जनमानसात कृष्णाविषयी बरंच कुतूहल असतं. महाभारतातील कृष्णाविषयी बोलण्याचा माझा अधिकार नाही. पण कृष्णाचं ते एकमेव रुप नाही अशी माझी समजुत आहे. कृष्णाविषयी असलेल्या माझ्या काही समजुती !
१. कृष्णाचं पारंपरिक रुप एक जे आपण लहानपणापासुन वाचत, ऐकत आलो आहोत ! पण कृष्ण हे एक तत्व आहे, एक संकल्पना आहे !
२. कृष्णाचं प्रत्येकासाठी एक खास अस्तित्व असतं. हे रुप आपल्याला जाणुन घेता यायला हवं ! हे रुप जाणुन घेण्याची इच्छा हवी आणि क्षमताही हवी ! नाहीतर आपल्यासाठीचं कृष्णाचं रुप आपल्या भोवताली येऊन, पिंगा घालुन गायब होतं आणि आपल्याला ते जाणवत सुद्धा नाही !
३. आपल्या कृष्णाची प्रतिमा जनमानसातील कृष्ण प्रतिमेपेक्षा फार वेगळी असु शकते ! आपल्या कृष्णाला कदाचित ठाऊक सुद्धा नसतं की तो आपल्यासाठी कृष्ण आहे !
४. कृष्ण तुम्हांला गवसला पाहिजे. ज्यावेळी कृष्णभान होते तो एक विलक्षण अनुभूतीचा क्षण असु शकतो. काहींना कृष्ण मुर्त स्वरूपात सापडतो तर काहींना त्याचं अस्तित्व आसपास जाणवत राहतं.
५. कृष्ण तुमच्यासोबत कायम रहात नाही. तुमचं व्यक्ती म्हणुन स्वतंत्र अस्तित्व तो जाणुन असतो. तुम्ही आनंदाच्या शिखरावर असाल तर तो तुम्हांला एकटं सोडुन देतो. तुम्ही संकटात सापडलात तर तो कदाचित तात्काळ धावुन येण्याची घाई करत नाही ! एका विशिष्ट मर्यादेपर्यंत तुम्ही स्वतः संकटाचा कसा मुकाबला करु शकता ह्याची तो चाचणी घेतो !
६. कृष्ण तुम्हाला जीवनावर श्रद्धा ठेवायला शिकवतो, तुम्हांला दुनियेच्या नकळत दाद देतो, तुम्हांला स्वतःवरील आत्मविश्वास बळकट करण्यास मदत करतो.
कृष्ण आपल्याला सोळा हजाराहुनही कित्येक अधिक प्रकारे समजु शकतो ! त्यातलाच कदाचित हा एक प्रकार !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा