मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

या बकुळीच्या झाडाखाली !



अधुनमधून आमच्या कुटुंबाच्या Whatsapp ग्रुपवर आमचे बापुकाका सुंदर जुनी मराठी गाण्यांची ध्वनीफीत त्यांच्या गीतासकट पाठवत असतात. ह्या आठवड्यात त्यांनी शेअर केलेलं  या बकुळीच्या झाडाखाली हे गीत सर्वांना भावलं आणि जुन्या काळात घेऊन गेलं. 

आपल्या प्रत्येकाचं असं एक बकुळीचं झाड असतं. आपल्याला जीवनातील सुखदुःखाच्या क्षणाची आठवण करुन देणारं! पुर्वीची बरीच आयुष्यं साधी असायची! बकुळीची झाडं फक्त गावातच असायची! स्त्रियांची बहुदा माहेरच्या गावातच असायची. सासरच्या गावातील बकुळीच्या झाडांशी त्यांचं जमायचं नाही असं नसेल पण जितकं माहेरच्या गावातील बकुळीच्या झाडांशी जितकं जमायचं तितकं बहुदा सासरच्या गावातील बकुळींशी नाही जमायचं! 

आताशा आयुष्यं तितकीशी साधी राहिली नाही . प्रत्येकानं बारा गावांचं पाणी चाखलं! बालपणाच्या गावासोबत ज्या गावात आपल्या कारकिर्दीचे महत्वाचे क्षण आले तिथल्या लोकांनी, वास्तुंनी ह्या गावाच्या बकुळीच्या झाडांची जागा घेतली. बऱ्याच वेळा आयुष्यात पुन्हा एकदा ह्या खास वास्तुंना भेट द्यायची संधी पुन्हा कदाचित यायची सुद्धा नाही!

अजून एक बदल आपल्या नकळत घडत आहे. कार्यालयात बऱ्याच वेळा आपल्याला आपलं मुळ वैयक्तिक रुप बाजुला ठेवुन अगदी व्यावसायिक रूप धारण करावं लागतं. हे व्यावसायिक रुप वैयक्तिक रूपापेक्षा अगदी वेगळं असतं. हळुहळू व्यावसायिक रुप वैयक्तिक रूपावर वर्चस्व गाजवु लागतं. मनातील एका कोपऱ्यातील बकुळ बिचारी हिरमुसते, कोमजते. 

कधीतरी मग सर्व व्यावसायिक जबाबदाऱ्या संपतात आणि शोध सुरु होतो त्या विसर पडलेल्या बकुळीचा! ती बिचारी केव्हाचीच नाहीशी झालेली असते ! असो पुर्वीच्या साध्या जीवनातील बकुळीच्या फुलांवर लिहिलेलं वसंत बापट ह्यांचं हे मूळ गीत! 

.         ||  या बकुळीच्या झाडाखाली  ||

गीत - वसंत बापट
संगीत - भानुकांत लुकतुके
स्वर - सुषमा श्रेष्ठ

या बकुळीच्या झाडाखाली 
आठवणींची लाख फुले
इथेच माझ्या स्वप्‍नांसाठी 
एक रेशमी झुला झुले

इथेच माझी बाळ पाऊले 
दंवात भिजली बालपणी
दूर देशीच्या युवराजाने 
इथेच मजला फूल दिले

तिने आसवें पुसली माझी, 
हृदयामधला गंध दिला
चांदण्यातले सोन कवडसे 
माझ्यासाठी अंथरले

बकुळी माझी सखी जिवाची 
जन्मांतरीचे प्रेम जुने
तिला पाहता खुलते मी अन्‌ 
मला पाहता तीही ही खुले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...