मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ७ जून, २०१५

कालबाह्य !!!


 
आजकाल समाज हा बऱ्याच गोष्टींना फारच झपाट्याने कालबाहय ठरवतोय असे मला वाटत आहेत. हा भ्रम असेल तर किती बरे असे मी वारंवार मनाला समजावत असतो.
काही शालेय संस्था कालबाहय होतांना दिसतात. शालेय शिक्षणाचे माध्यम कालबाहय झाले असावे असा व्यापक समज असतो. पण माध्यमापेक्षा एखाद्या संस्थेची तात्कालीन प्रस्थापित समाजातील मुलांना आपल्याकडे खेचून घेण्याची क्षमता कमी होत असल्याने त्या कालबाहय होतात. शालेय संस्थातील शिक्षकांचा दर्जा जर काळास सुसंगत असा ठेवला तर संस्था कालबाहय होण्याचे भय बऱ्याच प्रमाणात टळू शकते.
काही राजकीय पक्ष स्थानिक, राज्य अथवा राष्ट्रीय पातळीवर कालबाहय होतांना दिसतात . बऱ्याच वेळा हया पक्षांच्या विचारसरणीत चुकीच असं काहीच नसत पण काळानुसार लोकानुनय करण्यासाठी जे बदल करण्यासाठी जी मानसिक लवचिकता दाखवावी लागते त्यात हे पक्ष अपयशी ठरतात .
काही व्यक्ती काळानुसार , वयानुसार कालबाहय होतांना दिसतात . ही कालबाह्यता कोणाच्या नशिबी सामाजिक, व्यावसायिक आयुष्यात येते तर काहीच्या बाबतीत वैयक्तिक आयुष्यात! सामाजिक आयुष्यात आपल्या ज्ञानाचा प्रसाद भाषणातून, लेखातून जनतेला देणारे लोक काही काळाने कालबाहय होऊ शकतात. प्रत्येक भाषण, लेख ह्यातून असे लोक आपल्याजवळील ज्ञानाचा ठराविक टकके भाग जनतेसमोर ठेवत असतात. एखादया माणसाकडे अगाध ज्ञान असेल तर तो आपल्या प्रत्येक जनसंपर्काच्या प्रसंगी हया अगाध ज्ञानाचा ठराविक टकके नवनवीन भाग लोकांसमोर ठेऊ शकतो  आणि तो केव्हाच कालबाहय होत नाही . हया उलट उथळ ज्ञानाच्या जोरावर सर्वत्र गडबड करु इच्छिणारे अर्धी हळकुंड पिवळधारी लोक काही कालावधीतच आपल्या ज्ञान प्रकटनामध्ये तोचतोच पणा आणून थोड्याच वेळात कालबाहय होतात.
जाता जाता एक सावधानतेचा इशारा! बऱ्याच वेळा नवीन पक्ष, शालेय संस्था येऊन पूर्वापार चालत आलेल्या पक्ष, शालेय संस्थांना कालबाहय करत असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसतात . हया नवीन घटकांनी केलेले दावे काळाच्या कसोटीवर किती काळ टिकून राहतील हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे हया नवीन पक्षांच्या, संस्थांच्या वल्गनांवर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापुर्वी भोवतालच्या परिस्थितीचे आणि भविष्यात होऊ घातलेल्या परिस्थितीचे शांतपणे पृथ्थकरण करून मगच निर्णय घ्यावा ही विनंती!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...