मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, १५ मार्च, २०१६

व्यापक दृष्टीकोन!

व्यावसायिक जीवनात एखाद्या प्रश्नाचे विश्लेषण करण्यासाठी Tops Down आणि Bottoms Up अशा दोन पद्धती अवलंबिल्या जातात. Tops Down पद्धतीत सर्वसमावेशक चित्रापासून विश्लेषणास सुरुवात करून मग हळुहळू आपण एका विशिष्ट भागापर्यंत पोहोचतो. ह्याउलट Bottoms Up ह्या पद्धतीत आपण एका विशिष्ट छोट्या भागापासुन सुरुवात करून त्या प्रश्नाच्या व्यापक भागाकडे पोहोचतो. 
हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे गेल्या आठवड्यात अंतराळात वर्षभर राहुन परतलेल्या स्कॉट केली ह्याने अंतराळातून जी प्रतिमा घेतली त्यात आशियावरील प्रदुषण अंतराळातून अगदी स्पष्टपणे दिसत असल्याचे नमुद केले आणि ते छायाचित्रसुद्धा प्रसिद्ध केले. हा झाला Tops Down दृष्टीकोन. 

आपल्याला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांची अशी Tops Down दृष्टीकोनातून सामोरी येणारी प्रतिमा खालील प्रमाणे!

१> भारतातील बहुसंख्य भागातील वृक्षवल्लींच्या हिरव्या भागाने व्यापलेल्या क्षेत्राची गेल्या शतकातील प्रत्येक वर्षाची आकडेवारी घेतली आणि तिचा आलेख काढला तर हे हरितक्षेत्र किती झपाट्याने कमी होत आहे हे आपणास तात्काळ जाणवेल

२> भारतातील प्रत्येक शहरातील लोकसंख्येची गेल्या शतकातील प्रत्येक वर्षाची आकडेवारी घेतली आणि तिचा आलेख काढला तर आपल्या देशातील लोकसंख्येचे शहरात कसे केंद्रीकरण होत आहे ते जाणवेल

गेल्या शतकातील प्रत्येक वर्षाच्या आकडेवारीनुसार आलेख काढण्यासाठी अजुन बरेच घटक आहेत
३> भारतातील शिक्षित लोकांची संख्या 
४> भारतातील उपलब्ध नोकरीधंद्यांची संख्या आणि विविधता 
५> भारतातील विविध शहरातील प्रदुषणाची पातळी 
६> भारतातील संगणकाची / भ्रमणध्वनीची व्याप्ती आणि ह्या माध्यमावर भारतातील सर्वसामान्य व्यक्ती व्यतीत करत असणारा सरासरी वेळ.

आता होतं असं की आपण एक व्यक्ती म्हणुन समाजात वावरताना वरील बदलत्या घटकांमुळे आपल्याला येणाऱ्या अनुभवात बदल होत जातो. पण ह्या बदलत्या अनुभवांना कारणीभुत असणाऱ्या वरील घटकांकडे व्यापक दृष्टीने पाहण्याची आपली बऱ्याच वेळा तयारी नसते. ज्या लोकांच्या बाबतीत सर्वसाधारणतः चांगलं घडत असतं त्या व्यक्तींच्या मनात स्वयंविषयी श्रेष्ठत्वाची भावना निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. पण ह्या मध्ये वरील उल्लेखलेल्या घटक ४ अर्थात भारतात उपलब्ध असणाऱ्या नोकरीधंद्याच्या वाढत्या संख्येचा, विविधततेचा वाटा आहे हे मान्य करण्याची मानसिकता क्वचित दिसुन येते
घटक १,२, ३ आणि ५ आपल्या जीवनात आरोग्यविषयक समस्या निर्माण करत आहेत. जोवर आपण शहरात राहण्याचा हट्ट धरणार तोवर ह्या समस्या छोट्या मोठ्या प्रमाणात आपला पिच्छा पुरवत राहणार. एखाद्या गावात राहून कमी पगार मिळाला तरी चालेल पण मला शुद्ध हवा, पाणी आणि पालीभाजा हवेत असा निर्णय घ्यायची आपली जोवर मानसिकता नाही तोवर समस्या राहणार
घटक ६ हा आपल्या मुलांच्या, जीवनसाथीदाराच्या आणि आपल्या नात्यांवर परिणाम करू शकतात
शेवटी मी म्हणजे कोण? ह्या भल्यामोठ्या वाढत्या गर्दीत सोडला गेलेला एक जीव! त्यात त्याला हव्या असणाऱ्या गोष्टी मिळविण्यासाठी तो आपल्या परीने प्रयत्न करणार आणि त्यावेळी त्याला आपलं कर्तव्य बजावताना आजुबाजूची परिस्थिती बरेच अडथळे निर्माण करणार. ह्यातील काही परिस्थितीजन्य असणार तर काही जाणीवपुर्व निर्माण केले गेलेले असणार. ह्या भल्यामोठ्या दुनियेत काही चांगल्या घटना घडणार तर काही वाईट घटना घडणार. आपल्या बाबतीत चांगलं व्हावं , वाईट गोष्टी आपल्या वाट्याला येऊ नये ह्यासाठी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपण प्रयत्न करू शकतो. पण वाढत्या लोकसंख्येने सरसकटपणे चांगल्या किंवा वाईट गोष्टी संपूर्ण समाजाला लागू पडण्याची शक्यता वाढीस लागते. चांगल्या गोष्टी म्हणजे वाढत्या संधी आणि वाईट गोष्टी म्हणजे बदलत्या जीवनशैलीने ओढवणारे आजारांचे प्रमाण त्यामुळे काही चांगलं घडलं म्हणून उगाच हरबऱ्याच्या झाडावर चढून बसण्याचे अथवा काही वाईट घडलं म्हणून कोण्या बुवाच्या मागे लागण्याचे कारण नाही! शांतपणे http://patil2011.blogspot.in/ हे संकेतस्थळ उघडावे आणि जीवनरहस्य उलगडून घेण्यासाठी योग्य पाऊल उचलावे! :)

1 टिप्पणी:

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...