लेखक बनण्यासाठी मुलभूत गुणधर्म
कोणते? ह्या प्रश्नाचे
उत्तर द्यायचे झाल्यास
विविध बाबी नजरेसमोर
येतात.
- आपल्या संभाव्य वाचकवर्गाची माहिती, त्या वाचकवर्गाला आवडेल अशा विषयांची निवड, त्या वाचकवर्गाला आवडेल / समजेल अशी लिखाण शैली
- ज्या विषयात लिहायचे त्या विषयातील ज्ञान. (लिखाणाचे विषय अनेक; प्रवासवर्णन, ऐतिहासिक विषयांवरील लेखन, तात्कालिक घटनांवरील भाष्य, आत्मचरित्र, व्यक्तीचरित्र, सामाजिक समस्यांवरील लेखन, कथा (दीर्घकथा, लघुकथा). यादी अशी लांबतच जाईल.
- वाचक वर्गाला खिळवून ठेवण्यासाठी एक तर आपल्या लिखाणाने त्याच्या ज्ञानात भर पडली पाहिजे किंवा आपल्या विनोदी लिखाणाने त्यांना खिळवून ठेवता आलं पाहिजे.
जसजसा समाज
प्रगत होत जातो
तसतस लोक लिहू
लागतात. वरील बाबींपैकी
सुरुवातीला एकही बाब
ह्या नवलेखकांमध्ये उपस्थित
नसते, परंतु ह्या
नवलेखकांची चिकाटी आणि
उत्साह दांडगा असतो.
ई-मेल ने धुमाकूळ घालण्याआधी भारतीय
टपालखाते चालविले ते ह्या नवलेखाकानीच. आपले लेख
सर्व वर्तमानपत्रे, मासिके
यांना पाठविणे, आपल्या
सर्व मित्रवर्गात, नातेवाईकांमध्ये
आपल्या लेखांची चर्चा
मुद्दामच उपस्थित करणे ह्यात
ह्या नवलेखकांचा हात
कोणीच धरू शकत नाही. ई-मेल / इंटरनेट
आल्यावर तर या नवलेखकांचे काम सोपे
झाले. ह्यांनी ब्लॉग
लिहिले, लोकांचे मेल
बॉक्स भरून टाकले.
आता वरती म्हटल्याप्रमाणे
बर्याच नवलेखकांकडे एखाद्या
विषयावर अधिकारवाणीने लिहिण्याच्या
मुलभूत गुणधर्माचा अभाव
असल्याने ते तात्कालिक
विषयांकडे,ढासळणार्या सामाजिक मूल्यांविषयी
लिहितात. मराठी समाजाने
लिखाणात आणि चर्चेत
जो वेळ घालविला
त्याच्या १० टक्के
वेळ जरी त्या
समाजाने प्रत्यक्ष कृतीत
घालविला असता तर त्या समाजाची
स्थिती बरीच वेगळी
असती. दुर्देवाने नवलेखक
ही गोष्ट विसरतात.
हे नवलेखक प्रतिक्रियेचे
आणि स्तुतीचे भुकेलेले
असतात. त्यांना मिळालेली
एक प्रतिक्रिया पुढील
दहा लेखांना जन्म
देते!
अशाच एका नवलेखकांच्या
जबरदस्तीने बनविलेल्या वाचकवर्गा, माझा
तुला सलाम!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा