मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

गणित - काही भागाकार तत्वे



१> एखाद्या संख्येला ३ ने पूर्ण भाग जातो कि नाही हे जाणून घेण्यासाठी तिच्या सर्व आकड्यांची बेरीज करत राहा. ही बेरीज जेव्हा एका आकड्यात येईल तेव्हा ती ३,६,९ असल्यास त्या संख्येला ३ ने पूर्ण भाग जातो. उदाहरण - ६५७९ => ६ + ५ + ७+ ९ = २७ = > २ + ७ = ९. त्यामुळे ६५७९ ला ३ ने भाग जातो. हे अजून पुढे सोपे करायचे असल्यास बेरीज करताना संख्येतील ३,६, ९ ह्यांना वगळा. वरील उदाहरणात ६,९ ला वगळा. मग ५७ राहतात. त्यांची बेरीज करा. ती बारा येईल त्याची बेरीज केल्यास ३ येतील. त्याच प्रमाणे एखादया संख्येत लागोपाठचे तीन अंक असल्यास त्या संख्येला ३ ने पूर्ण भाग जातो. उदाहरण २३४, ४३२, ७८९.
२> हेच तत्व ९ ला लागू पडते. एखाद्या संख्येला ९ ने पूर्ण भाग जातो कि नाही हे जाणून घेण्यासाठी तिच्या सर्व आकड्यांची बेरीज करत राहा. ही बेरीज जेव्हा एका आकड्यात येईल तेव्हा ती ९ असल्यास त्या संख्येला ९ ने पूर्ण भाग जातो. उदाहरण - ३८७९ => ३ + ८ + ७+ ९ = २७ = > २ + ७ = ९. त्यामुळे ३८७९ ला ९ ने भाग जातो. हे अजून पुढे सोपे करायचे असल्यास बेरीज करताना संख्येतील ९ ला वगळा. वरील उदाहरणात ९ ला वगळ्यास ३८७ राहतात. त्यांची बेरीज करा. ती अठरा येईल त्याची बेरीज केल्यास ९ येतील. त्याच प्रमाणे एखादया संख्येत लागोपाठचे तीन अंक असल्यास, आणि त्यातील मधला अंक ३,६ किंवा ९ असल्यास त्या संख्येला ९ ने पूर्ण भाग जातो. उदाहरण २३४, ५६७, ७६५.
३> कोणत्याही संख्येचा शेवटचा अंक ०,२,४,६,८ ह्यापैकी एक असल्यास त्याला २ ने पूर्ण भाग जातो.
४> कोणत्याही संख्येचा शेवटचा अंक ०,५ असल्यास त्याला ५ ने पूर्ण भाग जातो.
५> कोणत्याही संख्येने अटी १ आणि ३ पूर्ण केल्यास त्याला ६ ने पूर्ण भाग जातो.
६> ४ हा १०० च्या पटीत आपली आवर्तने पूर्ण करतो. त्यामुळे कोणत्याही संख्येला ४ ने भाग जातो की नाही हे पाहण्यासाठी त्याची केवळ दशक आणि एकक स्थानचे आकडे पाहणे गरजेचे असते. उदाहरण १२३४६८ - ह्यातील आकडे ६८ - ६८ ला ४ ने पूर्ण भाग जात असल्याने १२३४६८ ला ४ ने पूर्ण भाग जातो.
७> ८ हा २०० च्या पटीत आपली आवर्तने पूर्ण करतो. त्यामुळे कोणत्याही संख्येला ८ ने भाग जातो की नाही हे पाहण्यासाठी त्या संख्येतून २०० ची सर्वात मोठी पट वजा करावी. २०० च्या पटी म्हणजे २००, ४००, ६००, ८००, ००० ने संपणाऱ्या संख्या! राहिलेल्या संख्येला ८ ने भागावे. उदाहरण १२३४७२ - ह्यातून वजा होणारी सर्वात मोठी दोनशेची पट म्हणजे १२३४००. राहता राहिले ७२. ७२ ला ८ ने भाग जात असल्याने १२३४७२ ला ८ ने पूर्ण भाग जातो.
८> आता राहिला तो ७ - ह्याची सोपी युक्ती अजून मला माहित नाहीये. बघू तुम्हाला सापडते का.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...