मला हे कसोटी सामने जेव्हा संधी मिळते तेव्हा बघण्यास आवडतात. यामागे काही कारणे आहेत. पहिलं म्हणजे पाकिस्तानी संघ आपल्या मैदानावरील कारनाम्यांमुळे तुमचे सतत बऱ्यापैकी मनोरंजन करीत असतो. मी त्यांच्या संघाचा कप्तान असलेल्या सर्फराजचा चाहता आहे. हा माणूस त्याच्या मनात जे काही चाललं आहे ते जसंच्या तसं त्याच्या चेहऱ्यावर प्रदर्शित करतो. यष्टीरक्षण करता करता तो संघाचे नेतृत्व सुद्धा करीत असतो. त्यामुळे एखाद्या गोलंदाजाने खराब चेंडू टाकला किंवा क्षेत्ररक्षकाने ढिसाळ क्षेत्र रक्षण केले की हा गडी खूपच संतापतो! मग उर्दूमध्ये जोरदार शेलके शब्द वापरून त्या गोलंदाज अथवा क्षेत्ररक्षकाची निर्भत्सना करीत असतो.
तो फलंदाजीला आल्यानंतर सुद्धा करमणुकीचे क्षण काही कमी नसतात. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानचे फलदांज खेळपट्टीवर गप्पा मारत असताना धावबाद झाले ती घटना जगप्रसिद्ध झाली. परंतु परवाच्या दिवशी सर्फराज आणि पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज यासिर शहा मैदानावर फलंदाजीस उतरले असताना सुद्धा एक धमाल घटना घडली. सर्फराजने चेंडू कव्हरमधुन टोलावला. त्याने दोन धावांची हाक दिली. परंतु यासिर महाशयांच्या पायातील बूट पहिली धाव घेत असताना निघाला. तरीसुद्धा सर्फराजच्या ही गोष्ट ध्यानात न आल्याने त्याने दुसऱ्या रनसाठी जोरदार धाव घेतली. आता आपला कप्तान वेगाने येतो आहे हे म्हटल्यावर यासिरने एका पायात बूट आणि दुसरा अनवाणी पाय या परिस्थितीत नॉनस्ट्रायकर एन्डकडे कूच करणे पसंत केले. परंतु या सर्व गडबडीत तो धावबाद झाला. त्यानंतर दहा - पंधरा सेकंद सर्फराज एकदम हातवारे करीत राहिला! तुझ्या पायातील बूट निघाला तर तूच मला सांगायचे नाही का? तो खुणावत होता. बिचारा यासिर खाली मान घालून सीमारेषेबाहेर चालला होता. आपल्या हातवाऱ्यांकडे लक्ष देणारे मैदानावर कोणी नाही हे लक्षात आल्यावर सर्फराज अत्यंत दुःखी चेहऱ्याने खाली बसून शोक करीत राहिला.
आता वळुयात आपण भारतीय क्रिकेट क्रिकेटपटूंकडे!! आपल्या देशातील क्रिकेट हल्ली इतक्या व्यावसायिकपणे खेळले जाते की आपल्या देशातील लहान बालके ज्यांना क्रिकेटचे शास्त्रोक्त शिक्षण दिले जात आहे त्यांच्याकडून अशा चुका क्वचितच घडताना दिसून येतात!! पूर्णपणे भिनलेल्या व्यावसायिक हे मुळे असे मजेशीर क्षण मात्र भारतीय क्रिकेटमध्ये अनुभवायला मिळत नाहीत!! न्युझीलंडसोबत झालेल्या पराभवामुळे काहीशा हताश झालेल्या सर्फराजने कप्तानपदावरून निवृत्त होण्याचा विचार मनात घोळत असल्याचे कबुल केले आहे!! एका जेन्युईन खेळाडूची कारकीर्द काहीशी धोक्यात आली आहे
आता वळुयात ते केन विल्यम्सन या एका अत्यंत गुणी खेळाडूकडे!! जो एक हुशार कप्तानसुद्धा आहे. तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात ७४ धावांनी पिछाडीवर पडलेल्या न्युझीलंड संघाच्या दुसऱ्या डावातदेखील सुरुवातीच्या काही विकेट्स चटकन पडल्या होत्या. पण विल्यम्सनने एका नवोदित खेळाडूसोबत पाचव्या विकेटसाठी एक मोठी भागीदारी करुन न्यूझीलंडला सामन्यात परत आणले. मग पाचव्या दिवशी सकाळी अचानक आक्रमण स्वीकारुन त्याने पाकिस्तानसमोर एक आव्हानात्मक लक्ष्य ठेवलं. आखातामध्ये घेऊन आलेल्या फिरकी गोलंदाजांच्या मदतीने त्याने पाचव्या दिवशी एक रंगतदार विजय आपल्या संघाला मिळवून दिला. हा एक गुणी खेळाडू पुढील काही वर्ष आपल्या खेळाने आणि कप्तानगिरीने आपल्याला आनंद देत राहील हीच अपेक्षा! न्यूझीलंडचा हा पाकिस्तानवर मायभूमीपासुन दुर मिळविलेला ४९ वर्षानंतरचा विजय!
२०१४ साली निर्माण केलेल्या ह्या ब्लॉगच्या हिट काउंटची संख्या आता १ लाखाच्या आसपास आली आहे! त्यामुळे तुम्ही ह्या ब्लॉगचे १००००० वे वाचक असु शकता !!!
त्याआधीचा ब्लॉग http://nes1988.blogspot.com/ ह्यावर आपण आधीचे ब्लॉग वाचु शकतो !
Williamson, one of my favorite captain ad ae is gentleman. Very good wtittwr, Aditya
उत्तर द्याहटवाNicely narrated Aditya!
उत्तर द्याहटवा