गोष्ट दहावीच्या वेळची आहे. त्यावेळी मी अभ्यासासाठी आमच्या सरांच्या घरी जात असे. आमच्या घरातील जेवण बनविण्यासाठी घालवला जाणारा वेळ आणि सरांच्या घरात जेवणाच्या तयारीवर घालवणारा घालवला जाणारा वेळ यामध्ये मला कमालीची तफावत दिसून येत असे. या घटकाव्यतिरिक्त अजून एक फरक मला जाणवून आला तो म्हणजे आमच्याकडे मांसाहाराचे असलेलं अधिक प्रमाण! याविषयी सापळे मॅडमशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या की अभ्यासाच्या मुलांनी साधारणता चिकन मटण टाळावे परंतु मासे खाल्ले तर ते फायदेशीर ठरू शकते. सापळे मॅडम यांच्याशी ही चर्चा साधारणता जानेवारी फेब्रुवारी महिन्यात झाली होती, ज्यावेळी स्टडी लिव्ह म्हणजे अभ्यासाची सुट्टी चालू होती! अभ्यासाच्या सुट्टीमध्ये तुम्ही आहार कसा नियंत्रित करता यावर तुमची अभ्यासाची परिणामकता अवलंबून असते. ह्यामागील महत्वाचं कारण म्हणजे आपण बऱ्याच वेळा केवळ घरात बसुन अभ्यास करत असतो.
आता हे सर्व विचार काहीसे जुनाट किंवा पारंपारिक पद्धतीचे समजले जाण्याची शक्यता आहे. परंतु याबाबतीत मी ठाम आहे! तुम्ही जर एकाग्रतेने अभ्यास इच्छित असाल तर तुमचे पोट प्रसन्न असले पाहिजे. पोट प्रसन्न म्हणजे एकतर ते तुडुंब भरलेले नसावे आणि तुम्ही पचायला जड अशा पदार्थांचे सेवन केलेले नसावे! एका दिवसात पूर्ण एकाग्रतेने सात ते आठ तासापलीकडे अभ्यास करणं हे बहुतांशी मुलांना शक्य होत नाही या माझ्या मतावर मी पूर्णपणे ठाम आहे! ह्या अवधीत मेंदु पुर्ण क्षमतेनं कार्य करत असावा.
आता वळुयात ते व्यावसायिक जगताकडे! मी आजतोवर व्यावसायिक जगतामध्ये जे मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्ती पाहिल्या आहेत त्यातील बऱ्याचशा व्यक्ती या शारीरिक तंदुरुस्तीच्या (फिटनेस लेव्हल) बाबतीत अत्यंत जागृत असून त्यांनी आपला फिटनेस अत्यंत उच्च पातळीवर राखून ठेवल्याचं मला आढळून आलं आहे. कोणत्याही विधानाप्रमाणे या विधानाला सुद्धा अपवाद आहेतच! परंतु फिटनेस आणि व्यावसायिक यश याचा अन्योन्यसंबंध आहे असं माझं मत आहे. व्यावसायिक यश म्हणजे अत्यंत उच्चपदावरील व्यक्ती असा अर्थ मला अभिप्रेत आहे! अशा व्यक्तींविषयी मी मनात खास आदर बाळगुन आहे.
असं का होत असावं याची कारणीमिमांसा करण्याचा मी प्रयत्न केला. उच्चपदावर तुम्हाला असंख्य डेटा पॉईंट्सचे थोड्यावेळात विश्लेषण करून निर्णय घ्यायचे असतात, बऱ्याच वेळा पूर्ण बरोबर अथवा पुर्ण चूक ह्यामधील पर्यायांची तुम्हांला निवड करायची असते. अशावेळी तुमचा मेंदू पूर्णपणे जागरूक असून असणे आवश्यक आहे. शारीरिक फिटनेस मेंदूला ही पूर्ण जागृतता कायम ठेवण्यास मदत करतो असे माझे मत बनले आहे.
सारांश योग्य आणि माफक प्रमाणातील आहार हा तुमच्या शैक्षणिक आयुष्यात आणि व्यावसायिक जगतात फार मोलाची कामगिरी बजावतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा