सध्या कार्यालयीन दौरा सुरु असून अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर वास्तव्य आहे . खरं तर अमेरिकेतुन ही पोस्ट लिहिण्याचा काही मनसुबा नव्हता . पण एकंदरीत ह्या दौऱ्यामध्ये बर्फमय वातावरण हात धुवून माझ्या मागे लागलं आहे . बघा न आजचा चांगला खास शनिवार सर्व पुर्वनियोजित कर्यक्रम बाजुला टाकुन हॉटेलच्या खोलीत काढावा लागला आहे. आणि त्यामुळं खिडकीतुन फोटॊ काढून आणि ते फ़ेसबुक / व्हाट्सअँप वर टाकण्याचा अतिरेक करून झाल्यावर आता करण्यासारखं काहीच न उरल्यानं ब्लॉगकडे मोर्चा वळविण्यात आला आहे .
सूरूवात झाली ती येताना फ्रँकफर्ट विमानतळावर ! आधीच सहनशीलतेची परिसीमा पाहणारा ६ तासांचा थांबा कमी होता की काय म्हणून तिथं जोरदार बर्फवृष्टी सुरु झाली. Lounge मध्ये बसून अवती भोवती रसिक लोक असताना पाण्याचे घोट घेताना चेहऱ्यावर गंभीर भाव आणणं थोडं कठीणच, पण
सरावाने सर्व काही साध्य होते असं म्हणतात त्याप्रमाणे मी सुद्धा ही कला साध्य केली आहे.
Lounge चा नाद सोडून गेटसमोर येऊन बसलो. तिथंही सावळा गोंधळ उडाला होता. बरीच विमानं बर्फामध्ये नखशिखांत न्हाऊन निघाली होती आणि त्यांच्या अंगावरील बर्फ काढून टाकण्याचं काम मंदगतीने सुरू होते.
विमानउड्डाणाच्या वेळा बर्याच वेळा पुढे ढकलण्यात आल्या. दुसऱ्या विमानांची सफाई पाहून मन भरल्यानंतर शेवटी एकदा आम्हाला घेण्यासाठी बस आली. बराच लांब पल्ला बसनं पार पाडून आम्ही मग बर्फ पडत असतानाच विमानात शिरलो. बसल्यावर जवळपास दोन तास विमानावरील बर्फ काढून टाकण्याचं काम पुरले. त्या वेळी घेतलेले फोटो.
त्या बर्फाळ दिवसाच्या आठवणी काहीशा धुसर होत नाहीत तो आज हा असला तुडुंब बर्फाचा दिवस उगवला आहे.
इथल्या हवामानखात्याचा अंदाज पुर्वीपासून अचूक ठरतो. आजही तो अचूक ठरला. माणसाला एका खोलीत बंद करून ठेवले की त्याची हालत कशी होते ह्याचा अनुभव मी घेतला. मऊ बिछान्यावर लोळत राहायला मिळत नाही ह्याची आठवडाभर वाटणारी खंत काही काळ लोळल्यावर नाहीशी झाली. खिडकीतून दिसणारं बर्फाचे द्रुश्य फेसबुकवर मित्रांना दाखवून त्यांना लाईक द्यायला भाग पाडलं. अंधार होताना एकाच पोझिशनमधुन प्रकाशाच्या विविध छटांचे आणि बर्फाचे फोटो काढले.
इतक्या सर्व प्रकारात रुम सर्विस करण्यात आली. त्यामुळे टापटीप रुमचे फोटो काढले.
ब्लॉग लिहायला सुरू केला iPad वर कारण बरेच फोटो त्यावर होते. पण iPad वर असलेले फोटो iPad वरच ब्लॉग लिहताना atach करण्याचा पर्याय न सापडल्याने फोटो android प्रणालीच्या मोबाईलवर आणले आणि पोस्टला जोडले. परंतु android फोनवरुन ड्राफ्ट म्हणून सेव केलेले version iPad वर उपलब्ध होत नव्हतं आणि त्यामुळं ही सर्व पोस्ट मोबाईलवर टाईप करावी लागली. पब्लिश केल्यानंतर apple प्रणालीच्या लोकांना संपूर्ण पोस्ट दिसावी ही आणि उद्याच्या प्रवासाआधी बर्फ थांबावा ही ईशचरणी प्रार्थना!!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा