मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, २८ जून, २०१७

योग्य करियरच्या शोधात !

काही दिवसांपुर्वी चिन्मयने माहिती आणि तंत्रज्ञान ह्या क्षेत्रात पदवी  घेऊन त्यानंतर करियर करायचं असेल तर कोणत्या घटकांची जाणीव असणं आपणांस आवश्यक आहे ह्यावर एक अत्यंत माहितीपुर्ण लेख लिहिला आहे. ह्या लेखामुळं विशेष विचार न करता माहिती आणि तंत्रज्ञान ह्या क्षेत्रात आपल्या पाल्यास पदवीशिक्षणास धाडणाऱ्या पालकांमध्ये जागृती होऊन ते हा निर्णय अधिक डोळसपणे घेतील अशी आशा आहे. 

आपल्या पाल्याच्या भावी करियरची निवड करताना कोणत्या घटकांचा विचार करावा ह्यावर ही पोस्ट आहे. एखादा विशिष्ट घटक एका विशिष्ट करियरवर कसा परिणाम करेल ह्याचं विस्तृत विश्लेषण ह्या इथं अंतर्भूत नाही. 

ह्या घटकांकडे वळण्याआधी एक मुद्दा. नव्या पिढीतील पालक हे आपल्या पाल्यांशी अधिक सुसंवाद साधतात, त्यांच्या निर्णयाचा आदर करतात आणि जर पाल्याने एका विशिष्ट पर्यायाचा आग्रहच धरला तर सहसा आपला व्हेटो वापरत नाहीत. अशा प्रसंगी आपल्या पाल्याशी ह्या खालील मुद्दयांवर मुक्त वातावरणात चर्चा करणं इष्ट राहील ही माझी सुचना. 
  1. 1.     एखाद्या विशिष्ट् व्यवसायासाठी लागणाऱ्या पायाभूत गुणांची माहिती आणि त्या गुणांची आपल्या अंगी असलेलं वास्तव्य -व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावरउभ्या  असलेल्या प्रत्येक पदवीधराच्या अंगी खालील गुणांचं जन्मजात मिश्रण असतं. प्रत्येक क्षेत्रात ह्या विविध गुणांची गरज वेगवेगळी असते. ह्यातील काही गुण आपल्याला मेहनत करून सुधारता येतात तर काहींमध्ये हा बदल घडवुन आणणं कठीण असतं. ह्या गोष्टींचं आपल्याला भान असणं आवश्यक आहे.
    ·        Communication Skills - संवाद कला 
    ·        Analytical Skills - विश्लेषण कला 
    ·        शांतपणे कठीण परिस्थिती, व्यक्ती ह्यांचा मुकाबला करण्याची कला 
    ·        Shrewdness - ह्याला धूर्तपणा असं मी म्हणणार नाही. पण व्यावहारिक दृष्टी अंगिकारण्याची क्षमता 
    ·        Emotional Quotient - भावनिक बुद्धयांक 
    ·        Persistence - विशिष्ट काळ प्रयत्न करून देखील जरी यश मिळालं नाही तरी प्रयत्नातील सातत्य टिकवुन ठेवण्याची कला.                                                                         पालकांनी आपल्या पाल्याशी ह्या विषयावर चर्चा करणं आवश्यक आहे. Constructive Feedback होकारात्मक दृष्टीनं स्वीकारणं हा एक व्यावसायिक जगातील फार मोठा गुण आहे त्याची पायाबांधणी आपण पाल्याशी त्याच्या अंगी असलेल्या वरील गुणांविषयी एक अभावनिक (non- emotional)चर्चा करून घडवू शकतो. 
    2.     झगमगती / धोपटमार्गातील करियर क्षेत्रे  - चित्रपट, फॅशन, खेळ ही क्षेत्रे तुम्हांला झगमगत्या आयुष्याशी भेट घडवून देतात. ह्याउलट बऱ्याचशा नोकऱ्या ह्या तुम्हांला एक लाईमलाईटपासून दूर पण स्थिर असं आयुष्य देतात. झगमगत्या आयुष्याच्या प्रतिकुल बाजूही असतात ह्याचं भान आणि धोपटमार्गातील स्थैर्य ह्याचा सारासार विचार करावा.  
    3.     दीर्घकालीन / अल्पकालीन टिकणारी क्षेत्रे  - शिक्षकाची नोकरी आयुष्यभर टिकते आणि तुमचा जीवनस्तर कायम ठेवण्याची तुम्हांला संधी असते. ह्याउलट एखाद्या फॅशन क्षेत्रात काम करणाऱ्या मॉडेलला केवळ दहा वर्षाचं सक्रिय करियर लाभू शकतं, आणि त्यानंतर मात्र एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन जीवनस्तरात गरज पडल्यास बदल घडवून आणावा लागतो. एकदा उंचावलेला जीवनस्तर परत मुळ स्थितीला परत आणण्याचं आणि ते पचवून दाखविण्याची क्षमता फार मोजक्या जणांत असते. 
    4.     त्या क्षेत्रातील स्पर्धेचं प्रमाण - संपुर्ण भारतात समजा १० लाख सक्रिय क्रिकेटपटू असतील तर त्यातील केवळ दोनशे - तीनशेच क्रिकेटच्या माध्यमातुन व्यवस्थित अर्थार्जन करू शकतात. जर भारतातुन वर्षाला लाखो अभियंते उत्तीर्ण होत असतील तर त्यातील किती टक्क्यांना तात्काळ नोकरी मिळते ह्या प्रकारची आकडेवारी आपण निवडू पाहणाऱ्या क्षेत्राविषयी आपणांस माहित असणं आवश्यक आहे. 
    5.     क्षेत्रातील अर्थलाभाचं प्रमाण आणि कालावधी  - ह्यात दोन घटक येतात. विशिष्ट क्षेत्रातील अर्थार्जनाचे प्रमाण आणि सक्रिय अर्थार्जनाचा कालावधी ! वयाच्या तिशीत झटपट अर्थार्जन करुन त्या क्षेत्रातून निवृत्त व्हावा लागलेला तरुण आणि वयाच्या साठीपर्यंत दीर्घकालीन करियर करून स्थिर वेतन मिळवुन निवृत्त झालेला गृहस्थ ह्यांची तुलना केल्यास आपणांस तुलनेनं कमी पण स्थिर असलेल्या उत्पनाचे माहात्म्य समजु शकते!  
    6.     आपलं ज्ञान सतत अद्ययावत ठेवण्यासाठीची त्या क्षेत्राची मागणी - IT क्षेत्र तुम्हांला सतत आपलं ज्ञान अद्ययावत ठेवण्यास भाग पाडतं. वाढत्या वयानुसार तुमच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या वाढत जातात हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि ह्या वाढत्या प्रापंचिक जबाबदाऱ्या आणि व्यावसायिक जगातील तुम्हांवर स्वतःला अद्ययावत ठेवण्याची गरज ही तारेवरची कसरत पार पडणं सर्वांनाच जमत नाही ह्याची आपणांस जाणीव असावी. 
    7.     बाह्य जगतातील घटकांचा ह्या क्षेत्रावर होऊ शकणारा परिणाम - अमेरिकेवर अवलंबुन असलेला IT व्यवसाय, आखाती देशांच्या परकीय धोरणांवर अवलंबून असणारे अजून काही व्यवसाय हे सर्व बाह्य घटक आपण निवडू पाहणाऱ्या क्षेत्रास कसे प्रभावित करू शकतात ह्याची जाणीव आपणांस असणं आवश्यक आहे.  
    8.      क्षेत्राशी संबंधित Occupational Hazards - वैमानिकाला, क्रिकेटपटुला सतत घराबाहेर राहावं लागतं. त्यांचे कुटुंबियांना महत्वाच्या क्षणी त्यांची उणीव नक्कीच जाणवते. IT क्षेत्रातील तरुण रात्री बेरात्री उशिरानं घरी येतो, बैठं काम करून त्याच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होऊ शकतो. ही झाली काही उदाहरणं. प्रत्येक क्षेत्राशी संबधित असा कोणतातरी एक घटक असणारच त्याची जाणीव तुम्हांला असणं आवश्यक आहे. 
        9.       त्या क्षेत्रात शिरकाव करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या गुंतवणुकीचा अंदाज - खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागते, तीच गोष्ट वैमानिक बनायचं असेल तर! इतकी गुंतवणूक करून त्यावर परतावा मिळण्याची शाश्वती किती ह्याची जाणीव असू द्यात! 
कोणत्याही क्षेत्राची निवड पक्की करण्याआधी त्या क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या व्यक्तीस नक्की भेटा. पुढील वीस वर्षांनंतर एखाद्या क्षेत्राची स्थिती नक्की कशी असणार आहे ह्याचा अचुक अंदाज तर कोणीच बांधु शकणार नाही, पण त्या क्षेत्रातील व्यक्ती तुम्हांला नक्कीच ते क्षेत्र कशा प्रकारे भविष्यात असू शकतं ह्याच्या दोन तीन शक्यता तुम्हांला सांगू शकेल. 

त्याचप्रमाणं आपली क्षमता किती आहे ह्याची किमान माहिती असणं आवश्यक आहे, त्यासाठी आपल्याला परखड मत देणारा एखादा सुहृद, नातेवाईक जवळ असावा. नाहीतर कॉलेजात स्टार क्रिकेटर आहे म्हणुन सर्व काही सोडून केवळ क्रिकेटचा ध्यास धरणं हे शक्यतेच्या दृष्टीनं तुम्हांला प्रतिकुल निकाल देऊ शकतं. 

ज्या क्षेत्रातील पदवी तिथंच करियर, एकाच क्षेत्रात संपुर्ण आयुष्यभर करियर ह्या मागच्या पिढीत रूढ असणाऱ्या गोष्टी सध्याच्या पिढीनं झुगारून दिल्या आहेत. त्यामुळं केवळ एखाद्या विशिष्ट शाखेची निवड केली म्हणून माझं पुर्ण आयुष्य मला मर्यादित शक्यतांसोबत जगावं लागणार हे चुकीचं आहे. त्याचबरोबर आयुष्यात यश जसं अगदी लवकर मिळू शकतं तसं अगदी उशिरा सुद्धा मिळू शकतं हे ही लक्षात असू द्यात! सक्रिय आयुष्यात बाह्यजगातील घडामोडीवर लक्ष ठेवून योग्य संधीच्या शोधात सदैव राहणाऱ्या व्यक्तीचे यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे हे लक्षात असू द्यात! 

२ टिप्पण्या:

  1. In this writeup, author inclined towards secured long term steady source of income.

    Unfortunately, many low skills as well high skill jobs, professions are on verge of automation. That includes driver, loan assistant in bank, clerks, middle level management (act as routers in corporate system), pilots, fast food cooks, hard work labours in mining, ecp, construction companies, armies of country.

    In next 10 yrs, due to automation more jobs will be reduced and many people joblesss on ground. And empty mind doping for always some entertainment for cherrish, entertainment industry will flourish. Somehow it is true in india for bollywood movies and tv sagas.

    In future, no certain profession more than for 10 yrs. Next generation should prepare with flexibility and adoptability in addition of traits advised by author.



    उत्तर द्याहटवा
  2. Pl disregard earlier post. Copy paste error from my word. Correct response.

    In this writeup, author emphasises on secured long term steady source of income.

    Unfortunately, many low skills as well high skill jobs are on verge of automation. That includes driver, loan assistant in bank, clerks, middle level management (act as routers in corporate system), pilots, fast food cooks, hard work labours in mining and construction, armies, tax filing, city planning, musicians and so many.

    Even army will automised. Robots will be implement on border. India has strategically advanced in this warfare weaving high end satellite network for tracking and communication on borders with the help of isro.

    Tata motors is the biggest in human resource and had govt burecracy hierchary system till yr 2016. Now they are limited to just 4-5 layers. Level difference in gatekeeper to ceo is greatly reduced. Automation reduces vendor count 1/3rd.

    In next 10 yrs, due to automation more jobs will be reduced and many people joblesss on ground. And empty mind doping for always some entertainment for cherrish, entertainment industry will flourish. Somehow it is true in india for bollywood movies and tv sagas. One more entertainment for human is sports. Cricket decide india to work or not. There will be more scope for other sports in future. So technicians, specialist in this field will earn more than other industry.

    Few sectors will be untouched as well new technologies will add new professions-
    Nursing, security, policing, farming, dentist, pyscologist, criminal investigation(that will soon privatise due to increase in crime),physiotherapy, technology builder, repairs, robotics, health industry, hospitality industry (globe will be more closer due to cheaper transportation), nano biotics and communication, space search, high end customisation in product designs and 3d printing mfg, marriage counsellor(increase in social issues)and so on.

    In future, no profession will retain lucrative for more than 10 yrs. Next generation should prepare with flexibility and adoptability in addition of traits advised by author.

    उत्तर द्याहटवा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...