मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, ८ मार्च, २०१६

जागतिक महिला दिन!

आज ८ मार्च - जागतिक महिला दिवस! आज सकाळपासुन ह्या संदर्भात विविध संदेश येऊ लागलेत. सर्व संदेशातील मुद्दे अगदी मान्य! घरच्या जबाबदाऱ्या सांभाळुन व्यावसायिक जबाबदाऱ्या सुद्धा यशस्वीपणे सांभाळणारी स्त्री नक्कीच कौतुकास पात्र आहे. पण ह्या सर्वांना दुसरी बाजू सुद्धा आहे.  ह्या सर्वाची सुरुवात झाली ती कार्यालयात! Diversity च्या नावाखाली स्त्रियांना कार्यालयात समान संधी उपलब्ध करून द्याव्यात असा जो उपक्रम चालवला जातो त्या बाबतीत काही स्त्री व्यवस्थापकांनी नाराजी व्यक्त केली. त्यांची नाराजी होती ती Diversity ह्या शब्दाच्या वापराला! आम्ही पुरुषांपेक्षा काहीतरी वेगळे आहोत हे सतत जाणवुन देण्याचा प्रयत्न हा शब्द करतो अशी त्यांची भावना होती. आम्हांला हे स्थान आमच्या पात्रतेमुळे, आमच्या मेहनतीने मिळालं त्याविषयी काहीसा संदेह हे सर्व उपक्रम करतात असा काहीसा सुर त्यांनी व्यक्त केला. मला त्यांचं म्हणणं अगदी मनापासुन पटलं. असाच काहीसा सुर रविवारी एका पेपरात वाचावयास मिळाला. "आपल्याला खरोखर जागतिक महिला दिवसाची गरज आहे का?" असा प्रश्न त्यात व्यक्त करण्यात आला होता. 
जर तुम्ही स्त्री असाल आणि ही पोस्ट वाचत असाल तर बऱ्यापैकी अशी शक्यता आहे की तुम्ही आपलं जगणं कसं जगायचं हा निर्णय घेण्यात पतीसोबत, नातेवाईकांसोबत व्यवस्थित चर्चा करून मगच ही जीवनपद्धती स्वीकारली आहे. सर्व काही आलबेल आहे असं नसेल ही पण तुम्ही परिस्थिती बदलण्यासाठी सतत आपल्या साथीदाराशी, ऑफिसातील सहकाऱ्यांची चर्चा करुन योग्य दिशेने पावलं उचलत आहात. 


पोस्टचा मुख्य मुद्दा! 
१> समाजातील ज्या वर्गाला खरोखर जागतिक महिला दिवसानिमित्त प्रसारित केल्या जाणाऱ्या संदेशांची, बदलांची गरज आहे, त्या वर्गापर्यंत सध्या जे उपक्रम आयोजित केले जातात त्यातील बहुतांशी पोहोचत सुद्धा नसणार! त्यातील बहुतेकींना आज जागतिक महिला दिवस आहे ह्याची जाणीव सुद्धा नसणार! आपण एका दिवसात ह्या वर्गापर्यंत पोहोचू शकू अशी अपेक्षा करणे चुकीचं आहे. माझं म्हणणं एकच - मला अभिप्रेत असलेल्या ह्या महिला वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही उपक्रम सध्या राबवले जात आहेत त्यांना अधिकाधिक प्रसिद्धी देण्यासाठी आपण प्रयत्न करूयात! 

२> काही संवेदनशील बाबी जशा की घरगुती हिंसाचार, सार्वजनिक  ठिकाणी छेडछाड - ह्या बाबतीत एक समाज म्हणुन आपणास योग्य दिशेने एक मोठा पल्ला गाठायचा आहे. ह्या बाबतीत अधिकाधिक जाणीव समाजात निर्माण करण्याची गरज आहे. 

जागतिक महिला दिनानिमित्त वरील दोन मुद्द्यांवर आपण अधिकाधिक लक्ष केंद्रित करूयात!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...