मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २१ सप्टेंबर, २०१४

Business Case And ROI

आधुनिक काळातील सर्व मंडळींनी शीर्षकातील दोन्ही संज्ञा अगदी कोळून प्याल्या असतील. व्यावहारिक जगतात तग धरण्यासाठी मंडळींना आणि ही मंडळी ज्या कंपनीत काम करतात त्या कंपनीला प्रत्येक निर्णय घेताना ह्या दोन्ही गोष्टीचं भान असणे आवश्यक असते. परंतु आपण जेव्हा ह्या गोष्टी आपल्या वैयक्तिक जीवनात वापरू लागतो तेव्हा मात्र गोंधळ होतो.

१> फेसबुक वरची केलेली लाईक ही पुन्हा पुढे मागे आपण काही पोस्ट टाकू त्यावेळी लोकांनी आपल्याला सुद्धा लाईक केली पाहिजेत ह्या हेतूने केली असतील तर त्यास गुंतवणूक म्हणण्याचा प्रघात आहे.

२> फारसा परिचय नसलेल्या लोकांकडील लग्नाला हजेरी लावणे म्हणजे आपल्या घरातील लग्नाला लोक दिसला पाहिजे म्हणून केलेली गुंतवणूक होय.

३> बऱ्याच वेळेला आपली इच्छा नसताना घरातील मंडळींना बर वाटावं म्हणून कोणाकडे भेटीस जाणे ही घरातील शांत वातावरणासाठीची Business Case.

हे जास्तच पुढे खेचत नेलं तर मात्र डोक्याला त्रास होतो. माणसं समाजसेवा करतात, दानधर्म करतात ते एकतर मनःशांतीसाठी किंवा पुण्य लाभावं म्हणून असा आपण समज करून घेतला तर मात्र कठीण आहे. मनःशांती किंवा पुण्यप्राप्ती ही Return of Investment डोळ्यासमोर ठेवणं म्हणजे काही चुकीचं नाही आणि त्याचे परिणाम तर चांगलेच होतात की!

मग मनुष्याची कोणती कृती अगदी निस्वार्थी असते? आईचं अपत्यावरील प्रेम आणि अपत्याचं मातेवरील प्रेम हे तर नक्कीच निर्व्याज असते! प्रेमी युगुलाच प्रेम निस्सीम असतं, समाजसेवकाची सेवा निस्सीम असते. थोडक्यात काय तर पूर्ण दुनिया काही स्वार्थी झालेली नाही. कावीळ झालेल्याला जसे सगळं काही पिवळे दिसते त्याप्रमाणे व्यावसायिक जगात खूप काळ राहून लेखकाची मती भ्रष्ट झाल्याचीच शक्यता जास्त आहे!


भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...