"आई कालच माझा वाढदिवस साजरा झाला आणि आज सकाळसकाळी तुला ही कसली चेष्टा सुचतेय?" आईने मोठा धीर करून ही बातमी नीलाच्या कानावर तिच्या हातात दुधाचा कप देताना घातली आणि तिची ही अपेक्षित अशीच प्रतिक्रिया तिच्या कानावर पडली. मग बाबांना मध्ये पडावे लागेल. बाबांनी सुध्दा आईच्या बातमीला दुजोरा दिल्यावर नीला मात्र अगदी कॉलेजला जायला उशीर होत असताना देखील थांबली. हे प्रकरण अगदीच गंभीर दिसत होते. "ठीक आहे! मी विचार करते" असे म्हणून आपली सॅक उचलून ती कॉलेजला निघाली.
नेहमीची बस पकडून ती आत शिरली. आज कसं कोणास ठाऊक पण एका स्टॉपनंतर तिला खिडकीजवळची सीट मिळाली सुद्धा!! बसताक्षणी तिचं विचारचक्र सुरु झालं. ह्या पक्षाचे तिकीट म्हणजे विजयाची बरीच शक्यता होती. आपलं आयुष्य अगदी बदलून जाणार होतं. पण अचानक आपली निवड करण्यामागच कारण तिला समजेना. पक्षात इतके इच्छुक असताना पक्ष आपली निवड का करेल? म्हणजे ह्या मागे रावांचा हात असणार! पण राव केवळ आपल्या नियोजनकौशल्यावर खुष होऊन इतकं मोठं पाऊल उचलतील ह्याची तिला खात्री वाटत नव्हती. म्हणजे नक्कीच त्यांच्या मनात दुसरा कोणता तरी विचार असणार! दुसरा कोणता म्हणजे? आमदारकी आपल्याच घरात राहावी असं तर त्यांच्या मनात नसणार ना? नीलाच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. कॉलेजचा स्टॉप जवळ आला होता. उगाच सुताने स्वर्ग गाठू नकोस! बसमधून उतरता उतरता तिने स्वतःला बजावलं. आठव्या सत्राच्या सबमिशनचा आज शेवटचा दिवस होता. सबमिशन आटोपता आटोपता दुपारचे चार वाजले. आता दोन आठवड्याची अभ्याससुट्टी समोर होती. सर्व मुलांचे लक्ष ह्या दोन आठवड्यात अभ्यासाचा पर्वत कसा उचलायचा ह्याकडे होते. पण नीलाच्या मनात मात्र दुसरंच वादळ सुरु होते. तिला दोन दिवसात मोठा निर्णय घ्यायचा होता. तिची भिरभिरणारी नजर सुशांतला शोधतेय हे शलाकाला कळायला नेहमीप्रमाणे वेळ लागला नाही. "तो कॉम्पुटर लॅब मध्ये असावा!" नेहमीप्रमाणे अगदी गंभीर चेहरा करत आणि नजर दुसरीकडे ठेवत शलाका म्हणाली. आज तिच्या ह्या सुज्ञतेला दाद देण्याचाही नीलाचा मूड नव्हता. त्या दोघी कॉम्पुटर लॅबच्या बाहेरून चक्कर मारायला आणि सुशांत लॅबमधून बाहेर पडायला एकच गाठ पडली. "सुशांत मला तुझ्याशी काही बोलायचं!" तिच्या ह्या अनपेक्षित वाक्याने सुशांत काहीसा आश्चर्यचकित झाला. कॉलेजबाहेरच एक हॉटेल होते तिथं दोघं निघाली. बरेच दिवस दोघांचं असं काही बोलणं झालं नव्हतं. त्या दोघांना एकत्र चालताना पाहून त्यांच्याकडे फिरून फिरून वळणाऱ्या नजरांकडे लक्ष देण्याचे सुद्धा भान आज नीलाकडे नव्हते. पण सुशांतला मात्र बरंच टेन्शन आलं होतं. म्हटलं तर आज कॉलेजातला शेवटचा दिवस होता. ह्या नंतर अभ्याससुट्टी आणि मग दोन आठवडा भर चालणारी परीक्षा! त्यानंतर सर्व पक्षी उंच आकाशात भरारी घ्यायला निघून जाणार होते. त्यातील कोण्या दोघांना एकत्र घरटे वसवायची इच्छा असल्यास त्यांना दोघांना आताच निर्णय घ्यायचा होता. पण हा निर्णय घ्यायचा अधिकार आणि मुख्य म्हणजे घरटे उभारायची ताकद ह्या दोघांकडे होती का हा महत्वाचा प्रश्न होता.
"सुशांत मला तुझ्या बाबांच्या पक्षाकडून आमदारकीच्या तिकीटाची ऑफर देण्यात आली आहे!" नीलाच्या ह्या पहिल्याच वाक्याने सुशांत अगदी भुईसपाट झाला. त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून ह्याला ह्या प्रकरणातील काहीच माहिती नाही ह्याची नीलाला खात्री पटली. "मग तू काय ठरवलं आहेस?" बाकी काहीच न सुचल्यामुळे तो हे वाक्य बोलून गेला. नीलाला काय उत्तर द्यायचं हे उमगत नव्हतं. सुशांतला ह्या प्रकरणातील काहीतरी माहित असेल आणि तो आपल्याला हा निर्णय का घेतला गेला ह्याची अधिक माहिती देऊ शकेल अशी जी आशा तिने ऊरी बाळगली होती ती निष्फळ ठरली होती. आपल्या दोघांच्या भवितव्याविषयी काय असं त्याला विचारावं असाही विचार तिच्या मनात क्षणभर आला. पण निर्णय घेण्याच्या बाबतीत आजस्तोवर सुशांतने तिला पूर्ण निराश केलं होतं आणि आजही ह्याच्याकडून फारशी काही अपेक्षा करावी असं काही वेगळं चिन्ह तिला दिसत नव्हतं. "बघू काय करायचं ते! आई बाबा म्हणतील तेच मी करीन!" तिच्या चेहऱ्यावरील निराशा सुशांतला स्पष्ट दिसत होती. "चल मग निघुयात! तुला अभ्यास करायचा असेल नाही!" नीला म्हणाली. खरं तर तिरक्यात बोलण्याचा तिचा स्वभाव नव्हता पण आज सुशांतकडून तिची पूर्ण निराशा झाली होती आणि म्हणून हे वाक्य तिच्या तोंडून गेलं होतं. "एक मिनिट थांब नीला!" सुशांतच्या चेहऱ्यावर प्रथमच तिला खंबीर भाव दिसत होते. "मला तु आवडतेस! माझं तुझ्यावर प्रेम आहे असं मला वाटत पण प्रेम ह्या विषयाची गहनता समजण्याइतपत माझी पात्रता आहे असं मला वाटत नाही! मला तुझ्याशी लग्न करायची इच्छा म्हटलं तर आहे पण माझं माझ्या करियर मध्ये स्थिरस्थावर होणे मला अधिक महत्त्वाचं वाटत! मला स्थिरस्थावर व्हायला किती वेळ लागेल हे मला माहित नाही! पण ज्या दिवशी मी स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा असेन त्या दिवशी मी तुला साद घालीन आणि माझ्या सादेला प्रतिसाद द्यायला तू जर त्या दिवशी तयार असशील तर मग आपल्या दोघांत कोणीच येऊ शकणार नाही!" गेले दोन तीन वर्षे आपल्या मनातील विचार सुशांतने एका दमात सांगून टाकले होते. आणि शेवटी त्याने नीलाचा हात हातात घेऊन आश्वासकपणे हळूच दाबला होता.
आकाशातील सर्व मळभ दूर झाल्यासारखं नीलाला वाटत होतं. "थॅंक यू सुशांत! थॅंक यू सो मच!!" वेटरला बिल आणण्याची खूण करत नीला म्हणाली. इतकं बोलून अगदी भावनाविवश झालेल्या सुशांतमध्ये तिला अडविण्याचे सुद्धा तभान राहिलं नव्हतं. त्याचं आपल्याकडे लक्ष नाही हे पाहून नीलाने हळूच रुमालाने आपल्या डोळ्यात येऊ पाहणारे आनंदाश्रू पुसले होते.
"कुलकर्णींना सांगा मी निवडणूक लढवायला तयार आहे!" रात्री आईबाबा आणि नीला असे सर्वजण जेवायला बसले असताना नीला सहजपणे म्हणाली. दोघांच्याही तोंडातला घास तोंडातच राहिला. आपली पोरगी इतका मोठा निर्णय इतक्या लगेच घेईल ह्यावर विश्वास ठेवणं त्यांना काहीसं कठीण जात होतं.
पुढचे काही दिवस अगदी धामधुमीत गेले. एका २१ वर्षाच्या अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या मुलीला मुख्य राजकीय पक्षाने तिकीट देण्याची बातमी राज्यपातळीपर्यंत जाऊन पोहोचली. त्यामुळे नीलाने अर्ज दाखल करण्याच्या दिवशी मीडियाचे बरेच लोक हजर राहिले. नशिबाने निवडणूक एक महिन्यावर होती. त्यामुळे अर्ज भरून आल्यावर नीला थेट अभ्यासात गुंतली. तिने पुन्हा एकदा अभ्यासात स्वतःला झोकून दिलं. आठव्याचे पेपर चांगले गेले. म्हणजे अजूनही चांगले जाऊ शकले असते पण इतक्या सगळ्या व्यवधानाकडे पाहता ठीक गेले.
आणि मग मात्र तिने प्रचारात स्वतःला झोकून दिलं. पक्षाची यंत्रणा अगदी सुसज्ज होतीच आणि एका तरुण चेहऱ्याला तिकीट मिळालं म्हणून सर्व तरुणाई अगदी बेहद्द खुष होती. फेसबुक, whatsapp वरील प्रचार खुद्द नीला सांभाळत होती आणि पारंपारिक प्रचार कुलकर्णी सांभाळत असल्याचं चित्र दिसत होतं. असं असलं तरी पडद्यामागून राव सर्व सूत्र सांभाळत होते. आणि एका प्रचार सभेला खुद्द सुशांतने हजेरी लावली तेव्हा नीलाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आयुष्याचे रंग अगदी हातात आल्यासारखं तिला वाटत होतं. ह्या सगळ्या सुसूत्र प्रचारामुळे विरोधकांनी आधीच हार मानल्यात जमा होती. नीलाचे आईवडील मात्र अगदी बेचैन होते. आपली अगदी छोटी मुलगी अचानक मोठी झाली होती आणि आता तिच्याशी दोन शब्द बोलणं सुद्धा अशक्य झालं होतं.
निवडणूक शांतपणे पार पडली. आणि निकालाचा दिवस उजाडला. अगदी पहिल्या फेरीपासूनच अपेक्षेनुसार नीलाने मोठी आघाडी घ्यायला सुरुवात केली होती. आणि मग नीलाचा विजय घोषित होताच सर्वत्र उत्साहाला उधाण आलं!! एका मध्यमवर्गीय घरातील मुलगी आमदार झाली होती.
आठव्याचा निकाल जाहीर झाला. आणि तिथेही नवनिर्वाचित आमदारांनी विशेष प्राविण्य मिळवलं होतं. आता RBS ला जॉईन होणे शक्य नव्हते. सुशांत एकटाच बंगलोरला निघाला होता.
राव आणि कुलकर्णी आनंदात घरी बसले होते. रावांचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या प्रक्रियेतील पहिली पायरी नीलाच्या विजयाने साध्य झाली होती. आता रावांना आर्थिक घोटाळ्यातील आरोपांपासून मुक्त करणे आवश्यक होते. आणि त्यासाठी त्यांना मित्तलवर लक्ष केंद्रित करावे लागणार होते. ही योजना कशी आखायची ह्याचा विचार राव करीत होते. बरीच मेहनत करावी लागणार अशी चिन्ह दिसत होती. "राव हे प्रकरण इतकं काही कठीण नाही! ही पहा मी बनवलेली योजना!!" असं म्हणत कुलकर्णीनी एक फाईल रावांच्या हाती सुपूर्त केली. काहीशा आश्चर्यचकित झालेल्या रावांनी जसजशी त्यातील कागदपत्रे चाळावयास सुरुवात केली तसतसे त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव दिसू लागले. पूर्ण फाईल चाळून त्यांनी बाजूला ठेवली तेव्हा रात्रीचा एक वाजला होता. कुलकर्णी अजूनही बाजूलाच बसले होते. रावांनी प्रसन्न मुद्रेने त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. "मित्तल आता पहा! बुद्धीबळाच्या खेळातील धमाल!!" रावांनी एक आत्मविश्वासपूर्वक गर्जना केली!
(क्रमशः)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा