अमेरिकेतील महानगरांचा अपवाद सोडला तर निसर्गाच्या सोबतीनं जीवन जगण्याची कला इथल्या लोकांनी अवगत केली आहे असं म्हणावं लागेल. आज खरंतर सोमवार असल्यानं सकाळी अंगात कंटाळा भिनला होता. परंतु कार्यालयात एक दिवस पूर्ण केल्यावर चांगलं वाटलं. सायंकाळी रूमवर आलो तर रूम टापटीप करून ठेवण्यात आली होती. इस्त्रीचा स्टॅन्ड मी सकाळी काढला होता.
संध्याकाळी साडेसात वाजता जेवण आटपून बाहेर पाहिलं तर अजूनही बऱ्यापैकी उजेड होता. मित्रांसोबत चालायला बाहेर पडलो. मोकळ्या रस्त्याला "कुठे जातोस रे बाबा?" असा प्रश्न विचारावासा वाटला. भोवतालच्या परिसरातील रस्त्यांची ही मोहक रूपे! ह्यातील उन्हं वर आल्यानंतरचे फोटो शनिवार सकाळी काढलेले.
ह्या गुलाबाच्या फुलाचा रंग खासच मोहक !
इथं पानांचीच फुले झाली असावीत की काय असा प्रश्न दूरवरून पाहता क्षणी पडला होता.
शनिवारच्या फेरफटक्यात काढलेली ही दोन छायचित्रे !
ह्याचा नक्की उपयोग कशासाठी केला जातो हा मला पडलेला प्रश्न !
एकंदरीत संध्याकाळी मारलेल्या ह्या फेरफटक्यानं मन प्रसन्न झालं. मुंबईत असताना सुद्धा पाच वाजता घरी जायला मिळायला हवं ना !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा