मागच्या ब्लोगमध्ये ज्ञानी लोकांच्या
लिखाणाविषयी म्हटले होते.
ह्या लोकांचा त्या
विषयातील व्यासंग दांडगा असतो.
सद्यकालीन आणि माझ्या
मर्यादित वाचनात आलेला
असा ज्ञानी लेखक
म्हणजे डॉ. गिरीश
कुबेर! लोकसत्तेत शनिवारी
ते सुंदर लेख
लिहितात.
पहिला लेख होता
कर्ता आणि करविता
ह्या विषयावर! करविता
ह्या वर्गातील लोक
मुळच्या आर्थिक भांडवलाला
कृत्रिम फुगवटा आणण्याची
कामे करतात, ही
फुगी खरी असल्याचा
आभास निर्माण करण्याची
किमया हे करविते
करतात. असाच हा कृत्रिमरीत्या वाढविलेला फुगा
केव्हातरी फुटतो आणि
ह्या फुगवट्याच्या आधारावर
केलेली सर्व गणिते
कोलमडून पडतात. असा
एकंदरीत ह्या लेखाचा
मतितार्थ! आजचा दुसरा
लेख होता विविध
आर्थिक घोटाळ्यात सापडलेल्या
उच्चपदस्थ अनिवासी भारतीयांविषयी! ह्या
अशा उच्चपदस्थ घोटाळ्यातील
भारतीयांची संख्या वाढत
चालल्याचे त्यांनी सोदाहरण पटवून
दिले आहे.
सध्या टूर द फ्रांस ही
जगप्रसिद्ध सायकल शर्यत
चालू आहे. बरेच
दिवस चालणारी ही
सायकल शर्यत, ज्या
प्रमाणे स्पर्धकांच्या शारीरिक
क्षमतेची कसोटी पाहते
त्याचप्रमाणे स्पर्धकाच्या विविध गटांचे
डावपेच पाहणे सुद्धा
आनंददायी अनुभव असतो.
मी जेव्हा संधी
मिळते तेव्हा ही
शर्यत पाहतो त्याचे
मुख्य कारण फ्रान्सच्या
नयनरम्य गावांचे घडणारे
मनोहर दर्शन! ह्या
स्पर्धेतील गट कसे
पाडले जातात आणि
त्यांची गुणपद्धती कशी
आहे ह्याचा मला
अजिबात ठावठिकाणा नाही.
नयनरम्य फ्रान्सच्या भागातून
जाणारे हे सायकलस्वारांचे
जथ्थे! एक आघाडीचा
आणि बाकी सर्व
पिछाडीचे! ह्या सायकलस्वारांचा
वेग तसा बर्यापैकी,
ताशी २५ किमी ते शेवटच्या
टप्प्यात ४० किमीपर्यंत
जात असावा. आघाडीच्या
समूहातील सायकलस्वार बरेच अंतर
एकत्र पार पाडतात,
त्यांच्याबरोबर असतात त्या
मोटारी, बाइक्स आणि
हेलीकोप्तर. इतके अंतर
पार पाडायचे असल्याने
शक्ती राखून ठेवणे
आवश्यक, जरा वेळ मान समोर
ठेवून सायकल चालविल्यावर
थोडा वेळ मान खाली आणून
सायकल चालावावयाची, मध्येच
बाजूच्या सहाय्य चमूकडून
पाण्याची बाटली घेवून
आपली तहान भागवायची,
हे सर्व करता
करता आपल्या प्रतिस्पर्ध्यावर
नजर ठेवायची ह्या
सर्व गोष्टी हे
स्पर्धक साधत असतात.
त्यांचे हे सर्व डावपेच पाहणे
मजेशीर असते. ही
शर्यत जेव्हा एखाद्या
गावातून जाते त्यावेळी
तेथील ग्रामस्तांच्या चेहऱ्यावरील
आनंद टिपण्याजोगा! अगदी
पूर्वी बलिप्रतिपदेला वसईला
होणार्या सायकल शर्यतीतील
स्पर्धक रमेदिहून गेले
की मला होणार्या
आनंदासारखा!
पुढील आठवड्यात ऑलिम्पिक
चालू होईल. माझी
सर्वांना कळकळीची विनंती! सर्व
मालिका, इंटरनेट सर्व
काही बाजूला सोडा
आणि ऑलिम्पिक पहा.
देशाच्या प्रतिष्ठेसाठी आपल्या प्रयत्नांची
पराकाष्ठा करणर्या खेळाडूंचा यज्ञ
पाहण्यासारखा आनंद नाही!
लयबद्ध जलतरण स्पर्धा,
मेराथोन स्पर्धा, नेमबाजी
स्पर्धा, लांब पल्ल्याच्या
धावण्याच्या / पोहण्याच्या स्पर्धा - मनुष्याच्या
शरीराच्या / मनाच्या एकाग्रतेची कसोटी
पाहणाऱ्या ह्या विविध
स्पर्धा एकत्र पाहण्यासारखा
दुसरा आनंद नाही!
हा आनंद लुटताना
आयोजकांच्या अथक परिश्रमाला
दाद द्यायला विसरू
नका!
लेखाचा पूर्वार्ध आणि
उत्तरार्ध ह्यात एकच
समान सूत्र. जीवनातील
झटपट आनंदाच्या / सुखाच्या
मागे लागलेलो आपण
बहुतांशी भारतीय. आणि छोट्या
छोट्या सुंदर गोष्टीतून
जीवनाचा आनंद खर्या
अर्थाने लुटणारे प्रगत
देशातील खेळाडू, क्रीडा
आणि कलारसिक! आर्थिकदृष्ट्या
समृद्ध होण्याचे आपले
स्वप्न साकार करता
करता आपली रसिकता
जोपासण्याचे थोडेसे प्रयत्न
आपण करून बघुयात
का?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
साप्ताहिक सुट्टीचा संभ्रम !
शनिवार सकाळी माझ्या मनात आदर्शवाद ओसंडून वाहवत असतो. आपल्याकडं देवानं दिलेलं पुढील बारा तास आहेत, त्यांचं आपल्या आयुष्यातील विविध जबाबदाऱ्या...

-
बोर्डी हे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर गुजरातच्या सीमेवर वसलेलं एक शांत गाव. गावाची लोकसंख्या अजूनही विरळ अशी म्हणावी असल्याने बोर्ड...
-
पुस्तक प्रदर्शनात घेतलेल्या तीन पुस्तकांपैकी वि . स. खांडेकरांची अश्रू ही कादंबरी एक . कथा म्हणून बघितली तर साधी सुधी . एका आदर्श वादी श...
-
महाराष्ट्राला समाजसुधारकांची थोर परंपरा लाभली आहे. तत्कालीन महाराष्ट्रात ज्या लोकरुढींविषयी ह्या विचारवंतांना सुधारणा कराव्याशा वाटल्या त...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा