हल्ली प्रत्येकजण चिकिस्तक बनला
आहे. मुलभूत गरजा
पूर्ण झाल्यावर करणार
तरी काय म्हणा?
चिकीस्ता कोणत्या गोष्टीची, किती
प्रमाणात करावी हा
ज्याचा त्याचा वैयक्तिक
प्रश्न. चिकीस्तेचे फायदे
/ तोटे नानाविध. फायदे
म्हणायचे झाले तर
आपल्या ज्ञानात भर
पडते, एखाद्या गोष्टीची,
व्यक्तीची आपल्याला सर्वांगाने माहिती
होते. ह्या माहितीचा
वापर आपण भविष्यात
योग्य निर्णय घेण्यासाठी
करू शकतो. तोटे
कोणते? चिकीस्तेच्या मार्गाच्या
सुरुवातीलाच एक पाटी
लावलेली असते 'ENTER AT YOUR OWN RISK'. काही गोष्टींच्या
बाबतीत असे म्हणावे
लागेल की अज्ञानातच
सुख असते. साधे
उदाहरण द्यायचे झाले
तर आपल्या आहाराविषयीच्या
सवयी. ज्या क्षणी
तुम्हाला कॅलरी ह्या
प्रकाराची माहिती होते
त्यावेळी तुमच्या आयुष्यातील जिव्हा
सुखाला तुम्ही मुकण्याचा
धोका संभवतो. कोणत्याही
नातेसंबंधांची जास्त चिकीस्ता
करू नये. जीवनातील
काही सुंदर गोष्टी
दुरूनच सुंदर भासतात
त्यांना तसेच राहू
द्यावे!
सुनियोजित सखोल विश्लेषणानंतर फार
कमी गोष्टींची / व्यक्तींची महती कायम राहू
शकते. हे आपल्या पूर्वजांना
पक्के ठाऊक होते. आपण
ही गोष्ट थोडीतरी
ध्यानात ठेवावयास हवी !शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोलाहलाच्या पलीकडं !
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...
-
गतकाळातील वैभवशाली साहित्यिक इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची संधी आपण जरी गमावली असली तरी सुदैवानं ह्या कालखंडातील उत्कृष्ट का...
-
गेल्या शनिवारी दोन आठवड्यांच्या अमेरिका भेटीनंतर मी मुंबईत परतलो. ह्या भेटीचा संक्षिप्त वृत्तांत. जाणकारांच्या माहितीसाठी - कामासंबंधित कोणत...
-
दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता दिवस, आठवडे, महिने, वर्षं आणि किंबहुना आयुष्य सरत जातं. भुतकाळाच्या रम्य आठवणींना उजाळा देत बसायचं की व...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा