतकेच काय वसईच्या थोर समाजसेविका भगिनी सुगंधा मौशी जोशी सुतारआळीकर यांना विहिरीत पोहायला शिकवण्याची भीष्म प्रतिज्ञा सरांनी केली आहे.
आपलं पोहण्यातील कौशल्य विविध खंडात सिद्ध व्हावं ह्यासाठी अमेझॉन जंगलासारख्या दुर्गम ठिकाणी पोहण्यास जाण्यास सर अजिबात कचरत नाहीत.
"सुरमई" सम्राट
पुन्हा एकदा पंडितांच्या शब्दात
वसई नायगांव कोळीवाड्यातील मासळी बाजार करोडोंची उलाढाल करतो. त्यातही सरांचा मोठ्ठा वाटा आहे. अनेक मित्रमंडळींना एकत्र करून ते मासळी विकत घ्यायला जातात. त्यांना आठवड्याला (हो आठवड्याला) पुरेल इतकी तब्बल २० ते २४ हजारांची मच्छि ते स्वतःसाठी घरी घेऊन येतात. त्यामुळेच मच्छिमार समाजाने राज्य सरकारकडे अखिल भारतीय मच्छि विक्रेता संघाने सरांना ब्रँड अँबेसिटर करण्याची मागणी करत त्यांना राज्य मंत्र्यांचा दर्जा देण्याची विनंती केली आहे. तसेच त्यांचे पोहतानाचे सूर पाहून आणि सर्वात आवडती मच्छिवरून त्यांना "सुरमई" सम्राट अशी उपाधी देखील दिली आहे.
फोटोत जरी पापलेट दिसत असले तरी पंडितांच्या शब्दावर विश्वास ठेवायला हवा. त्यांच्या ह्या मासे खाण्याच्या अफाट क्षमतेमुळं काहीसा असुयाभाव निर्माण झालेला त्यांचा मित्रवर्ग "आठवड्याला एवढे मासे खाणारा 'असूर' वर्गात येऊ शकतो" अशा शब्दांत त्यांची संभावना करतो.
जागतिक दर्जाचे बॅडमिंटनपटू
एकदा मी प्रोफेसरांना प्रश्न विचारला होता. वसईतील तुमचं नामांकन कितवे असावं ? सरांच्या बॅडमिंटन वर्तुळात त्यांना हरवणारे एक - दोघंजण असावेत. त्यामुळं त्यांनी आत्मविश्वासानं उत्तर दिलं - तिसरं ! माझ्या चेहऱ्यावरील भाव पाहुन त्यांनी मनोमनी एक चंग बांधला असावा. यंदाच्या मे महिन्यात त्यांनी वसईत एका बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन करुन त्यातील तीन-चार स्पर्धा प्रकारातील विजेतेपदं पटकावली. त्यामुळं आता त्यांना वसईतील जागतिक दर्जाचे बॅडमिंटनपटु असं कायम संबोधण्यात येईल.
हौशी सायकलस्वार
आपल्या बॅडमिंटन कौशल्याला पुरक म्हणुन त्यांनी गेल्या काही वर्षात सायकलस्वार होण्याचं मनावर घेतलं आहे. आपल्या जिवलग मित्रांसोबत नोव्हेंबर - मे महिन्यात ते बरेच वेळा वसईच्या निसर्गरम्य भागात सायकलस्वार बनुन हिंडताना दिसतात.
हौशी क्रिकेटपटु
सरांच्या अंगी विनम्रपणा ओतपोत भरला आहे. आपण काही उत्तम क्रिकेटपटु नाहीत हे ते सांगत असले तरी ८५ बॅचच्या अतिउत्साही मित्रांमुळं त्यांना दरवर्षी NPL मध्ये सहभागी व्हावं लागतं. ८५ बॅचचा क्रिकेट संघ म्हणजे सचिन पाटणकर ह्या सुप्रसिद्ध क्रिकेटपटुवर आधारित एकखांबी तंबु ! सर सचिनला सदैव साथ देताना दिसुन येतात! वरील फोटोत खरंतर ते non-striker end ला उभे आहेत पण कॅप्टनला साथ द्यायला हवी ही भावना मनात इतकी दाटुन आली की त्यांनी तिथंच फलंदाजीचा पवित्रा घेतला !
धाडशी स्वभावाच्या छटा !
सरांचा स्वभाव तसा मुळचा धाडशी नसला तरी त्यांनी मध्यंतरी प्रचंड धाडस केलं होतं. आपल्या मित्रांसोबत ते एकटे बँकॉकला जाऊन आले. तिथल्या जीवनाचा अनुभव घेतला आणि नंतर तिथल्या रोचक अनुभवांवर त्यांनी चक्क ब्लॉग लिहिला ! ह्या धाडसाबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच !
सर्पमित्र
आपल्या सामाजिक कार्याच्या निमित्तानं सर महाराष्ट्रभर फिरत असतात. अशा दौऱ्यांमध्ये ते जेव्हा संधी मिळेल तेव्हा विविध सर्पवर्गातील प्राण्यांशी भय न बाळगता संपर्क साधताना दिसतात.
प्रकाश आमटेंसोबत!!
सरांनी धरलाय तो प्रसिद्ध बँडेड क्रेट, नागाच्या अनेक पट विषारी
सामाजिक कार्य
सरांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग आहे. ८५ बॅच आणि वसईतील सामाजिक संघटनांच्या माध्यमातुन ते विविध सामाजिक उपक्रमात सहभागी असतात. काही वर्षांपुर्वी त्यांनी "स्वरानंदवन" ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातुन आनंदवन उपक्रमासाठी निधी उभारुन देण्यास मदत केली होती.
परंपरेला झुगारुन देणारा
सर भौतिकशास्त्र आणि गणित ह्या विषयांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अध्यापन करतात. ह्या क्षेत्रात राहुन म्हणुन की काय त्यांच्यामध्ये वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरांना आव्हान देण्याची वृत्ती दिसुन येते. आणि केवळ बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असं न होऊ देता त्यांनी आपल्या स्वतःच्या वर्तवणुकीद्वारे ह्याचा आदर्श घालुन दिला आहे.
लोकल प्रवासाचा धसका
लोकल ट्रेनच्या प्रवासाविषयी मात्र सरांनी काहीसा धसका घेतला असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून आढळून येते. बराच वेळा वसई स्टेशनवर स्टेशनच्या पुलावर ते विरारच्या दिशेने टक लावून पाहत असल्याचे आढळुन आले आहे. शेवटी बऱ्याच गाड्या सोडून दिल्यावर ते परत आले आहेत. या सर्व बातम्यांची अफवा म्हणून ते बोळवण करतात. आणि त्यावर पुरावा म्हणून क्वचितच केलेल्या हेसुद्धा दुपारच्या कमी गर्दीच्या वेळी रेल्वे प्रवासाची चित्रे हे विविध व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित करतात.
उत्तम बल्लवाचार्य
सर पेशानं आचार्य असले तरी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी मात्र ते बऱ्याच वेळा आपल्या पाककलाकौशल्याचे घरी प्रदर्शन करतात. आणि व्हाट्सअँपवर आपल्या मित्रांना त्याचा आनंद लुटण्याची संधी देतात. त्यांनी स्वहस्ते बनविलेल्या (त्यांच्या म्हणण्यानुसार) मसालेदार चिकनचे हे छायाचित्र!
उत्तम गायक
सर उत्तम गायक आहेत. आपल्या ८५ बॅचच्या सहकाऱ्यांच्या सानिध्यात असले की उत्तमोत्तम गाण्यांचा नजराणा ते पेश करतात. त्यांच्या बॅचमधील मुकेश ह्यांच्या साथीनं त्यांनी अनेक मैफिली गाजवल्या आहेत. काही तांत्रिक कारणांमुळं ह्याचा पुरावा सादर करु शकत नाही.
सरांची वाटचाल वसईतील एका प्रसिद्ध वैचारिक व्यक्तिमत्वाच्या दिशेनं चालु असुन बऱ्याच वेळा त्यांना वसईतील सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणुन अगत्याचं आमंत्रण असतं !
त्यांच्या एका हितचिंतकाच्या शब्दांत सांगायचं झालं तर !
उदयनराजे आणि आइन्स्टाइनसारखे दिसणारे तसेच त्या दोन्ही व्यक्तींसारखेच अनुक्रमे भारदस्त आणि हुशार असणारे शिक्षण महर्षी, संतशिरोमणी हेमंत डोंगरे सर माझे चांगले मित्र असणे हे खरं तर माझ्यासाठी अहोभाग्य
हे सर्व झाले सरांच्या बहुरंगी व्यक्तिमत्वाचे काही पैलु !! आता वळुयात त्यांच्या सर्वात महत्वाच्या पैलूंकडे ! हा असा पैलु ज्यामुळं एक खराखुरा मित्र, सल्लागार म्हणुन त्यांच्याकडं अनेकजण पाहत असतात.
उत्तम मित्र /सल्लागार / स्थितप्रज्ञ
त्यांच्या जवळच्या सुहृदांनी व्यक्त केलेल्या त्यांच्याविषयीच्या प्रतिक्रिया ...
१००% विश्वास वाटावा असा मित्र
बोलतो खूप, चिडवतो खूप... पण करतो खूप ... गरज असेल ते तो करतो
मला त्याचा रोखठोकपणे बोलण्याचा प्रकार आवडतो . आणि तो जे बोलतो ते करतो हे नक्की आहे
वेळ , पैसा, मेहेनत सर्व बाबतीत तयारी असते. Only thing we all fear
तो कधी काय बोलेल नेम नाही बरं बोलतो ते एकदम correct असतं
Open minded Outspoken
Open minded Outspoken
धन्य भाग हमारे जो आप ने हमें गुरुदेव की शान मे कुछ कहने का मौका दिया!!!
पुन्हा एकदा पंडित उवाच !!
सरांचा स्वभाव. ते हुशार, बुद्धिमान, नेहमी शांत स्वभावी तसेच ते नेहमी हसतखेळत आणि आनंदी असतात आणि महत्वाचं म्हणजे ते विनोदी देखील आहेत. चर्चेत, गप्पात नर्मविनोद जोक, मजा मस्करी यामुळे आमचे स्वभाव जास्त जुळले. एक राजकारण सोडले तर आमच्यात मतभेद अगदी नाहीच. शिक्षकांना सातवा वेतन आयोग मिळण्यामागे सरांचे मोलाचे परिश्रम आहेत. भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असूनही मराठी भाषेवर त्यांचे जबरदस्त प्रभुत्व आहे. लिखाण, भाषाशैली प्रभावी आहे. विनोदी स्वभाव ही तर त्यांची खासियत. ते शिक्षणासोबतच अनेक क्रीडा प्रकारात ते रुची ठेवून आहेत. बॅडमिंटन मध्ये तर वसईचे प्रकाश पडुकोणच. बुद्धिबळ, कॅरम, रायफल शूटिंग ह्यात ही वाकबगार.
अफाट बौद्धिक खजिना असलेले, प्रचंड आर्थिक सुबत्ता असलेले सर तितकेच सेवाभावी. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी हातभार असतो.
अशा या आमच्या सदाबहार सरांनी यशाचे उत्तमोत्तम डोंगर पार करोत ही ईश्वरचरणी प्रार्थना..
वरील प्रतिक्रिया सरांचा जनमानसावर असलेला पगडा अधोरेखित करतात. सर दोस्तों के दोस्त आहेत. सर आणि PM ह्यांची मैत्री अखिल महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. सरांच्या मैत्रीला PM सुद्धा दिलदारपणे दाद देतात. PM ह्यांच्या वाडीतील हिरव्यागार भाज्यांपैकी काही भाज्या होळी बाजारात पोहोचण्याआधी सरांच्या किचनमध्ये स्वखुशीने विसावतात! सरांसोबत PM च्या विहिरीत पोहण्यास गेलेले त्यांचे विविध वयोगटातील मित्रसुद्धा प्रसंगी PM ह्यांच्या दानशुरतेचे लाभार्थी होताना दिसतात. अशाच एक बालवर्गातील लाभार्थीच्या घरी बनलेली केळफुलाची भाजी !
साहजिकच आहे की ही पोस्ट खुपच लांबली तरी बरंच काही बाकी असल्यासारखं वाटतंय ! सरांचे व्यक्तिमत्व आहेच तसं व्यापक ! ह्या पोस्टने प्रेरणा घेऊन ८५ बॅच आता सरांवर पुस्तकच लिहेल असं मला वाटतंय! पंडितांच्या म्हणण्यानुसार ब्लॉगमध्ये व्यक्तिमत्व मावणे शक्य नसल्याने NES ८५ बॅच सरांचा बायोपिक सिनेमासुद्धा बनवु शकते. आणि ही बातमीवर शिक्कामोर्तब होण्याआधीच सरांची भुमिका कोणी वठवायची ह्यावरुन वादही सुरु झालेत म्हणे !!
बायोपिक किंवा पुस्तकात टाकण्यासाठी उपयोगी पडू शकणाऱ्या सरांच्या काही आकर्षक मुद्रा !!
Very nice जी माहिती पट सांगितलं ते तर खरच आहे पण अजून काही गुण उजेडात आले नाही ते पण लवकरच शोधू या bsp
उत्तर द्याहटवाvihiricha ullekh kela aahe tya vihiri kuthe aahet
हटवावा सुंदर लेख
उत्तर द्याहटवायोगायोगाने 85 च्या बॅच चा मी ही वसईचा विद्यार्थी, जव्हार सारख्या दुर्गम भागातून शिक्षणासाठी वसई आलो असता पहिला भेटलेला मित्र, तुझ्या घरात माझा घरातल्यासारखा वावर, वसई मध्ये घरापासून दूर राहण्याची स्फूर्ती तू दिली मित्रा, एकत्र अभ्यास करणे, विहिरीमध्ये पोहणे, क्रिकेट खेळणे, सायकल वर भटकणे नित्याचे होते. शालेय जीवनापासून सकारात्मक वृत्ती, प्राध्यापकी पेशाने अखंड तरुणाईत ठेवले आणि मित्रा तरुणाई तू जगतोस, आजही तो तसाच हरहुन्नरी मिश्किल स्वभाव, त्याला समाज कार्याची जोड. पु ल देशपांडे ना भेटला असता तर कदाचित व्यक्ती आणि वल्ली मध्ये एक पात्र वाढले असते. असो लिखाण हा माझा पिंड नाही, पण गेली 33 वर्ष अखंड मैत्री जोपासतोय त्यासाठी मित्रा सलाम, मित्रा जिंकलस आम्हाला. भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
उत्तर द्याहटवासंजय जाधव
तुझा मित्र