पार्श्वभूमी - २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अथवा विश्वचषक स्पर्धेचा थेट प्रक्षेपणाचा एका आलिशान दिवाणखान्यात आनंद घेत बसलेली मित्रमंडळी / कुटुंब !
मानसिकता - गवसलेल्या आर्थिक सुबत्तेमुळं पैसा टाकुन आयुष्यात हवं ते मिळवता येतं!
प्रसंग - सायंकाळची चार - साडेचारची वेळ ! टीव्हीवरील कार्यक्रम ऐन रंगात आला असताना मित्रमंडळीतील एक दोघांना अचानक भुकेची जाणीव होते ! झोमॅटो / स्विगी किंवा तत्सम ऍपवरुन काहीसं चमचमीत मागवलं जातं ! प्रशस्त दिवाणखाना, मोठाला टी. व्ही., बाहेरच्या धगधणाऱ्या उन्हाळ्याशी स्पर्धा करत कृत्रिम थंडावा निर्माण करणारं वातानुकूलित यंत्र, शीतपेयं ह्या साऱ्या पिक्चर परफेक्टमध्ये एकमेव कमी असलेल्या त्या पिझ्झा / मसालाडोसा आणि ह्या मंडळींना जोडणारा असतो तो डिलिव्हरी बॉय !
ऍपवरुन त्या डिलिव्हरी बॉयच्या प्रवासाचा मागोवा घेतला जातो. त्याला दिलेल्या मुदतीत तो पोहोचतो की नाही ह्यावर टीव्हीवर लक्ष देता देता नजर ठेवली जाते !
तो बिचारा डिलिव्हरी बॉय ! दिवसातील त्याची ही पाचवी डिलिव्हरी ! तापत्या उन्हात, धो धो पडणाऱ्या पावसात, शहरातील खड्डामय रस्त्यांवरुन आपली दुचाकी सांभाळत तो इच्छित स्थळी ठरलेल्या वेळेआधी पोहोचण्याचा कसोशीनं प्रयत्न करतोय. वेळेत जर पोहोचता आलं नाही तर त्याच्या मोबदल्यातुन काही रक्कम वजा होणार आहे. त्यामुळं कदाचित त्याला सिग्नल मोडुन पुढे जाण्याची अथवा वाहतुकीच्या उलट्या दिशेनं आपलं वाहन हाकण्याची गरज वाटणार आहे. अशा वेळी ट्रॅफिक पोलिसानं पकडलं किंवा काही अपघात झाला तर त्याची जबाबदारी पुर्णपणे त्याच्यावर असणार आहे. खरंतर ह्या पोस्टचा विषय मुंबई पोलिसांनी ह्या डिलिव्हरी बॉईजसाठी आयोजिलेल्या समुपदेश सत्रांवरून सुचला.
वातानुकुलित दिवाणखान्यातील बेल ज्यावेळी वाजते आणि हा डिलिव्हरी बॉय आपल्यासाठी आपण मागवलेला खाद्यपदार्थ घेऊन येतो, त्यावेळी त्यानं दिवसातील कितवी डिलिव्हरी केली अथवा तो किती उन्हा-तान्हातुन / धो धो पावसातुन आला असावा हा विचार आपल्या मनात क्वचितच येतो. कदाचित आपल्यातील काही जणांच्या त्याच्याशी बोलण्यातुन काहीशी मग्रुरीसुद्धा जाणवत असणार. त्याला ऋतूनुसार चहा पाणी हवं आहे का हे विचारावं ह्याची थोडी जाणीव आपण ठेवायला नको का?
हल्ली शारीरिक क्षमतेवर अवलंबुन असणारी अशी काही करियर्स निर्माण झाली आहेत. डिलिव्हरी बॉईज, टूरवर जाणारे टूर मॅनेजर ह्या सर्वांना वयाच्या कितव्या वर्षापर्यंत ह्या नोकऱ्या जमणार आहेत हे देव जाणे ! उन्हा - तान्हात काम करताना त्यांना तब्येतीच्या काही तक्रारींना त्यावेळी तोंड द्यावं लागु शकते किंवा त्यांच्या तब्येतीवर त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात. परंतु साध्या आरोग्यविम्याची तरतुद करण्याचं भान त्यांना नसतं अथवा कदाचित ही चैन त्यांना परवडू शकत नसावी !
त्यांच्या ह्या समस्या सोडविणे कदाचित आपल्या हातात नसावं पण दारी आलेल्या ह्या डिलिव्हरी बॉयला एक माणुस म्हणुन वागविणं नक्कीच आपल्या हातात आहे !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा