अकरावीत प्रवेश घेतल्यावर
दादरला वर्तक वसतिगृहात
मी रहावयास गेलो.
माझा मोठा भाऊ
आणि त्याचे मित्रमंडळ
त्यावेळी तिथे वास्तव्यास
होते. मुंबईत एकंदरीत
कसे वावरायचे याचे
धडे मला भावाकडून
आणि त्याच्या मित्रमंडळीकडून
मिळाले. राजेश सावे
हा भावाचा एक
खास मित्र. राजेशबरोबरच्या
भावाच्या गप्पा बऱ्याच
विषयांवर चालत. ह्या
दोघांचा हिंदी चित्रपटाचा
व्यासंग दांडगा. आधीच्या
वर्षी इजाजत हा
चित्रपट प्रसिद्ध झाला
होता. एकदा हे दोघे ह्या
चित्रपटाच्या गाण्याविषयी चर्चा करीत
होते. एक सो सोला चांद
कि राते वरून
त्यांची गाडी गुलजारवर
आली. त्यांची ती
चर्चा आज मला फार काही
आठवत नाही पण माझी आणि
गुलजारची ही पहिली
ओळख. त्यानंतर जेव्हा
केव्हा गुलजार यांची
प्रेमिकांच्या भावनांचे विविध कंगोरे
शब्दात अचूक पकडणारी
गाणी मी ऐकतो तेव्हा मी
मंत्रमुग्ध होतो. काहींचा
अर्थ मला समजला,
काहींचा नाही ! अशाच
काही गाण्यांचे मला
समजलेल्या अर्थाचे हे वर्णन!
सुरुवात करूया आँखों
में हम ने आप के
सपने सजाये हैं
या गाण्यापासून! यात
प्रियकर प्रेयसीच्या प्रेमात
आकंठ बुडला आहे.
त्याच्या स्वप्नात, वास्तवात फक्त
तीच आहे. त्याने
हिऱ्यांची कठोर तपासणी
करून तिच्या डोळ्यांचा
रंग निवडला आहे.
बऱ्याच परिश्रमानंतर त्याला
जीवनाचे रंग गवसले
आहेत. त्यामुळे तिची
मिळालेली साथ सहजासहजी
सोडायला तो स्वप्नातही
तयार नाही. ती
जेव्हा जेव्हा हसते
तेव्हा त्याला जीवनाचा
खरा अर्थ गवसतो.
ती जेव्हा त्याच्या
डोळ्यात बघते तेव्हा
कालचक्रच थांबून जाते
आणि त्या थांबलेल्या
क्षणात त्याला तिच्याबरोबरच्या
युगोनयुगे सहवासाचा आनंद मिळतो.
असेच एक दुसरे
प्रेयसीच्या डोळ्यांविषयीचे अप्रतिम गाणे, आप
की आखों में
कुछ, महके हुए
से राज हैं.
यात प्रेयसीच्या डोळ्यांत
दडलेली गूढ रहस्ये
प्रियकराला शोधायची आहेत. प्रेयसिपेक्षा
तिची अदा अधिक
मोहक आहे असे म्हणण्याचे धाडसही तो
करतो. तिने ओठ उघडल्यावर त्याला मोगऱ्याची
फुले फुलल्याचा भास
होतो, तिच्या डोळ्यात
जीवनभराची साथ देणाऱ्या
साथीदाराची त्याला खात्री
पटते आणि तिच्या
अबोलतेतही ती तिला
जे काही म्हणायचे
आहे ते सर्व सांगून जात
आहे असे त्याला
वाटते. आता वेळ आली ती
नायिकेची! नायकाच्या बोलण्यात अवखळपणा
नाही, तो आपली उगाचच स्तुती
करीत नाही.पण त्याचे एकंदरीत
अविर्भाव बघता त्याच्या
मनात काही भलतासलता
विचार तर नाही ना अशी
शंका तिच्या मनात
येते आणि ही तर तुझ्या
बदमाशीची हद्दच झाली
असा सरळसरळ आरोप
करावयास ती कचरत नाही.
नंतरचे एक गाणे मासूम चित्रपटातील!
हा चित्रपट एकदम
भावूक. पिता असूनही
अनाथपण अनुभवायला लागलेल्या
एका लहान मुलाच्या
भावविश्वाभोवती गुंफलेला! अशा ह्या
चित्रपटात अचानक प्रियकराची
/ नवऱ्याची प्रेयासिविषयी असलेली मालकीभावना
सुंदर शब्दात पकडणारे
हुजूर इस कदर भी ना
इतराके चलिए हे एक सुंदर
गाणे. यात प्रेयसीने
आपल्या सौंदर्याचे उगाचच
प्रदर्शन करून नये
असे प्रियकराला वाटते,
तिच्या सौंदर्याने भाळून
कोणी एखादा आशिक
तिच्या मागे लागेल
असे त्याला वाटते.
पण ह्या गाण्याच्या
शेवटी मात्र प्रियकर
एक खंत व्यक्त
करतो. हे सौंदर्य
वगैरे सर्व ठीक
आहे पण प्रेयसीकडे
हृदयच नसल्याचे त्याला
दुःख वाटते. तिच्याकडे
जर हृदय असते
तर एक सुंदर
प्रेमकहाणी इथे लिहिली
गेली असती असे
त्याला वाटते. ह्या
गाण्याचा पूर्वार्धाच्या मला समजलेल्या
अर्थाविषयी मला पूर्ण
खात्री नाही.
गुलजार ऐकणे हा सुंदर अनुभव
आहे, पण गुलजार
समजणे हे फार मोठे कठीण
काम आहे. ज्याला
जसा गुलजार समजेल
तसा त्याने समजून
घ्यावा आपापल्या भावविश्वाशी
जोडावा. खूप आनंद
मिळतो. असाच मला
समजलेले गुलजार तुमच्यापुढे
मांडण्याचा प्रयत्न मी पुढील
काही दिवस चालू
ठेवीन!
शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
द्वैत -: ChatGPT विश्लेषण
द्वैत कथेचा पुढील भाग लिहायला उशीर होत असल्यानं आज सकाळी ChatGPT ला आतापर्यंत लिहिलेल्या तीन भागांचं विश्लेषण करण्याची विनंती केली. त्यानं द...
-
बोर्डी हे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर गुजरातच्या सीमेवर वसलेलं एक शांत गाव. गावाची लोकसंख्या अजूनही विरळ अशी म्हणावी असल्याने बोर्ड...
-
पुस्तक प्रदर्शनात घेतलेल्या तीन पुस्तकांपैकी वि . स. खांडेकरांची अश्रू ही कादंबरी एक . कथा म्हणून बघितली तर साधी सुधी . एका आदर्श वादी श...
-
महाराष्ट्राला समाजसुधारकांची थोर परंपरा लाभली आहे. तत्कालीन महाराष्ट्रात ज्या लोकरुढींविषयी ह्या विचारवंतांना सुधारणा कराव्याशा वाटल्या त...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा