पुर्वी चांदोबा हे मासिक यायचं. त्या मासिकातील गोष्टी कशा मस्त असायच्या! आरंभी सर्व काही सुरळीत असायचं, मध्ये थोडंफार संकट वगैरे आणि मग शेवटी सर्वकाही आलबेल! दोन तीन पानांची छोटीशी गोष्ट! पुर्वीची मध्यमवर्गीय आयुष्यं सुद्धा अशीच असावीत असं म्हणायचा मला मोह होतोय.
सकाळी माणूस अगदी शांतपणे उठत असावा. दुपार होईतोवर कामाचा थोडाफार तणाव आणि मग सायंकाळचे पाच वाजले की तणाव मुक्ती!
हल्ली मात्र हे असं काही होत नाही. माणसाच्या तणावाची पातळी सायंकाळी शुन्यावर येतंच नाही!
माणसं आयुष्यातील तणाव असाच सदैव पुढे पुढे नेत राहतात. मध्ये वार्षिक सुट्ट्यांमुळे काहीसा खंड मिळतो तितकाच मग पुन्हा मात्र ये रे माझ्या मागल्या!
प्रत्येक माणसाचं स्वतःचं असं एक खरंखुरं व्यक्तिमत्व असतं. जसजसं आपण मोठं होतं जातो हे मूळ व्यक्तिमत्व आपल्याला काही प्रमाणात झाकून ठेवावं लागतं. ह्यातील काही झाकणं वैयक्तिक जीवनातील असतात तर काही व्यावसायिक जीवनातील! वेगळ्या शब्दात मांडायचं झालं तर आपण आपल्या खऱ्या व्यक्तिमत्वावर पुटं चढवतो, जेणेकरुन आपण बाह्यजगात वावरावयास योग्य बनतो.
आयुष्यातील तणाव हा सदैव ह्या पुटांवर, थरांवर मारा करत राहतो. तणावाची महत्तम पातळी, त्याची वारंवारता आणि ह्या पुटांची क्षमता हे तीन घटक माणूस किती काळ तणाव सहन करु शकतो हे ठरवतात. एकदा का ही पुटं गळून पडली की मग माणसाचं खरंखुरं व्यक्तिमत्व, त्यातील उणिवा लोकांसमोर उघड्या पडण्याची शक्यता निर्माण होते. आणि केवळ ह्या शक्यतेचा विचार करुनच माणसं हबकतात.
अशा वेळी आपणास गरज भासते ती एखाद्या चांगल्या श्रोत्याची! हा श्रोता कसा असावा?
१> आपल्या हळव्या क्षणी आपल्या मनातील सर्व काही ऐकुन घेणारा असावा! हळव्या क्षणी आपलं मन अगदी खुप वाईट शक्यतांचा विचार करतं. कधी कधी मनात दुष्ट विचार सुद्धा येतात. हे सर्व काही आपल्याला ह्या श्रोत्यासमोर मांडता येण्याचा विश्वास मनी असावा.
२> हळव्या क्षणी आपल्या अंगी असलेल्या अनेक गुणांविषयी सुद्धा आपल्या मनात शंका निर्माण झालेल्या असतात. कोणीतरी आपल्याला आपल्याच ह्या गुणांची पुन्हा खातरजमा करुन देण्याची गरज असते. आपल्या कथनातुन ही आपली गरज व्यक्त होते, कधी उघडपणे तर कधी अप्रत्यक्षपणे! आपला हा श्रोता आपली ही गरज योग्य क्षणी ओळखणारा आणि त्याक्षणी आपणास आपल्या ह्या गुणांची आठवण करुन देणारा असावा.
३> कधी कधी आपण अगदी वाईट परिस्थितीत अडकलेलो असतो. पण आपलं मन हे मानण्यास तयार नसतं. अशा वेळी छोट्या छोट्या विधानातुन हा श्रोता आपल्याला हळुहळू वस्तुस्थितीची जाणीव करुन देणारा असावा. सध्याचा एक लढा हरलास तरी आयुष्यात अशा अनेक संधी मिळणार आहेत हे समजावुन सांगणारा असावा
४> आपण काही काळानंतर कठीण प्रसंगातुन बाहेर पडतो. आपला चांगला काळ येतो आणि अशा वेळी आपणांस आपल्या कठीण काळाच्या स्मृती नकोशा झालेल्या असतात. आणि अशा वेळी हा श्रोता आपली ही गरज ओळखतो. त्या वेळी आपण जे काही ह्या श्रोत्यासमोर बोललो तो त्याचा पुन्हा कधी उच्चारसुद्धा हा श्रोता कधी करत नाही. कधी कधी आपण इतके स्वार्थी बनतो की आपण ह्या श्रोत्यांची सांगड आपल्या वाईट काळाशी घालतो आणि त्यामुळं श्रोत्यासमोर जाणं सुद्धा टाळतो जेणेकरून त्या कठीण कालावधीच्या आठवणी सुद्धा पुन्हा यायला नकोत. श्रोत्याला हे उमगतं, त्याला काहीशा वेदना सुद्धा होत असतील पण तो निर्विकारपणे आपलं आयुष्य जगत राहतो. पुन्हा कधी आपल्याला त्याची गरज लागली तर तो सदैव उपलब्ध असतो.
वरील दोन आलेखावरुन हे नक्की सिद्ध होते की तणावाची पातळी हल्ली खूप वाढली आहे. आणि त्यामुळं हल्ली उत्तम श्रोत्यांची गरज सुद्धा खुप आहे. परंतु तणावमुक्तीचा हा एक सोपा मार्ग बऱ्याच जणांना माहित नसतो. तर नक्कीच ह्या पोस्टपासुन बोध घेऊन हा मार्ग अवलंबा!
होय ना! मग तुम्ही नक्की काय करणार ? एका उत्तम श्रोत्याचा शोध घेणार की एक उत्तम श्रोता बनणार?
पुर्वीचा वेळ - तणावपातळी आलेख (एकक - दिवस) |
हल्ली मात्र हे असं काही होत नाही. माणसाच्या तणावाची पातळी सायंकाळी शुन्यावर येतंच नाही!
हल्लीच वेळ - तणावपातळी आलेख (एकक - आयुष्य) |

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा