मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, १५ मार्च, २०१७

तु अशी जवळी ..

सद्यकाली व्यावसायिकदृष्ट्या  यशस्वी होण्याच्या शक्यतेत स्त्री आणि पुरुष ह्या दोघांत फारसा फरक राहिला नाही. व्यावसायिक कारकिर्दीत आरंभीच्या काही वर्षात दोघंही अगदी खांद्याला खांदा लावून काम करत असतात. त्यानंतर विवाह हा एक महत्वाचा मैलाचा दगड आयुष्यात येतो. विवाहामुळं स्त्रीच्या करियरवर परिणाम होण्याची शक्यता तुलनेनं अधिक असते. अपत्यप्राप्तीनंतर तर हा परिणाम अधिकच जाणवतो. मुलं सात आठ वर्षांची झाली की संसार काहीसा स्थिरस्थावर होत असतो. 

ह्या दरम्यान कळत नकळत एक गोष्टघडत असते. पुरुषानं विशेष काळजी घेतली नाही तर स्त्री आणि मुलं ह्यांचं एक अजून वेगळं विश्व निर्माण होऊ लागतं.  आपलं करियर, मित्रमंडळी आणि सामाजिक जीवन ह्यात पुरुष अधिकाधिक गुंतला जातो. बाकी दोन घटकांचं ठावूक नाही पण करियरच्या बाबतीत एक क्षण असा येतो की पुरुषाला आपण शिखरपल्याड पोहोचल्याचं जाणवतं. जोवर हा क्षण पुरुषाच्या आयुष्यात येत नाही तोवर पुरुषांचं व्यवस्थित चाललं असतं. पण ज्यावेळी हा क्षण येतो त्यावेळी पुरुष काहीसा गांगरतो. 


आपलं करियर त्यानं पुर्णपणे शाश्वत घटक गृहित धरला असतो. पण ज्याक्षणी त्याला ह्या घटकाचं अशाश्वत रूप जाणवतं त्यावेळी तो एकंदरीत परिस्थितीचा पुनर्विचार करतो. त्यानं जरी घराकडं काहीसं दुर्लक्ष केलेलं असलं तरी आपलं घरातील स्थान मात्र कायम गृहित धरलं असतं. आणि अशा ह्या वेळी ह्यातील काही पुरुषवर्ग आपलं घरातील स्थान पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. आपण घरातील आपल्या मूळ स्थानापासुन किती दूर गेला आहात आणि आपल्या प्रयत्नात किती खरंखुरेपण आहे ह्यावर ह्या प्रयत्नांची यशस्विता अवलंबुन असते. 

काहीजणांना मग दूरवर असणारी कातरवेळ दिसू लागते. बाकी सर्व घटकांची अशाश्वतता जाणवते आणि अशा वेळी गाण्याच्या ओळी तोंडी येतात - तू अशी जवळी रहा!!

(तळटीप - ही पोस्ट काहीशी स्त्रीधार्जिणी आहे असा पुरुषवाचकांची प्रतिक्रिया होण्याची शक्यता मी आधीच ओळखली आहे.) 

1 टिप्पणी:

  1. अनेक शक्यतांपैकी तू फक्त एकाच गृहीत धरलेली इथे,
    पुरुषाचा प्रगतीचा आलेख चढताच राहू शकतो किंवा स्त्रीला काही नवीन संधी मिळू शकतात. तू म्हटल्या प्रमाणे पुरुषाचे व्यावसायिक स्थान डळमळीत झाले तर तो आपल्या घरातील स्थानाचा जास्त गांभीर्याने विचार करेल पण तसे झालेच नाही तर??

    उत्तर द्याहटवा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...