मनुष्यजातीच्या प्रगतीच्या कोणत्या एका टप्प्यात साप्ताहिक सुट्टी ह्या संकल्पनेचा उदय झाला असणार ह्यावर माहिती आंतरजालावर थोडा शोध करून पाहिला असता काही विशेष माहिती हाती पडली नाही. सध्या बहुतांशी देशात शनिवार - रविवार अशी सुट्टी दिली जाते. काही मुस्लिम देशात ही शुक्रवारी दिली जाते. वेदिक कालीन भारतात शनिवारी दिली द्यायची असा उल्लेख आढळतो. पण त्याविषयी खात्रीलायक पुरावा नाही.
साप्ताहिक सुट्टीचे प्रयोजन काय असावे ह्याविषयी काही विचार!
१> मनुष्यप्राणी कोणतीही एकच गोष्ट सतत करू शकत नाही. त्याला एकच गोष्ट करून मानसिक किंवा शारीरिक किंवा दोन्ही प्रकारचा थकवा येतो. त्यामुळे त्याला त्यात खंड घ्यावासा वाटतो.
२> खंड घेण्यासाठी मनुष्याकडे अन्न आणि वित्त ह्याचा पुरेसा पुरवठा असणे आवश्यक असते. दैनंदिन मजुरीवर काम करणाऱ्या मजुरांची कल्पना करून पहा. बऱ्याच वेळा त्यांच्यापाशी अन्नाचा अथवा द्रव्याचा पुरेसा साठा नसल्याने त्याला दररोज काम करणे आवश्यक असते.
३> बहुतांशी उदाहरणात खंड घेण्याची चैन परवडू शकण्याची स्थिती सर्वांची असते. मग ह्या सुट्टीचा उपयोग लोक कसे करतात हे पाहणे मनोरंजक ठरेल. सुट्टीचा मुख्य हेतू हा स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ताजतवानं करणे हा असला तरी ही प्रामुख्याने तुमच्या व्यावसायिक जीवनाची गरज असते. प्रत्येकाला अजून दोन प्रकारची जीवनं असतात ती म्हणजे कौटुंबिक जीवन आणि सामाजिक जीवन. साप्ताहिक सुट्टीच्या कालावधीत तुमच्या कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्यांना न्याय द्यायची अधिकची जबाबदारी तुमच्यावर येऊन पडते.
४> शारीरिक दृष्ट्या स्वतःला ताजतवानं करण्यासाठी विश्रांतीची गरज असते. त्यात काही तडजोड करता येत नाही. पण मानसिक ताजतवानं व्हायच्या दृष्टीने विचार केला तर ज्याप्रकारे व्यवस्थित झोप घेऊन शारीरिक दृष्ट्या ताजतवानं करता येतं. हे शारीरिक ताजेपण काही अंशी जसं मानसिक ताजेपणात परिवर्तित होण्याची शक्यता असते तसंच तसंच व्यवस्थित व्यायामानं किंवा निसर्गातील भटकंतीने सुद्धा मनाला ताजतवानं करता येत. भटकंतीने मानसिक विरंगुळा बहुदा सर्वांनाच मिळतो पण शारीरिक दृष्ट्या ते ताजेतवाने होतात की नाही हे प्रत्येकाच्या शरिरीक क्षमतेवर अवलंबून असते.
आता हा खालील काहीसा विचार करायला लावणारा (आणि थोडा मजेशीरही) तक्ता पहा!
कृती
|
शारीरिक रिचार्ज
|
मानसिक रिचार्ज
|
कौटुंबिक जबाबदारी पार पाडलीत?
|
सामाजिक जबाबदारी पार पाडलीत?
|
झोप
|
हो
|
काही प्रमाणात हो
|
नाही
|
नाही
|
व्यायाम
|
काही प्रमाणात हो
|
काही प्रमाणात हो
|
नाही
|
नाही
|
कुटुंबासोबत भटकंती
|
काही प्रमाणात हो
|
काही प्रमाणात हो
|
हो
|
नाही
|
मित्रांसोबत भटकंती
|
काही प्रमाणात हो
|
(बहुदा जास्त प्रमाणात) हो
|
नाही (भयावह स्थिती निर्माण होण्याची शक्यता!)
|
अल्प प्रमाणात हो!
|
कार्यालयीन सहकार्यांसोबत भटकंती
|
काही प्रमाणात हो
|
(बहुदा कमी प्रमाणात) पण हो
|
नाही
|
अल्प प्रमाणात हो!
|
कुटुंबासोबत मॉलभेट
|
नाही
|
बहुदा नाही
|
११० टक्के हो!
|
नाही
|
नातेवाईक भेट
|
नाही
|
कोणत्या बाजूच्या नातेवाईकांना भेट दिलीत त्यावर अवलंबून!!
|
कोणत्या बाजूच्या नातेवाईकांना भेट दिलीत त्यावर अवलंबून!!
|
नाही
|
निराधार बालक, वृद्धाश्रम अशा संस्थांना भेटी |
बहुदा नाही
|
२०० टक्के आणि अधिक
|
नाही
|
२०० टक्के आणि अधिक
|
एक ब्लॉग पोस्ट लिहलीत | नाही | खूप | कौटुंबिक पातळीवर थोडीशी धोकादायक स्थिती | विषय कोणता निवडलात त्यावर अवलंबून!! |
दोन ब्लॉग पोस्ट लिहल्यात | नाही | खूपच | कौटुंबिक पातळीवर तीव्र धोकादायक स्थिती | विषय कोणता निवडलात त्यावर अवलंबून!! |
तीन ब्लॉग पोस्ट लिहल्यात |
नाही
|
आता कसं हलकं हलकं वाटतंय
|
आणीबाणी
|
विषय कोणता निवडलात त्यावर अवलंबून!!
|
अशी ही यादी अजून लांबत जाईल. ह्यात सोफ्यावर लोळत क्रिकेट सामना पाहिलात, मुलाचा अभ्यास घेतलात, बाजारात जाऊन भाजी आणलीत अशा अनेक गोष्टींचा समावेश करता येईल.
लेखाचा ओघ काहीसा वेगळ्या दिशेने गेला. पण ऑफिसात बरीच उच्चपदीय मंडळी पाहिली की ती जाणीवपूर्वक स्वतःला नवीन आठवड्यासाठी पूर्णपणे मानसिकदृष्ट्या रिचार्ज करण्यासाठी प्रयत्न करत असतात हे नक्कीच जाणवतं. अजूनही आपल्याकडे ह्या विषयी फारशी जाणीव नाही. जसजसा माणूस जबाबदारीच्या वरच्या पायऱ्या ओलांडत जातो तसतसे त्याला स्वतःच्या मेंदूची आणि पर्यायाने स्वतःच्या मानसिक स्थितीची काळजी घेता आली पाहिजे. व्यावसायिक जग खूप निर्दयी असतं. साप्ताहिक सुट्टी असो वा वार्षिक सुट्टी असो, तुम्ही सुट्टीवरून परत आलात म्हणून तुम्हांला तुमच्या कामगिरीबाबत सवलत काही मिळत नाही. त्यामुळे ह्याविषयी सतर्क राहा इतकेच म्हणणे!!
एक गोष्ट आताच जाणवली आणि ती म्हणजे मानसिकदृष्ट्या ताजतवानं होणं नक्कीच गरजेचं असतं. हे मानसिकदृष्ट्या टवटवीत होणे कार्यालयातील चांगल्या कामिगिरीसाठी की जीवनगाणे उत्साहाने गाण्यासाठी हा ज्याचा त्याचा प्रश्न! आता शारीरिक विश्रांती, गुणवत्तापूर्ण कौटुंबिक वेळ, मित्रांबरोबर घालविलेला वेळ किंवा सामाजिक कार्य ह्यातील कशाने तुम्ही मानसिकदृष्ट्या टवटवीत होता हे ओळखणं महत्वाचं!!ते ओळखून त्याप्रमाणे साप्ताहिक सुट्टीत त्या साठी वेळ नक्कीच बाजूला काढून ठेवा! अगदी आपल्या जीवनसाथीशी बोलून!
बाकी गेल्या तीनचार दिवसातील ही तिसरी पोस्ट!!!
नवीन ब्लॉग बनविल्या बद्दल अभिनंदन परंतु नवीन ब्लॉगची theme एवढी खास नाही आणि Fonts ची साईझ लहान असल्याने वाचायला प्रचंड त्रास होतो. काही तरी करा साहेब............. (आपल्या माणसाचा सल्ला)
उत्तर द्याहटवाराजु साहेब, प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद! प्रतिक्रियेवर नक्कीच येत्या एक दोन दिवसात कृती करीन!
उत्तर द्याहटवा