भारतीय संघाची इंग्लंड
दौर्यातली कामगिरी एकदम सुमार
झाली. ज्या ज्या
गोष्टी चुकीच्या होऊ
शकतात त्या सर्व
चुकीच्या झाल्या. मिडास स्पर्श
लाभलेला धोनी सुद्धा
अगदी हतबल झाल्यासारखा
वाटला. मालिकेच्या सुरुवातीलाच
हे स्पष्ट झाले
की हा भारतीय
संघ ह्या दौर्यात
तरी इंग्लिश संघाची
बरोबरी करू शकणार
नाही. परंतु पूर्ण
मालिका खेळणे मात्र
क्रमप्राप्त होते. सामना
संपल्यावर (हरल्यानंतर) पत्रकार परिषदेला
शांतपणे तोंड देणे
याची तुलना लाल
रेषेवाल्या प्रगतीपुस्तकाची आईवडिलांकडून तपासणी किंवा
महाकाय चूक केल्यानंतर
साहेबाकडून होणारी कानउघाडणी
ह्याच्याशी काही प्रमाणात
होवू शकते. काही
प्रमाणात अशासाठी म्हटले कारण
पत्रकार परिषदेतील क्रिकेट
खेळाडूंची अवस्था सर्व
दुनियेसमोर मांडली जाते.
आता भारतीय खेळाडूंनी
जिगर दाखविली असती
तर मालिकेचा निकाल
वेगळा (म्हणजे थोडा
तरी कमी लाजीरवाणा)
लागला असता. पण
मी त्या विषयाकडे
वळत नाहीये. भारतीय
संघाची जी अवस्था
इंग्लंड दौर्यात झाली
ती म्हणजे एखाद्या
अशा बिकट स्थितीत
सापडणे की ज्यात
केवळ थांबणे ह्याच
तोडगा असू शकतो.
भयंकर वाहतूक कोंडीत
सापडणे, चुकीच्या साहेबाशी
एखाद्या प्रोजेक्टमध्ये गाठ
पडणे, जेवताना ताटात
कारल्याची भाजी येणे
हे सर्व तात्पुरत्या
बिकट परिस्थितीची उदाहरणे
आहेत. काही वेळा
ही बिकट परिस्थिती
दीर्घकालीन असू शकते;
गंभीर आजार, सुधारण्यापलीकडे
गेलेली जवळची नाती
यात वाट पहायची
म्हंटली तर आयुष्यभराचा
कालावधी घालवावा लागतो.
यातील काही उदाहरणात
एखादा मोठा निर्णय
घेवून त्या परिस्थितीतून
बाहेर पडावे लागते.
परिस्थिती सुधारण्याचे आटोकाट प्रयत्न
करायचे, ह्या प्रयत्नांना
प्रमाणांची आणि वेळेची
मर्यादा घालून द्यायची
आणि ती मर्यादा
ओलांडल्यावर मात्र तो
कठोर निर्णय घ्यायचा.
ह्या प्रकारात प्रत्येकाची
बिकट परिस्थितीची व्याख्या
करण्याची पद्धत, त्या
परिस्थितीचा मुकाबला करण्याची क्षमता,
सहनशीलतेचा परमोच्च बिंदू हे
सर्व बदलणारे घटक
येतात.
बघूया धोनी काय
करतोय ते!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा